त्या "ई-मेल'प्रकरणी केनेथ निर्दोष
परमबीर सिंग ः अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्याचा आरोप खोटा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः अहमदाबाद बॉम्बस्फोट मालिकेचा ई- मेल पाठविल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर पळून गेलेला अमेरिकन नागरिक केनेथ हेवूड याने आज दहशतवाद विरोधी पथकाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातून मुक्ततेकरिता एटीएसच्या अधिकाऱ्यांवर पैसे मागितल्याचा झालेला आरोप खोटा असून हा प्रसिद्धिमाध्यमांचा बनाव असल्याचे हेवूडने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. ई-मेल प्रकरणात हेवूडवर पोलिसांचा कसलाही संशय नाही, तो निर्दोष असल्याचा निर्वाळा या पथकाचे अतिरिक्त आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
अहमदाबाद येथे 26 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा ई-मेल सानपाडा येथे राहणाऱ्या केनेथ हेवूड याच्या कॉम्प्युटरवरून पाठविण्यात आला. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असतानाच तो दिल्ली विमानतळावरून अमेरिकेला पळून गेला.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भारतात परतलेला हेवूड आज एटीएसच्या कार्यालयात दाखल झाला. त्याच्या सुटकेसाठी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून लाच मागितल्याचा आरोप त्याने केला होता. मात्र आज त्याने पोलिसांना दिलेल्या निवेदनात पोलिसांवर झालेला हा आरोप खोटा असल्याचे म्हटल्याचे अतिरिक्त आयुक्त सिंग यांनी सांगितले.
चौकशी सुरू असेपर्यंत हेवूडने देश सोडू नये यासाठी पोलिसांनी लुकआऊट नोटीसही जारी केली. मात्र दिल्लीच्या विमानतळ सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फरारी झाला. त्याच्या पलायनाबाबत दुसऱ्या एजन्सी तपास करीत आहेत. हेवूड निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला त्याचे कॉम्प्युटर व लॅपटॉप घेऊन जाता येतील, असेही ते म्हणाले.
प्रसिद्धिमाध्यमांच्या हातावर तुरी देत हेवूड पुन्हा निसटला...
नागपाडा येथील एटीएसच्या मुख्यालयात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आलेला केनेथ हेवूड सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलिसांपुढे आपला जबाब नोंदवीत होता. हेवूडची मुलाखत घेण्याकरिता प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींचीही झुंबड उडाली. मात्र त्यांच्या हातावर तुरी देऊन केनेथ मागच्या दरवाजाने पुन्हा पसार झाला. त्याच्या मागावर असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या काही पत्रकारांनी नागपाडा सिग्नलवर त्याची गाडी अक्षरशः अडवून त्याचा "बाईट' घेतला.
Friday, September 12, 2008
मराठीचा कधीच
मराठीचा कधीच
अवमान केला नाही
के. एल. प्रसाद ः महाराष्ट्र माझी कर्मभूमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 11 ः "मुंबई कोणाच्या बापाची नाही' या बेलगाम वक्तव्याने उपमुख्यमंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांचे मराठीप्रेम जागे झाले आहे. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असून मराठी भाषेचा आपण कधीच अवमान केला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी आज दिली.
खासदार जया बच्चन यांनी केलेल्या विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलन छेडले. या आंदोलनानंतर शहरात मनसेच्या दोन हजारहून अधिक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चेंबूर येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी "मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही, हे शहर सबंध देशवासीयांचे आहे,' असे वक्तव्य केले होते. मराठी माणसांचे मन दुखावणाऱ्या प्रसाद यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली. खुद्द उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रसाद यांच्याकडे याबाबत खुलासा मागितला.
चेंबूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण मराठी माणूस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अथवा अध्यक्ष राज ठाकरे यांचे कुठेही नाव घेतले नाही. शहरात गुंडागर्दी करणारे, दंगल भडकवणारे तसेच सर्वसामान्य नागरिकाच्या मनात दहशत निर्माण होईल, असे कृत्य करणाऱ्यांबाबत आपण हे वक्तव्य केले. असे प्रकार करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा आपल्या वक्तव्याचा रोख होता. मराठी भाषेबद्दल मला आदर आहे. दक्षिण भारतीय असताना आपण मराठी भाषा आत्मसात केल्याचेही प्रसाद या वेळी म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसाद यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावर ते म्हणाले, राज ठाकरे हे राजकारणी आहेत. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्याप्रमाणे भाष्य करणे अयोग्य असल्याचेही प्रसाद या वेळी म्हणाले. प्रसिद्धिमाध्यमातून प्रसारित झालेले मुंबई कोणाच्या बापाची मालमत्ता नाही, हे विधान आपण केलेल्या संपूर्ण विधानाचा अर्धा भाग आहे. त्यापूर्वीचे विधान न दाखविता वृत्त वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी अर्धवटच विधान दाखविल्याचेही त्यांनी सांगितले.

Wednesday, September 10, 2008
पीव्हीआर चित्रपटगृहावर "मनसे'ची दगडफेक
चौघांविरुद्ध गुन्हा ः "द लास्ट लियर'चा प्रीमियर रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांच्या महाराष्ट्रद्वेषी वक्तव्याबाबत बच्चन कुटुंबीय जोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा कोणताच चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जुहूच्या पीव्हीआर चित्रपटगृहावर दगडफेक केली. चित्रपटगृहाच्या काचा, तसेच जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या एलसीडी स्क्रीनचे या दगडफेकीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच चित्रपटगृहात होणारा अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या "द लास्ट लियर' या चित्रपटाचा प्रीमियर रद्द करण्यात आला.
"हम यूपीवाले है, हिंदीमेंही बात करेंगे; महाराष्ट्र के लोग हमे माफ करे' या खासदार जया बच्चन यांच्या मराठीद्वेषी विधानानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आंदोलनाला सुरुवात केली. बच्चन कुटुंबीयांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितल्याशिवाय त्यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा सज्जड इशारा दिल्यानंतरही जुहूच्या पीव्हीआर चित्रपटगृहात अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला "द लास्ट लियर' या चित्रपटाचा प्रीमियर होणार होता. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चार तरुण या चित्रपटगृहाजवळ आले. त्यातील दोघे चित्रपटाचे तिकीट काढण्याच्या बहाण्याने तिकीट काऊंटरजवळ जाऊन उभे राहिले. दोघांनी सोबत आणलेले दगड चित्रपटगृहाच्या दर्शनी भागात असलेल्या काचांवर, तसेच जाहिराती दर्शविणाऱ्या मोठ्या एलसीडी स्क्रीनवर भिरकावले. यानंतर तिकीट काऊंटरजवळ उभ्या असलेल्या अन्य दोघांनी सोबत आणलेल्या दांड्यांनी भिंतीवरील जाहिरातीच्या कार्टुनची तोडफोड करायला सुरुवात केली. अचानक सुरू झालेल्या या तोडफोडीनंतर चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली; मात्र हा प्रकार चित्रपटगृह व्यवस्थापनाच्या लक्षात येण्यापूर्वीच या चारही तरुणांनी तेथून पोबारा केला. या घटनेनंतर तेथे पोलिस दाखल झाले. दगडफेक करून चित्रपटगृहाचे नुकसान करणाऱ्या या चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती जुहूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक काथकाडे यांनी दिली. या दगडफेकीनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या चित्रपटगृहाची पाहणी केली. दगडफेकीच्या घटनेनंतर या चित्रपटगृहात होणारा "द लास्ट लियर' चित्रपटाचा प्रीमियर रद्द झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.
.......

नाही कोणाच्या बापाची
नाही कोणाच्या बापाची
मुंबई सर्व देशवासीयांची!
