एनएसजीचे महासंचालक : कार्यपद्धती माहीत असल्याने कारवाई यशस्वी
ज्ञानेश चव्हाण : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः पकडले जाण्याच्या भीतीने दबावाखाली येऊन दहशतवादी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी आग लावायला सुरुवात करतात. "ऑपरेशन ताज'च्या वेळी सोबतचे दोन अतिरेकी मारले गेल्यानंतर जिवंत राहिलेल्या एका अतिरेक्यावर पकडले जाण्याच्या अथवा मरणाच्या भीतीने प्रचंड दबाव आला. तेव्हा त्याने तो जिथे होता त्या खोलीला आग लावून त्याच्या मागावर असलेल्या कमांडोजचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न केला. अतिरेक्यांची ही कार्यपद्धती माहीत असल्याने कमांडोंनी आपल्या "लक्ष्या'वर गोळीबार सुरूच ठेवला. याच गोळीबारात तो अतिरेकी मरण पावल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक ज्योती कृष्ण दत्ता यांनी दिली.
"ऑपरेशन ताज'च्या वेळी अतिरेक्यांनी हल्ल्याचे तंत्र वेळोवेळी बदलले. त्यामुळे कारवाई करण्यात थोड्याबहुत प्रमाणावर अडचणी आल्या. अतिरेक्यांनी अनेकदा त्यांची जागा बदलून गोळीबार केला. ताजमधील कारवाईत तीन अतिरेक्यांचा खातमा केला आहे. या ऑपरेशनमध्ये एनएसजीचे मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. हॉटेलमध्ये अतिरेक्यांच्या मागावर असताना उन्नीकृष्णन त्यांच्या सहकाऱ्यांपासून वेगळे झाले. या वेळी समोर आलेल्या अतिरेक्यांशी एकट्यानेच लढून त्यांनी बहाद्दुरी दाखविली.
...तर काय कराल?
एखाद्या हॉटेलमध्ये किंवा वसाहतीत दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यास तेथे असलेल्या पर्यटक अथवा नागरिकांनी घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. जेणेकरून तो खरोखरच सामान्य नागरिक असल्याची खात्री पटू शकेल. एनएसजीच्या कमांडोंकडे असलेल्या अद्ययावत शस्त्राच्या सहाय्याने एखाद्या घरात लपलेल्या अतिरेक्याला खूप दूरवरून टिपण्याची क्षमता असते. याशिवाय लपलेल्या अतिरेक्याकडे असलेल्या हत्याराचीही माहिती कमांडर्सना घेता येते, असेही दत्ता या वेळी म्हणाले.
Tuesday, December 2, 2008
अखेर 59 तासांनी सुटकेचा नि:श्वास
निकराचा लढा : हॉटेल ताज अतिरेक्यांच्या तावडीतून सोडविले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 29 ः हॉटेल ओबेरॉय आणि कुलाब्याचे नरिमन हाऊस काल (ता. 28) अतिरेक्यांच्या तावडीतून प्रयत्नांची शिकस्त करून सोडविणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा दलाला (एनएसजी) हॉटेल ताजवर पुन्हा कब्जा मिळविण्यासाठी मात्र प्रदीर्घ काळ संघर्ष करावा लागला. एनएसजीने मुंबई पोलिस, नौदल आणि लष्कराच्या मदतीने 59 तास निकराने दहशतवाद्यांशी लढा दिला. अखेर आज सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी हॉटेलमध्ये लपलेल्या तिघाही अतिरेक्यांचा खातमा केल्याचे एनएसजीने जाहीर केल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
आजवरचा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्याने सबंध देश हादरला. 26 तारखेला रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 195 जणांना जीव गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले. एनएसजीच्या कमांडोंनी हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन हाऊस दोन दिवसांच्या प्रयत्नांती काल सायंकाळी अतिरेक्यांच्या ताब्यातून मुक्त केले. यावेळी पर्यटक, विदेशी नागरिकांना ओलिस ठेवून लपून बसलेल्या या अतिरेक्यांच्या कारवाईला चोख उत्तर देताना एनएसजी कमांडोंनी पाच अतिरेक्यांना ठार मारले.
