कोलकता येथील घटना ः संघटनेचे ओसामा बिन लादेनच्या अल कायदाशी संबंध?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः कोलकताच्या अमेरिकन सेंटरबाहेर जानेवारी-2002 मध्ये झालेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेला इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य मोहम्मद सादिक शेख याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. सादिक याने त्याच्या आणखी तिघा साथीदारांसह केलेल्या या गोळीबारात पाच पोलिस ठार; तर 19 जण जखमी झाले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांच्या आतापर्यंत झालेल्या चौकशीत त्यांचे ओसामा बिन लादेनच्या अल कायदा या अतिरेकी संघटनेशी संबंध असण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे.
देशभरात गेल्या तीन वर्षांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या 20 अतिरेक्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच अटक केली. या अतिरेक्यांपैकी 24 सप्टेंबरला आझमगढच्या संजरपूर येथून अटक करण्यात आलेला मोहम्मद सादिक इसरार अहमद शेख याच्या चौकशीत कोलकताच्या अमेरिकन सेंटरवरील हल्ल्याचे रहस्य उघडकीस आले आहे. 22 जानेवारी 2002 ला कोलकताच्या अमेरिकन सेंटर या अमेरिकन सरकारच्या माहिती केंद्रावर भल्या पहाटे हा हल्ला झाला होता. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघांनी दोन एके-47 रायफलमधून केलेल्या या बेछूट गोळीबारात पाच पोलिस ठार; तर 19 जण जखमी झाले होते. मोहम्मद सादिक व झाहिद यांनी हा गोळीबार करताना दोन्ही रायफलमधील सगळ्याच मॅगझीन संपविल्या होत्या. यावेळी त्यांच्या सोबत इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा याचा भाऊ आसिफ रझा व आणखी एक आरोपी होता. या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अफताब अन्सारी आणि अन्य नऊ जणांना कोलकता पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. या हल्ल्याच्या वेळी सादिक याने सदाकत, असे नाव धारण केले होते. हल्ल्यानंतर सादिक पाटण्याला गेला, तर झाहिद झारखंडच्या हजारीबाग येथे लपला. हजारीबाग येथे झाहीद पोलिस चकमकीत ठार झाल्यानंतर सादिक आझमगढ व पुढे दुबईला पळून गेला. अमेरिकन सेंटरवर केलेल्या हल्ल्यानंतर सादिक कुख्यात अतिरेकी आमीर रझा याच्या विश्वासू साथीदारांपैकी एक समजला जाऊ लागला. ऑक्टोबर- 2002 मध्ये त्याला दुबईला बोलविण्यात आले. तेथे तो बॉम्बस्फोटांचा सूत्रधार रियाज भटकळ आणि आसिफ रझा यांच्यासोबत आठ महिने राहिला. त्यानंतरच सादिकने भारतातून बांगलादेश व पाकिस्तानात अतिरेकी प्रशिक्षणासाठी मुले पाठवायला सुरुवात केल्याची माहितीही सहपोलिस आयुक्त मारिया यांनी दिली. आरोपींच्या चौकशीत त्यांचे लष्कर ए तैय्यबा आणि बांगलादेशातील हुजी या अतिरेकी
संघटनांशी संबंध उघडकीस आले आहेत.
इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक आमीर रझा याचा भाऊ आसिफ रझा याने अफताब अन्सारी सोबत कोलकता येथील अफताब अन्सारी एका बड्या व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्याकडून 3 कोटी 85 लाख रुपयांची खंडणी उकळली होती. खंडणीच्या रकमेतील काही पैसे अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड तसेच अल कायदाचा कुख्यात अतिरेकी मोहम्मद आत्ता याच्या मलेशियातील खात्यात जमा झाले होते. त्यातच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांच्या चौकशीतही त्यांचा मुख्य सूत्रधार आमीर रझा हाच असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे अल कायदाशी संबंध असल्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली.
Monday, November 10, 2008
"अभिनव भारत' संघटनेच्या एकाला अटक
मुंबई, ता. 10 ः "अभिनव भारत' संघटनेशी असलेल्या कथित संबंधांवरून एका व्यक्तीला माटुंगा पोलिसांनी शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याखाली अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर तसेच सैन्याच्या गणवेशात असलेले छायाचित्र हस्तगत केले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींशी त्याचा असलेला सहभाग तपासण्यासाठी त्याची नार्को चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या आरोपीचा अद्याप "अभिनव भारत' संघटनेशी कोणताही संबंध प्रस्थापित झाला नसल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली.