के. एल. प्रसाद ः कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः मुंबई कोणाच्या बापाची खासगी मालमत्ता नाही, हे शहर सर्व देशवासीयांचे आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, त्यासाठी आवश्यक ते बळ वापरले जाईल, असे प्रतिपादन कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी चेंबूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.
आरसीएफ पोलिस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना प्रसाद यांनी हे मत वक्तव्य केले. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा हातात घेणारा कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे प्रसाद यांनी या वेळी सांगितले. समाजवादी पक्षाच्या खासदार व प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी केलेल्या मराठीविरोधी वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला. बच्चन कुटुंब महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्यांचा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत मनसेने आंदोलनाला सुरुवात केली. मनसेच्या आंदोलनामुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये याकरिता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पोलिसांनी महिनाभरासाठी भाषणबंदी घातली आहे. आंदोलनाच्या काळात शहरातील वातावरण पुन्हा बिघडू नये यासाठी गेल्या तीन दिवसांत मनसेच्या दोन हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 26 ऑगस्टपासून तब्बल सहा हजार मनसे कार्यकर्त्यांवर अशा प्रकारची कारवाई झाल्याचेही ते या वेळी म्हणाले.
....

"होमगार्डस्'ना भत्तावाढीचा दिलासा
हेमंत गायकवाड : दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ः नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी पोलिसांसह अन्य संस्थांच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्यात भाग घेणारे होमगार्डस् तसे दुर्लक्षितच राहतात. पोलिसांएवढेच काम करूनही त्यांना दिवसाला नाममात्र 90 रुपये भत्त्यापोटी मिळत होते. आता मात्र त्यांच्या दैनिक भत्त्यात वाढ करण्यात आली असून, यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या महिन्यापासून ही वाढ लागू होत आहे. मुंबईसह आयुक्तालयांच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या होमगार्डस्ना यापुढे दिवसाला 200 आणि ग्रामीण भागातील होमगार्डस्ना 175 रुपये भत्ता दिला जाणार आहे. भत्त्यात वाढ झाल्यामुळे पुन्हा या दलाकडे होमगार्डस् आकर्षित होऊ लागतील, असा विश्वास बृहन्मुंबईचे समादेशक डॉ. हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
आपत्तीच्या वेळी पोलिस व अन्य संस्थांना मदतकार्य करणारी मानवसेवी संघटना म्हणून होमगार्डस्ची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला ही संघटना वर्षातील 53 दिवस काम करीत असे. मात्र 2004 नंतर होमगार्डस् वर्षभर पोलिसांच्या साथीने काम करू लागले. या संघटनेचे राज्यभरात 58 हजार आणि मुंबईत 3500 जवान आहेत. मुंबईवर नेहमीच दहशतवादाचे सावट असल्याने शहरातील प्रमुख ठिकाणांवरील सुरक्षा बंदोबस्तात होमगार्डस् मोलाची भूमिका बजावताना दिसतात. दिवसाला दहा तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्या या जवानांना अवघा 90 रुपये दैनिक भत्ता दिला जात होता. महागाई वाढत असूनही अनेक वर्षे जवानांच्या भत्त्यात वाढ झाली नव्हती. त्यामुळे कित्येक जवान दलाच्या कार्यक्रमांना फिरकत नसल्याचे चित्र होते. यंदाच्या गणेशोत्सव काळातही सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी आणि जनसमुदायावर नियंत्रण ठेवण्यासाठी होमगार्डस्चे कसेबसे 1650 जवान उपलब्ध झाले आहेत.
पोलिसांएवढेच काम करणाऱ्या या जवानांच्या भत्त्यात वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने यासंबंधीचा अध्यादेश 1 सप्टेंबरला काढला. दैनिक भत्त्यात झालेल्या वाढीनंतर या दलाकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलेल, असा विश्वास डॉ. हेमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. या दलात केवळ राष्ट्रसेवेकरिता दाखल होणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. येत्या काळात या दलातील जवानांची संख्या 5,500 पर्यंत नेण्याचा मानसही गायकवाड यांनी व्यक्त केला.