अतिरेक्यांनी हल्ल्याचे तंत्र बदलले
ऐतिहासिक वारसा असलेल्या हॉटेल ताजमध्ये लपलेल्या अतिरेक्यांना जेरीस आणण्याचे प्रयत्न मात्र एनएसजी, पोलिस आणि लष्कराला मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही सुरूच ठेवावे लागले होते. दोन दिवस दोन्ही बाजूंनी होणारा गोळीबार आणि हातबॉम्बचा हल्ला काल मध्यरात्रीनंतर काही वेळ थांबला. लपलेल्या अतिरेक्यांनी हल्ल्याचे तंत्र बदलल्याने एनएसजीच्या अधिकाऱ्यांनीदेखील आपला ऍक्शन प्लॅन बदलला. कमांडोंच्या पथकांनी ताजमधील सहाशेहून अधिक खोल्यांमधून अतिरेक्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा लपलेल्या अतिरेक्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. अतिरेक्यांनी आणखी काही पर्यटक, परदेशी नागरिकांना ओलिस ठेवल्याची शक्यता असल्याने कमांडो अतिशय काळजीपूर्वक हे "ऑपरेशन' हाताळत होते. हा गोळीबार व हातबॉम्बचा आवाज हॉटेलबाहेर सुमारे तीनशे मीटर लांब उभे राहून वृत्तांकन करणाऱ्या शेकडो प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या हृदयाचे ठोके चुकवत होता. एक-दोनदा तर अतिरेक्यांनी झाडलेल्या गोळ्या या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्याच दिशेने आल्या.
त्याच सुमारास पावसाच्या शिडकाव्यामुळे हॉटेलबाहेरच्या वातावरणातील तणाव काहीसा कमी होत नाही तोच एनएसजीच्या कमांडोंनी तळमजला व पहिल्या मजल्यावर लपलेल्या एका अतिरेक्यावर गोळीबार सुरू केला. कमांडोंच्या हाती सापडण्याच्या भितीने या अतिरेक्याने सात वाजून वीस मिनिटांनी हॉटेलच्या तळमजल्यावर हातबॉम्ब फोडून आग लावली. काही क्षणातच ही आग पहिल्या मजल्यावरही पसरली. ही आग विझविण्यात कमांडोंचा बराच वेळ जाईल या अंदाजाने तळमजल्यावर असलेला अतिरेकी हॉटेलमधीलच सुरक्षित ठिकाणी पळत असतानाच कमांडोंनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. काही क्षणातच त्याचा हॉटेलबाहेर पडलेला मृतदेह सगळ्यांनीच पाहिला. तत्पूर्वी तळमजला व पहिल्या मजल्यावर लागलेली आग आठ वाजता अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांच्या संरक्षणात विझविली. दरम्यान, एनएसजी कमांडोंनी संपूर्ण हॉटेलमध्ये तपासणी केली. यानंतर एनएसजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील सगळ्या अतिरेक्यांचा निःपात केल्याचे जाहीर केले. सतत तीन दिवस सुरू असलेली ही कारवाई एनएसजीच्या कमांडोंनी मुंबई पोलिस, लष्कर, नौदल आणि शीघ्र कृती दलाच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे एनएसजीचे महासंचालक जे. के. दत्त यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. मात्र हॉटेलमध्ये अद्याप बरेच काम उरल्याचेही त्यांनी सांगितले. तोवर या परिसराचे वैभव आणि शांततेचे प्रतीक असलेल्या कबुतरांनी गेटवे ऑफ इंडियाच्या मोकळ्या परिसरात नेहमीप्रमाणे जमायला सुरुवात केली. तब्बल 59 तासांनी दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करण्यात सुरक्षा दलांना यश आल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला!

एक अधुरा "एहसास'
ज्ञानेश चव्हाण / सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.27 ः तरुणांना व्यसनमुक्त करून चांगल्या मार्गाला लावण्याचे दहशतवादविरोधी पथकाचे सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे यांचे स्वप्न. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात दहशतवाद्यांशी मुकाबला करताना ते धारातीर्थी पडले आणि "एहसास' प्रकल्पाच्या नावाने त्यांच्या मनात रुजलेले स्वप्न अखेर अधुरेच राहिले. मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पासाठी वेळ देणार असल्याचे त्यांनी यापूर्वी "सकाळ'शी बोलताना सांगितले होते.
दहशतवाद्यांशी लढताना दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांना वीरमरण आले.
मुंबईत अंमलीपदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त म्हणून काम करीत असताना त्यांनी 1996 मध्ये "जिज्ञासा' संस्थेच्या मदतीने अंमलीपदार्थांच्या विळख्यात नवी पिढी जाऊ नये याकरिता व्यसनमुक्तीसंबंधी लहान मुलांची कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. मुंबईच्या झोपडपट्टी परिसरातील 30 हजार मुलांना व्यसनमुक्तीचे प्रशिक्षण दिलेल्या या संस्थेने 2006 पर्यंत 3 लाख मुलांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोचविला आहे. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर युरोपला रॉ. मध्ये नेमणूक झाल्यानंतरही अंमलीपदार्थांचे आंतरराष्ट्रीय सिंडीकेट्स, जागतिक दहशतवादसारख्या विषयांवर त्यांनी काम केले.
