छायाचित्रेही घेणार; पोलिसांची अभिनव योजना
सायबर गुन्हेगारीसाठी सायबर कॅफेंचा वापर होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी आता एक अभिनव योजना हाती घेतली आहे. शहरातील सर्व सायबर कॅफेंमध्ये ग्राहकांच्या हाताचे ठसे घेणारे उपकरण बसविण्याची तसेच वेबकॅमवरून त्यांची छायाचित्रे काढण्याची सक्ती करण्याचा विचार मुंबई पोलिस करीत असल्याचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.
सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने सायबर कॅफेंमध्ये येणाऱ्या ग्राहकांची ओळखपत्रे तपासल्याशिवाय त्यांना इंटरनेटचा वापर करू देऊ नये, असा नियम पोलिसांनी केला. याशिवाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या नावाची नोंद एका वहीत करण्यात येऊ लागली; मात्र अनेकदा हा नियम तंतोतंत पाळला जात नसल्याचे स्पष्ट होऊ लागले. गुन्हेगारांनी गुन्ह्यासाठी सायबर कॅफेचा वापर केल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शहरातील सर्व सायबर कॅफेंमध्ये इंटरनेटचा वापर करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या हाताचे ठसे घेणारे उपकरण बसविण्याचे तसेच वेबकॅमद्वारे त्यांची छायाचित्रे घेणारे उपकरण बसविले जाणार आहे. या उपकरणांमुळे इंटरनेटचा वापर करण्यासाठी आलेल्या व्यक्तीची माहिती पोलिसांना त्वरित उपलब्ध होऊ शकणार आहे. यासंबंधी सायबर कॅफेमालकांशी पोलिसांची चर्चा सुरू असून लवकरच ही योजना अमलात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दिली. सायबर कॅफेचालकांसाठी मुंबई पोलिसांकडून परवाना देण्यात येतो. या परवान्यातच सायबर कॅफेंमधील सुरक्षिततेसंबंधीच्या देण्यात येणाऱ्या सूचनांसोबतच या नवीन अटींचीदेखील माहिती देण्यात येणार असल्याचेही भारती या वेळी म्हणाले
(sakaal,3rd june)
Sunday, June 7, 2009
गरम पावभाजी टाकण्याचे "ते' कृत्य रागाच्या भरात
आरोपीला पश्चाताप
दादरच्या हॉटेल कामत येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर गरम पावभाजी टाकल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या नोकराला आज न्यायालयाने तीन हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. दरम्यान, दुपारी ऐन गर्दीची वेळी मुलगी पाणी मागत असल्याने रागाच्या भरात आपल्याकडून हे कृत्य घडल्याचे आरोपी शेंटू नाथ याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दादर पश्चिमेला असलेल्या हॉटेल कामत येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या गंगा काळे या फुलविक्रेत्या मुलीच्या अंगावर हॉटेलमधील नोकर नाथ याने गरम पावभाजी टाकली. या प्रकरणी दादर पोलिसांनी त्याला अटक केली. आज सकाळी त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका केली. या घटनेनंतर हॉटेल कामतमध्ये काम करणारा नोकर शेंटू नाथ याला चांगलाच पश्चात्ताप झाला आहे. हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी प्रचंड गर्दी असते. अशा वेळी येणाऱ्या ग्राहकांकडे लक्ष देत असताना अन्य कोणतीच कामे होत नाहीत. अशा वेळी गंगा आपल्याकडे पाणी मागण्यासाठी आली. वारंवार सांगितल्यानंतरही ती न गेल्याने रागाच्या भरात तिच्या अंगावर गरम पावभाजी टाकण्याचे कृत्य आपल्याकडून घडले, अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक महादेव बंगाळे यांनी दिली.
वडाळ्याच्या गणेशनगर येथे राहणारी गंगा आज तिच्या पायाला झालेल्या जखमेमुळे घरीच आराम करीत होती, अशी माहिती तिची चुलत बहीण संगीता काळे हिने दिली. दोन वर्षांपूर्वी तिचे वडील गोरखनाथ यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी तिची आई सोनी आणि तिने फुलविक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यात गंगाची शाळा तिसरीतच सुटली, अशी माहितीही तिच्या चुलत बहिणीने दिली.