-----------------------------
तीन महिन्यांनी मिळतो भत्ता...
होमगार्डस्च्या भत्त्यात वाढ झाली असली, तरी या जवानांना कामाचा मोबदला तीन महिन्यांनी मिळतो. राष्ट्रसेवा म्हणून या दलात जवान दाखल होत असले, तरी त्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता हा भत्ता लवकर देण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील होमगार्डस्च्या भत्त्यासाठी यावर्षी दोन कोटी 83 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. भत्त्यात झालेल्या वाढीनंतर हे अनुदान वाढविण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
-------------------------

बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी हे दहशतवादी कृत्य ठरणार
प्रस्ताव सादर ः फसव्या फोनमुळे सोळा हजार मनुष्यतास वाया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः "रेल्वेत बॉम्ब ठेवलाय वाचवू शकलात तर वाचवा' अथवा "अमुक एक स्थानक बॉम्बस्फोटांनी उडविले जाणार आहे'. मोबाईल किंवा पीसीओवरून अशा प्रकारच्या धमक्या देऊन सुरक्षा यंत्रणांची उडणारी त्रेधातिरपिट मूकपणे पाहणाऱ्या रिकामटेकड्यांमुळे गेल्या पन्नास दिवसांत पोलिस यंत्रणा आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या कामाचे तब्बल सोळा हजार तास वाया गेले आहेत. "टाइमपास' म्हणून केल्या जाणाऱ्या अशा फसव्या दूरध्वनींना आळा घालण्याकरिता यापुढे असे प्रकार दहशती कृत्याचा भाग म्हणून हाताळले जावेत, असा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बल केंद्रीय गृहखात्याला पाठविणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक बी. एस. सिद्धू यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणांवर घातपात घडविण्यासंबंधी आलेल्या निनावी दूरध्वनीबाबत रेल्वे सुरक्षा बलाने 9 जुलै ते 28 ऑगस्टदरम्यान विशेष पाहणी केली. या पाहणीनुसार रेल्वे पोलिस तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षांना रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचे तेरा निनावी दूरध्वनी आले. या दूरध्वनींमुळे त्या त्या स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत तातडीने वाढ करण्यात आली. हे दूरध्वनी अफवांचे असल्याचे सिद्ध झाल्यानंतर ते करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यातील बहुतांश दूरध्वनी मोबाईल फोनवरून करण्यात आले. मोबाईल कंपन्यांकडे मोबाईलधारकांच्या वास्तव्याचे खरे पत्ते उपलब्ध नसल्याने उरलेले आरोपी पोलिसांना पकडता आले नाहीत. फसवे दूरध्वनी करून पोलिस यंत्रणा व सामान्य नागरिकांत घबराट पसरविणारे हे आरोपी त्यांना अटक झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी जामिनावर सुटतात. निव्वळ वेळ वाया घालविण्यासाठी केले जाणारे अफवांचे दूरध्वनी यापुढे दहशतवादी कृत्याचा भाग म्हणून हाताळले जावेत व दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी केंद्रीय गृहखात्याकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे सिद्धू यांनी या वेळी सांगितले. या अफवांमुळे मुंबई, भुसावळ व नागपूर येथील 12 गाड्या रद्द करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
अफवांच्या या दूरध्वनींमुळे दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांच्या कार्यतत्परतेचा अभ्यास करता येतो. रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा दलांच्या सुरक्षिततेतील उणिवांच्या जोरावर घातपाताच्या योजना आखण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संशयित हालचालींची तसेच रेल्वे स्थानकात ठेवलेल्या बेवारस वस्तूंची माहिती नागरिकांनी पोलिसांना तातडीने कळवावी; मात्र उगीचच दूरध्वनी करून संपूर्ण यंत्रणेची त्रेधा उडविण्यासाठी फसवे दूरध्वनी करणे बंद करावेत, असे आवाहनही सिद्धू यांनी या वेळी केले.