मुंबईत प्रशासन विभागाचे सह पोलिस आयुक्त म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांनी व्यसनाधीन मुलांसाठीचे काम पुन्हा सुरू केले. दहशतवादविरोधी पथकाच्या सह पोलिस आयुक्तपदावर काम करीत असताना काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने "एहसास' नावाचा प्रकल्प हाती घेण्याचा संकल्प सोडला होता. तरुणाईला व्यसनमुक्त करण्यासाठी जागतिक अंमलीपदार्थविरोधी दिनानिमित्त त्यांनी जाहीर केलेल्या या संकल्पाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, आरोग्यमंत्री विमल मुंदडा, जिज्ञासा संस्थेचे आनंद नाडकर्णी यांनी पाठिंबा दिला होता. नवी मुंबई व ठाणे येथील बॉम्बस्फोट, इंडियन मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांना पकडण्याचे आव्हान आणि मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास या दहशतवादविरोधी पथकाच्या तपास कामात गुंतलेल्या करकरे यांनी मालेगाव बॉम्बस्फोटांच्या तपासानंतर या प्रकल्पासाठी वेळ काढण्याचा "सकाळ'च्या प्रतिनिधीशी बोलताना निर्धार केला होता.

मृत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे
1) हेमंत करकरे (सह पोलिस आयुक्त - दहशतवादविरोधी पथक)
2) अशोक कामटे (अतिरिक्त पोलिस आयुक्त - पूर्व प्रादेशिक विभाग)
3) विजय साळसकर (पोलिस निरीक्षक- गुन्हे शाखा )
4) शशांक शिंदे (पोलिस निरीक्षक- रेल्वे)
5) प्रकाश पांडुरंग मोरे (पोलिस उपनिरीक्षक )
6) बापूराव साहेबराव धुरगुडे (पोलिस उपनिरीक्षक)
7) एम.आर. चित्ते (पोलिस शिपाई)
8) विजय खडिकर (पोलिस शिपाई)
9) नानासाहेब भोसले (सहायक पोलिस उपनिरीक्षक)
10) योगेश पाटील (पोलिस शिपाई)
11) ओघळे ( सहायक पोलिस उपनिरीक्षक)
12) जयवंत पाटील (पोलिस शिपाई)
13) अंबादास पवार (पोलिस शिपाई)
14) एम. सी. चौधरी (रेल्वे पोलिस)

अतिरेक्यांना ताज व ओबेरॉयची खडानखडा माहिती होती
तपासातील माहिती ः तीन महिने प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.28 ः मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी "डेक्कन मुजाहिदीन' या कथित अतिरेकी संघटनेने घेतली असली तरी हल्लेखोर अतिरेकी लष्कर ए तैय्यबाशी संबंधित असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. या अतिरेक्यांना घातपाती हल्ल्यासाठी लष्कर-ए-तैय्यबाने कराचीत तीन महिन्यांचे प्रशिक्षण दिले. अतिरेकी हल्ल्याचे मुख्य टार्गेट ठरलेल्या हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये शिरण्याचे व बाहेर पडण्याचे सर्व प्रमुख मार्ग माहीत होते, अशी माहितीही पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस येऊ लागली आहे.