शिक्षिकेचे अश्लील प्रोफाईल; दोन विद्यार्थ्यांना अटक
इंटरनेटवर शाळेतील शिक्षिकेचे अश्लील प्रोफाईल तयार करणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी बोरिवली येथून अटक केली. या मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
बोरिवली पश्चिमेला असलेल्या एका शाळेत शारीरिक शिक्षण हा विषय शिकविणाऱ्या महिला शिक्षिकेसोबत शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरून त्या दोघांनी शिक्षिकेचेच अश्लील प्रोफाईल ऑर्कुटवर टाकले. मार्च महिन्यात ही बाब उघडकीस आल्यानंतर या शिक्षिकेने गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी हे प्रोफाईल काढून टाकले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना हे प्रोफाईल तिच्याच शाळेत शिकणाऱ्या 14 आणि 15 वर्षे वयोगटातील दोघा विद्यार्थ्यांनी तयार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी आज दुपारी या दोघा विद्यार्थ्यांना त्यांच्या बोरिवली येथील घरातून ताब्यात घेऊन अटक केली. या दोन्ही मुलांचे पालक अतिशय उच्चशिक्षित असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली.
(sakaal,2nd june)

पाणी मागणाऱ्या मुलीवर गरम पावभाजी फेकली
दादरच्या हॉटेल कामतमधील अघोरी प्रकार; नोकराला अटक
खवय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या दादरच्या हॉटेल कामतमध्ये पिण्याचे पाणी मागायला गेलेल्या एका आठ वर्षीय मुलीच्या अंगावर तेथील नोकराने गरम पावभाजी टाकल्याचा अमानुष प्रकार आज दुपारी घडला. गरम पावभाजी पायावर पडल्याने जखमी झालेल्या या मुलीला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले; तर नोकरावर गुन्हा दाखल करून, त्याला अटक केल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली.
फुलांची विक्री करणारी गंगा गोरखनाथ काळे ही मुलगी जवळच असलेल्या हॉटेल कामतमध्ये पाणी मागण्यासाठी गेली होती; मात्र हॉटेलमधील नोकर शेंटू शंकर नाथ (24) याने तिला पाणी देण्यास नकार दिला. तहानेने व्याकूळ झालेल्या गंगाने पुन्हा एकदा पाण्यासाठी विनवणी केली. या वेळी शेंटू नाथ याने तव्यावरील गरम पावभाजी तिच्या अंगावर टाकली. पावभाजीच्या चटक्यांमुळे वेदना असह्य झाल्याने गंगाने आक्रोश केला. तिच्या रडण्याच्या आवाजाने जवळच फुलांची विक्री करणारी तिची चुलतबहीण आणि अन्य एक महिला हॉटेलसमोर आल्या. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडे या कृत्याचा जाब विचारायला सुरुवात केली. हॉटेलबाहेर आरडाओरड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलकडे धाव घेतली. त्यांनी लगेचच गंगाला केईएम रुग्णालयात पाठविले; तर तिच्या अंगावर गरम पावभाजी टाकणारा नोकर शेंटू शंकर नाथ याला अटक केली. उपचारानंतर गंगाला घरी पाठविण्यात आले. तिच्या गुडघ्याखाली जबर जखम झाल्याचे दादर पोलिसांनी सांगितले.
आपली बहीण हॉटेलमध्ये केवळ पाणी मागण्यासाठी गेली होती; मात्र नोकराने तिला पशूसारखी वागणूक दिली, असे गंगाची मोठी बहीण संगीता काळे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
------------
चौकट
पोलिसांचे कानावर हात
या घटनेनंतर अधिक माहिती घेण्यासाठी दादर पोलिस ठाण्यात गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तेथील पोलिस उपनिरीक्षक जालिंदर थोरात यांनी हात वर करीत आमच्याकडे अशा कोणत्याही घटनेची नोंद नसल्याचे सांगितले. आपण स्वत: दिवसभर येथे बसलो आहोत. यासंबंधी त्यांनी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात चौकशी करण्यास सांगितले. या वेळी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात संपर्क साधला असता, अशी कोणतीही घटना आमच्याकडे दाखल नसल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण घटनाक्रमाच्या वेळी दादर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उंडे हजर नव्हते. ते येईपर्यंत प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी गर्दी केली होती. जखमी गंगाला पोलिस ठाण्याच्याच मागील बाजूला असलेल्या खोलीत ठेवण्यात आल्याचे कळताच प्रसारमाध्यमांनी तेथे धाव घेतली. या वेळी तिची छायाचित्रे काढण्यास पोलिसांनी मज्जाव केला. दोन तासांनी पोलिस ठाण्यात आलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक उंडे यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली.
-----------------------------------