सुधाकर चतुर्वेदी (37) असे या आरोपीचे नाव आहे. 4 नोव्हेंबरला माटुंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत संशयास्पद फिरणाऱ्या चतुर्वेदीला पोलिसांनी अटक केली. मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा असलेला चतुर्वेदी गेल्या चार वर्षांपासून नाशिक येथे राहत होता. पोलिस चौकशीत समाधानकारक उत्तरे देत नसल्याने तसेच त्याच्या मुंबईतील वास्तव्याबाबत योग्य तो खुलासा होऊ न शकल्याने त्याची नार्को चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये असलेले त्याचे वास्तव्य संशय निर्माण करणारे असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील देशमुख यांनी सांगितले. त्याच्यावर कलिना अथवा बेंगळूरु येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये नार्को चाचणी होणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. चतुर्वेदी अभिनव भारत संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जात असले तरी त्याने अद्याप ही बाब कबूल केलेली नाही. न्यायालयाने त्याला 20 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
................

उत्तरप्रदेशच्या खासदाराची दहशतवाद विरोधी पथक करणार चौकशी..
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.10 ः मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने उत्तर प्रदेश येथील बड्या राजकीय नेत्याच्या चौकशीकरिता न्यायालयात मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींच्या चौकशीत या राजकीय नेत्याचे नाव पुढे आल्याने दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिसही हबकले आहेत.
बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाची मुख्य सूत्रधार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्यासह नऊ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये सैन्यातून निवृत्त झालेल्या मेजरपासून विद्यमान लेफ्टनंट कर्नलचाही समावेश आहे. आरोपींच्या झालेल्या चौकशीत आता उत्तरभारतातील बड्या राजकीय नेत्याचे नाव पुढे आले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी घडविलेल्या या स्फोटांची आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर हिचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग व अन्य राजकीय नेत्यांसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर खळबळ उडाली होती.दहशतवाद विरोधी पथकाने आता या प्रकरणात उत्तरप्रदेश मधील एका बड्या नेत्याच्या चौकशीचीच मागणी नाशिक न्यायालयाकडे केल्यामुळे राजकीय क्षेत्रातही तर्कवितर्क लावले जात आहेत. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर नजीकच्या परिसरात खासदारकी भूषविणार हा नेता हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे बोलले जाते.
स्फोटातील पाच आरोपींना आज दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक न्यायालयात दाखल केले होते.न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने या नेत्याच्या चौकशीकरिता परवानगी मागणारा अर्ज न्यायाधीशांना सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या नेत्याविरुद्ध अटक वॉरंटही पोलिसांना दिल्याचे समजते. मालेगाव स्फोटातील आरोपींशी असलेले या नेत्याचे संबंध यावेळी तपासले जाणार आहेत.दहशतवाद विरोधी पथक लवकरच या नेत्याकडे याप्रकरणी विचारपूस करणार आहे.मालेगाव बॉम्बस्फोटांकरीता हवाला मार्गाने आलेल्या पैशांचा वापर करण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.दरम्यान, आज लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याची बंगळूरू येथील फॉरन्सिक सायन्स लॅबमध्ये नार्को चाचणी करण्यात आली.

तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
गृह खात्याची घोषणा ः सुप्रकाश चक्रवर्ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 10 ः राज्य पोलिस दलात कार्यरत असलेल्या तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नव्याने बदल्या केल्याची घोषणा गृहखात्याने आज सायंकाळी केली. नवीन बदल्यांप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक जीवन वीरकर यांची गृहरक्षक दलाच्या महासमादेशक पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागेवर गृहरक्षक दलाचे विद्यमान महासमादेशक सुप्रकाश चक्रवर्ती यांची नियुक्ती झाली आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती होण्याची पात्रता असताना गृहरक्षक दलाच्या महासमादेशक पदावर झालेल्या नियुक्तीमुळे सुप्रकाश चक्रवर्ती नाराज होते. या नाराजीमुळेच त्यांच्यापेक्षा सेवाज्येष्ठतेत कमी असलेल्या अनामी रॉय यांची राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध कॅटमध्ये धाव घेतली. कॅटने चक्रवर्ती यांच्या बाजूने कौल देत पोलिस महासंचालक पदावर केलेल्या राय यांच्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण मागितले होते. चक्रवर्ती यांची ही नाराजी दूर करण्यासाठीच त्यांची लाचलुचपत खात्याच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जाते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे विद्यमान महासंचालक जीवन वीरकर हे उद्यापासून चक्रवर्ती यांच्या जागी गृहरक्षक दलाचे महासमादेशक म्हणून काम पाहतील. याच वेळी केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीहून राज्यात परतलेले एस. जगन्नाथ यांची मुंबईत अप्पर पोलिस आयुक्त पदावर बदली करण्यात आल्याची माहिती गृह खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

एटीएसचा शबरीधाम आश्रमावर छापा
मालेगाव बॉम्बस्फोट ः स्वामी अशिमानंद भूमिगत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुजरातच्या डांग येथे असलेल्या शबरीधाम आश्रमावर छापा घालून तेथील सेवेकरी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली. या आश्रमाचे स्वामी अशिमानंद त्यांचा विश्वासू साथीदार रामजी ऊर्फ रामसू एटीएसच्या जाळ्यात सापडला आहे; मात्र या घटनेनंतर स्वामी अशिमानंद भूमिगत झाल्याचे वृत्त "पीटीआय'ने दिले आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटांप्रकरणी एटीएसच्या तुकड्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथे जाऊन तपासकार्य करीत आहेत. या स्फोटांची मुख्य सूत्रधार समजली जाणारी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि अटक केलेल्या अन्य आठ आरोपींच्या चौकशीत स्वामी अशिमानंद यांचा विश्वासू साथीदार रामजी ऊर्फ रामसू याचे नाव पुढे आले. 29 सप्टेंबरला मालेगाव येथील मशिदीबाहेर स्फोट घडविण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंग हिच्या मोटारसायकलमध्ये रामजीनेच बॉम्ब ठेवला होता, असे बोलले जाते. रामजी या प्रकरणातील महत्त्वपूर्ण दुवा समजला जात आहे.
एटीएसच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शबरीधाम आश्रमाचे स्वामी अशिमानंद भूमिगत झाले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. स्वामी अशिमानंद यांनी 2006 मध्ये शबरीकुंभ हा मोठा धार्मिक मेळावा घेतला. वापी येथून एटीएसने ताब्यात घेतलेल्या आणखी एक तरुण डांग येथील वाघाई तालुक्याचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. या तरुणाने देखील काही काळ स्वामी अशिदानंद यांच्या आश्रमात काम केले. पाच महिन्यांपूर्वी तो वापीत कामानिमित्त राहत होता.
-------------------

कांदिवलीत कामगारनेत्याची हत्या
युनियनचा वाद ः चॉपर आणि चाकूने भोसकले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 9 ः राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार संघटनेच्या नेत्याची तो राहत असलेल्या सोसायटीच्या कार्यालयात शिरलेल्या पंधरा जणांच्या जमावाने चॉपर आणि चाकूने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना कांदिवली पूर्वेला आज सकाळी घडली. ही हत्या युनियनच्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
कांदिवली पूर्वेला असलेल्या ठाकूर व्हिलेजमधील एव्हरशाईन मिलेनियम रेसिडेन्सीमध्ये सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शांताराम गोपाळ कानडे (48) असे हत्या झालेल्या कामगारनेत्याचे नाव आहे. एव्हरशाईन सोसायटीच्या सरचिटणीसपदी कार्यरत असलेले कानडे पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सोसायटीच्या कार्यालयात येऊन बसले होते. या वेळी त्यांच्यासोबत कार्यालयीन व्यवस्थापक मनोज नायर आणि एक प्लंबर असे दोघे जण होते. सोसायटीचे कामकाज आटोपल्यानंतर कानडे पुन्हा घरी जायला निघाले तोच बाहेरून पंधरा जणांचा जमाव त्यांच्या दिशेने धावून आला. जमावाच्या हातात असलेले चॉपर आणि चाकू पाहून कानडे यांनी पुन्हा कार्यालयात जाऊन दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच आत शिरलेल्या या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. मारेकऱ्यांनी त्यांच्या पाठ, पोट आणि छातीवर सपासप वार केल्याने काही क्षणातच ते खाली कोसळले. कानडे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला. त्यापूर्वी त्यांनी कार्यालयीन व्यवस्थापक मनोज नायर व प्लंबरलाही मारहाण केली. नायरच्या चेहऱ्यावर वार झाल्याने तोही या हल्ल्यात जखमी झाला. नायर आणि प्लंबरने केलेल्या आरडाओरडीनंतर इमारतीतील रहिवासी कार्यालयाजवळ जमले. त्यांनी कानडे यांना तातडीने उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी रिलायन्स कंपनीत कामाला असताना कानडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत कामगार संघटनेसोबत काम करायला सुरवात केली होती. कामगार संघटनेच्या वादातून ही हत्या झाली असावी, अशी शक्यता समतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. बी. शिंदे यांनी वर्तविली. कानडे यांचा सोसायटीत राहणाऱ्या विजय तांबट यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. कानडे यांच्या हत्येला तांबट यांच्यासोबतचा वाद कारणीभूत आहे का, हा पैलूदेखील पोलिस तपासात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कानडे यांची पत्नी तीन वर्षांपूर्वी कर्करोगाने मरण पावली आहे. त्यांचा एकुलता एक अकरा वर्षांचा मुलगा पाचगणी येथे पाचवी इयत्तेत शिकतो. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू असल्याचेही शिंदे या वेळी म्हणाले.