समुद्रमार्गाने मुंबईत शिरलेल्या लष्कर ए तैय्यबाच्या अतिरेक्यांनी तब्बल दोन दिवस केलेल्या दहशती कारवायांनी देशाला हादरवून सोडले. मुंबईचे प्रतीक समजली जाणारी ताज आणि ओबेरॉय ही दोन पंचतारांकित हॉटेल्स आणि कुलाबा येथील यहुदींचे वास्तव्य असलेली नरिमन इमारत अतिरेक्यांच्या हल्ल्याचे प्रमुख केंद्र ठरली. देशावर झालेला आजवरचा सर्वांत मोठा अतिरेकी हल्ला म्हणून पाहिले जाणाऱ्या या हल्ल्याची पूर्वतयारी पाच महिन्यांपासून सुरू होती. हल्ल्यात सहभागी झालेल्या अतिरेक्यांना लष्कराच्या कमांडोंनी तीन महिने शस्त्र प्रशिक्षण दिले. यात विशेषतः एके -47 सारखी शस्त्रे चालविण्याच्या प्रशिक्षणाचाही समावेश असल्याचे तपासात उघडकीस येऊ लागले आहे. पाकिस्तानातून मोठ्या जहाजाने अतिरेक्यांचा गट मुंबईत आला. मुंबईत येण्यासाठी त्यांनी लहान नौका वापरली. मुंबईच्या सागरी किनारपट्टीच्या जवळ येत असताना त्यांनी नौकेच्या मालकाला ठार मारले. मुंबईत उतरल्यानंतर प्रत्येकी दोन जणांचे गट तयार करून त्यांनी हा हल्ला चढविल्याचे सांगण्यात येते. मुंबईत ठिकठिकाणी गोळीबार करून हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्ये शिरलेल्या या अतिरेक्यांना हॉटेलमध्ये जाण्याचे तसेच बाहेर पडण्याचे सर्व प्रमुख मार्ग माहीत होते. याशिवाय त्यांच्याकडे हॉटेलच्या अतंर्भागाचे नकाशेदेखील उपलब्ध होते, अशीही माहिती पुढे आली आहे. अतिरेकी कारवाईच्या वेळी पोलिसांनी जखमी अवस्थेत अटक केलेल्या अतिरेक्याला उपचारासाठी नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारानंतर पोलिसांनी त्याला गुप्त ठिकाणी हलविल्याचे सांगण्यात येते.त्याच्याकडूनच या हल्ल्यासंबंधीची माहिती उघडकीस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
---------

सागरी मार्गावरील हलगर्जीच नडली
गुप्तचर यंत्रणांचा इशारा ः गस्ती नौकांची अनुपलब्धता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. 27 ः सागरी मार्गाने अतिरेकी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिल्यानंतरही या मार्गावरील नौकांच्या गस्तींबाबत पोलिसांनी दाखविलेल्या कमालीच्या हलगर्जीमुळेच दक्षिण मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला. सात महिन्यांपूर्वी गस्ती नौकांच्या अनुपलब्धतेमुळे सागरी किनारपट्टीला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. गस्त वाढविण्याबाबतची पोलिसांनीची उदासीनताच या हल्ल्याला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.
कुलाबा येथील समुद्र किनाऱ्यावरून मुंबईत शिरलेल्या दहाहून अधिक दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेलसह ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले केले. या हल्ल्यात सुमारे 110 जण ठार; तर 217 जण जखमी झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सह पोलिस आयुक्त हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे, एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलिस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासह 14 पोलिसांना वीरमरण आले.
पोलिसांच्या बोटी नादुरुस्त
मुंबईच्या सागरी किनारपट्टीवर अतिरेकी हल्ल्याची शक्यता "सकाळ' मध्ये 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वर्तविली होती. मुंबईच्या 114 किलोमीटर लांबीच्या सागरी किनारपट्टीच्या संरक्षणासाठी पोलिसांच्या बोटी नादुरुस्त असल्याचे, तसेच अनेकदा भाडेतत्वाच्या बोटी घेऊन गस्त घालावी लागत असल्याचे देखील या वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची चर्चा झाल्यानंतरही सागरी गस्त वाढविण्याबाबत पोलिसांनी बोटचेपे धोरण अवलंबिले. पोलिसांना सागरी गस्तीसाठी केंद्र सरकारने देऊ केलेल्या हायस्पीड बोटी अद्याप मुंबई पोलिसांना मिळालेल्या नाहीत. याशिवाय विस्तीर्ण अशा मुंबईच्या सागरी किनारपट्टीसाठी अवघे एकच सागरी पोलिस ठाणे असल्याने येथील सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आज सागरी मार्गावर मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात आली. पोलिस आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईत अतिरेक्यांचे शस्त्रसाठ्याने भरलेले जहाज पकडल्याचा दावा करण्यात येत आहे. सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आणि सरकारी यंत्रणांनी वेळीच लक्ष पुरविले असते; तर हा हल्ला रोखणे शक्य झाले असते, असेही आता सांगितले जात आहे.