Friday, September 5, 2008
क्षुल्लक भांडणातून महिलेला
जिवंत जाळण्याचा प्रयत्न
महिलेचे कृत्य ः घाटकोपरच्या भरवस्तीत थरार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 4 ः बॉम्बस्फोटांसारख्या घटना किंवा नैसर्गिक आपत्तीत मुंबईकरांमधील माणूस एकमेकाच्या मदतीला धावून जातो, असे चित्र आपण नेहमीच पाहतो; पण भरवस्तीत 15-20 जणांच्या समोर कोणीतरी कुणाचा तरी जीव घेण्यासारखे निर्घृण कृत्य करीत असेल, तर हाच मुंबईकर कोषात शिरतो आणि "मौत का तमाशा' पाहतो. मुंबईकरांच्या याच "बघ्या'च्या वृत्तीमुळे आज घाटकोपर येथील अनिता शिवगण ही 35 वर्षीय महिला मृत्यूशी झुंज देत आहे. दुर्दैवाने अनितावर आधी चाकूचे वार करून नंतर तिला रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचे कृत्य करणारी महिलाच आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडीच्या पितामह रामजीनगर येथील त्रिमूर्ती गणेश चाळीत काल (ता. 3) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिता दत्ताराम शिवगण ही चाळीसमोरील पायवाटेने जात असताना शेजारीच राहणाऱ्या आशा गायकवाड (वय 35) या महिलेला तिचा धक्का लागला. याचे पर्यवसान भांडणात झाले. या वेळी दोघींचे पती घरी नसल्याने हा वाद आणखी वाढला. काही क्षणातच दोघींमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर आशाने घरातून चाकू आणला आणि अनिताच्या डोक्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता ती पुन्हा घरात गेली आणि रॉकेलचा डबा आणून अनिताच्या अंगावर रिकामा केला. हा सगळा प्रकार तिथे जमलेले 10-15 रहिवासी तटस्थपणे पाहत होते. नेहमीचेच भांडण असेल म्हणून कोणीही पुढे आले नाही. रागाने माथा फिरलेल्या आशाने कशाचाही विचार न करता कापडाचा पेटता बोळा अनिताच्या अंगावर टाकला. आशा भांडकुदळ असल्याने रहिवाशांनी सुरुवातीला या भांडणात हस्तक्षेप केला नाही; मात्र अनिताला आगीच्या ज्वाळांनी वेढल्यानंतर लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. काहींनी तातडीने घरातील ब्लॅंकेट आणून तिच्या अंगावर टाकून आग विझवायचा प्रयत्न केला. तोपर्यंत या आगीत अनिता पुरती होरपळून गेली. एका दक्ष नागरिकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आशा गायकवाडला ताब्यात घेतले आणि अनिताला रिक्षातून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, तिच्या नवऱ्याला या घटनेची माहिती मिळताच तो तीन मुलांसह रुग्णालयात पोचला. अनिताला तीन मुले असून, आपल्या आईच्या काळजीने त्यांचा निरागस चेहरा कोमेजून गेला आहे. 95 टक्के भाजलेली अनिता राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
......................
(चौकट)
दहा वर्षांचे पूर्ववैमनस्य
शिवगण व गायकवाड कुटुंबीयांत गेल्या दहा वर्षांपासून वाद आहे. या वादातूनच या दोन्ही शेजाऱ्यांत अनेकदा हाणामाऱ्याही झाल्या आहेत. यापूर्वी झालेल्या भांडणांचा राग मनात असल्याने आशा गायकवाडने धक्का लागल्याचे खुसपट काढून नेहमीप्रमाणे अनितासोबत जोरजोरात भांडण करायला सुरुवात केली आणि निर्दयपणे अनितावर वार करून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
.............................

Subscribe to:
Posts (Atom)