Friday, November 7, 2008
घातपाती कारवायांसाठी "शादी डॉट कॉम'चा वापर!
उपवरांनो सावधान : सिमकार्डसाठी अतिरेक्यांनी वापरली माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 6 ः लग्नासाठी वधू किंवा वरसंशोधन सुरू असेल आणि आधुनिकतेचा वसा जोपासत त्यासाठी आपण आपली वैयक्तिक माहिती शादी डॉट कॉमसारख्या मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर टाकली असेल तर सावधान...! अशाच मॅट्रिमोनिअल साईट्सवर आलेल्या वैयक्तिक माहितीचा वापर करून दहशतवाद्यांनी अतिरेकी कारवायांकरिता वापरलेल्या मोबाईल फोनचे सिमकार्ड खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी खुद्द ही कबुली दिली.
गेल्या तीन वर्षांत जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, सुरत, बंगळूरु, दिल्लीसह देशभरात बॉम्बस्फोट मालिका घडविणाऱ्या इंडियन मुजाहिदीनच्या वीस अतिरेक्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. या अतिरेक्यांच्या चौकशीत गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेली माहिती धक्कादायक आणि थक्क करणारी आहे. इंडियन मुजाहिदीनचे अतिरेकी देशात कोठेही बॉम्बस्फोट घडवायचे असल्यास एकमेकांशी संपर्क साधता यावा यासाठी स्फोटांपूर्वी त्या त्या ठिकाणचे मोबाईल सिमकार्ड खरेदी करीत. अतिरेक्यांपैकी आनिक शफीक सय्यद याचे पुण्यात मोबाईलचे दुकान असल्याने सिमकार्डच्या खरेदीसाठी मोबाईल कंपन्यांना द्यावी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे आणि छायाचित्रे देण्याची जबाबदारी त्याच्यावर असे. सिमकार्डकरिता आवश्यक असणारी ही कागदपत्रे व छायाचित्रे देण्यासाठी त्याने नामी शक्कल लढविली. लग्नगाठी जुळविण्याकरिता प्रसिद्ध असलेल्या शादी डॉट कॉम या वेबसाइटवर विवाहेच्छुकांनी टाकलेले स्वतःचे छायाचित्र आणि वैयक्तिक माहितीच्या आधारे बनावट कागदपत्रे बनवून सिमकार्ड खरेदी केली जात. पुण्याच्या कोंढवा खुर्द येथील म्यूज अपार्टमेंट येथील इंडियन मुजाहिदीनच्या हेडक्वार्टरमधील कॉम्प्युटरवरून जेथे स्फोट घडवायचे आहेत त्या ठिकाणच्या विवाहेच्छुकांची छायाचित्रे व माहिती डाऊनलोड केली जात असे. अशा प्रकारच्या बोगस कागदपत्रांचा वापर करून या अतिरेक्यांनी तब्बल पन्नास सिमकार्ड घेतले. ज्यांच्या नावांनी मोबाईलचे सिमकार्ड खरेदी करण्यात आले अशा मुंबई व मंगळूर येथील दोघा विवाहेच्छुक तरुणांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी स्वतःची माहिती व छायाचित्र मॅट्रिमोनिअल साइटवर टाकल्याचे उघडकीस आल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले. हा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मॅट्रिमोनिअल साईटच्या व्यवस्थापनालाही कळविला असून याबाबत दक्षता घेण्यासही सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

Subscribe to:
Posts (Atom)