"सकाळ'ने वर्तविली हल्ल्याची शक्यता
किंवा
"सकाळ'ने दिली होती धोक्याची सूचना
मुंबईच्या किनारपट्टीवर असलेल्या अपूर्ण सागरी गस्तीमुळे राजभवनसह, बॉम्बे हाय, कुलाबा येथील नौदल तळ, बीएआरसी, ओएनजीसी, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या संवेदनशील ठिकाणांवर सागरी मार्गाने अतिरेकी हल्ल्याची शक्यता "सकाळ' मध्ये 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात वर्तविली होती

हेमंत करकरे, अशोक कामटे,विजय साळसकर- प्रोफाईल
हेमंत करकरे प्रोफाईल
- 1982 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदावर कार्यरत होते. देशातील काही निवडक आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक . रॉ मध्ये अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर 2007 मध्ये मुंबई पोलिस दलात परतलेले करकरे सह पोलिस आयुक्त ( प्रशासन ) या पदावर रुजू झाले. रॉ मधील अनेक वर्षांच्या कामाचा अनुभव आणि गुप्तहेरांचे देशव्यापी नेटवर्क असल्याने त्यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकावर नियुक्ती करण्यात आली. मालेगाव बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा बॉम्बस्फोटांसारख्या कृत्यातील सहभाग उघडकीस आणणारा हा अधिकारी आज (बुधवारी) मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये अतिरेक्यांसोबत लढताना धारातीर्थी पडला. राज्य पोलिस दलाचा चेहरा बदलून त्याचे आधुनिकीकरण करण्यात करकरे यांची कामगिरी मोलाची आहे.
----------------
अशोक कामटे - प्रोफाईल
-----------------------
कणखरपणाचा आदर्श
मुंबई पोलिस दलाच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पदावर कार्यरत असणारे अशोक कामटे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानंतर कामटे यांची जूनमध्येच मुंबई पोलिस दलात सहआयुक्त पदावर बदली झाली होती.
कामटे हे मूळचे जांभळी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील रहिवासी होते. 1989 मध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून भंडारा जिल्ह्यात रुजू झाले. त्यानंतर अधीक्षक म्हणून सांगली, कोल्हापूर व ठाणे (ग्रामीण) येथे काम केले होते. शांतता समिती प्रतिनिधी म्हणून दीड वर्ष बोस्निया येथे परदेशात होते. पुन्हा मुंबईत दहशतवाद व नक्षलवादविरोधी पथकात कार्यरत होते.
अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे यांनी गेल्या वर्षी खैरलांजी प्रकरणानंतर सोलापुरात उसळलेली दंगल आपल्या कुशल नेतृत्वाखाली आटोक्यात आणली होती. मराठवाड्यात बीड येथेही त्यांनी पोलिस अधीक्षकपदावर चांगले काम केले होते. ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणूनही कामटे यांचा कार्यकाळ चांगलाच गाजला. अत्यंत कठोर प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री. कामटे यांनी सोलापुरातील आपली कारकीर्द गाजविली. माजी आमदार रवी पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री बारा वाजता फटाके उडविल्यानंतर श्री. कामटे यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. या कारवाईने ते चांगले चर्चेत आले होते. सोलापुरात ते पोलिस आयुक्तपदावर गेल्या जूनपर्यंत काम करत होते. त्यानंतर ते प्रशिक्षणासाठी इटलीला गेले. त्यानंतर ते मुंबईत काम करत होते.
खेळाची आवड असलेले कामटे पॉवरलिफ्टर आणि बॉडी बिल्डर म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांच्या नावावर पॉवर लिफ्टिंगमधील तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. त्यांनी माणुसकीच्या भावनेतून मुंबईची पॉवरलिफ्टर दीपाली कुलकर्णी हिला गेल्या वर्षी आर्थिक साह्यही केले होते. 2006 मध्ये कामटे यांना राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला होता. अशोक कामटे यांची "पोलिस स्टॅबिलिटी युनिट' या पथकात जानेवारी 2008 पासून नियुक्ती झाली होती. ते इटली येथील प्रशिक्षण पथकात सामील झाले होते.
------------------
विजय साळसकर- प्रोफाईल
बेडर अधिकारी
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात "एन्काऊंटर स्पेशलिस्ट' म्हणून विजय साळसकर यांचा दबदबा होता. अमर नाईकसारख्या मुंबईत गुन्हेगारी जगताची दहशत निर्माण करणाऱ्यांना साळसकर यांनी चकमकीत ठार केले होते. या बेडर अधिकाऱ्याने आतापर्यंत 78 हून अधिक सराईत गुन्हेगारांचा खातमा केला. 1983 च्या बॅचचे पोलिस अधिकारी असलेले साळसकर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुख पदावर होते. मुंबई पोलिस दलात त्यांच्या 24 वर्षांच्या सेवेत त्यांनी अमर नाईक, साधू शेट्टी, जग्गू शेट्टी, कुंदन सिंग रावत, जहूर मसंदा, सदा पावले, विजय तांडेल यांच्यासारख्या सराईत गुन्हेगारांना यमसदनी धाडले. "मेट्रो' चित्रपटगृहाजवळ अतिरेक्यांशी मुकाबला करताना साळसकर धारातीर्थी पडले

Subscribe to:
Posts (Atom)