गृहरक्षक दलाचे जवान भत्त्यांपासून वंचित
चार महिने हाल; सरकारकडून अपुरा निधी
आपत्कालीन स्थिती, दंगल, उत्सव बंदोबस्त तसेच निवडणूक काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे गृहरक्षक दलाचे जवान गेल्या चार महिन्यांपासून मासिक भत्त्यांपासून वंचित आहेत. राष्ट्रकार्याच्या नावाखाली अक्षरशः राबविल्या जाणाऱ्या या जवानांना सरकारकडून मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे भत्त्यांसाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागते.
आपत्कालीन स्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्था म्हणून गृहरक्षक दलही काम करते. पोलिसांसोबतच अहोरात्र काम करणारे हे जवान मात्र गरज संपल्यानंतर अनेकदा दुर्लक्षिले जातात. राज्यात असलेल्या 42 हजार 948 गृहरक्षक दलाच्या जवानांपैकी साडेसहा हजार जवान फक्त मुंबईत कार्यरत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने या शहरातील पोलिसबळ अपूर्ण असल्याने प्रत्येक लहान-मोठ्या घडामोडींच्या वेळी पोलिसांना गृहरक्षक दलाचीच मदत घ्यावी लागते. उत्सवांचे बंदोबस्त, वाहतूक नियमन, रेल्वे सुरक्षा आदी महत्त्वाचे बंदोबस्त गृहरक्षक दलावर सोपविले जातात. या जवानांच्या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना दिवसाला दोनशे रुपये भत्ता देण्याचा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत घेतला. यापूर्वी त्यांना दिवसाला नव्वद रुपये भत्ता दिला जात असे. समाजकार्याची आवड असलेल्यांनी त्यांची नेहमीची कामे सांभाळून स्वयंसेवी तत्त्वाने केवळ राष्ट्रकार्य म्हणून या दलात सहभागी होण्याची यापूर्वीची संकल्पना होती. मात्र, वाढती बेरोजगारी तसेच पोलिस भरतीत ठेवण्यात आलेले पाच टक्के आरक्षण यामुळे या दलाकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर ओढला गेला. यात अल्प उत्पन्न गट तसेच झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे.
सरकारने या जवानांच्या भत्त्यात केलेल्या भरघोस वाढीनंतर गृहरक्षक दलात काम करणाऱ्या या जवानांचा हुरूप वाढला. मात्र, सुधारित भत्ता मिळण्यासाठी या जवानांना तब्बल पाच महिने वाट पाहावी लागली. गृहरक्षक दलाच्या जवानांना सप्टेंबरपासूनचा भत्ता जानेवारी महिन्यात देण्यात आला. फेब्रुवारीपासून आजतागायत या जवानांना दैनंदिन कामाचा भत्ताच मिळालेला नाही. त्यामुळे अनेकदा अतिसामान्य कुटुंबातून आलेल्या या जवानांत नाराजीचा सूर आहे.
या जवानांच्या भत्त्यात करण्यात आलेल्या भरघोस वाढीमुळे प्रशासनामार्फत सरकारकडे अनेकदा मागणी करूनही भत्त्यासाठीचा निधी पूर्ण उपलब्ध होत नाही. यापूर्वी वर्षांला 42 कोटी रुपयांचे असलेली आर्थिक तरतूद नव्वद कोटींपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे जवानांना भत्ते देताना अडचणी येत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गृहरक्षक दलातील जवानांच्या भत्त्यासाठी सरकारकडून वेळोवेळी निधी उपलब्ध होत आहे. त्यानुसार राज्यभरात असलेल्या जवानांना भत्त्यांचे वितरण केले जात असल्याची माहिती या दलाचे उपमहासमादेशक बी. एन. राऊत यांनी "सकाळ' शी बोलताना दिली. यंदा लोकसभा निवडणूक काळातही राज्यभरात 36 हजार गृहरक्षक दलाचे जवान सेवेवर होते. त्यांना या कालावधीसाठी आगावू भत्ते देण्यात आले. मुंबईत कार्यरत असलेल्या जवानांना काही तांत्रिक अडचणींमुळे दैनंदिन भत्त्यांचे वितरण लांबले आहे. जवानांना हे भत्ते मिळण्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
(sakaal, 1st june)

बॉम्बस्फोटाची धमकी - बालगुन्हेगाराला कर्नाटकात अटक
"मुंबईत पाच ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे अवघे दोन तास आहेत.' प्रसिद्ध वृत्तवाहिनीला अशा आशयाच्या धमकीचा ई-मेल पाठविणाऱ्या चौदा वर्षांच्या बालगुन्हेगाराला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे. प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शहा याच्या "ए वेन्स्डे' या चित्रपटातून प्रेरणा घेऊन हे कृत्य केल्याची कबुली या बालगुन्हेगाराने दिली आहे.
बेगळूरुच्या विजयानगर येथे राहणाऱ्या या बालगुन्हेगाराने शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला हा ई-मेल पाठविला. वृत्तवाहिनीने यासंबंधीची माहिती तातडीने सायबर गुन्हे शाखेला कळविली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. या वेळी हा ई-मेल कर्नाटक येथून पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तातडीने बेंगळूरुच्या विजयानगर येथे गेले. त्यांनी एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. या मुलाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा प्रकार आपण "ए वेन्स्डे' या चित्रपटाची प्रेरणा घेऊन केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. या मुलाने ज्या संगणकावरून हा मेल पाठविला त्या संगणकाची हार्ड डिस्क ताब्यात घेतली आहे.
(sakaal,31st may)

दोन विमानांची धडक टळली..!
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून उड्डाण घेण्यासंबंधी मिळालेल्या सूचनांबाबत गफलत झाल्याने आज सकाळी दोन विमानांची समोरासमोर धडक लागून होणारा मोठा अपघात केवळ पायलटच्या प्रसंगावधानामुळे टळला. अगदी शेवटच्या क्षणी पायलटने ब्रेक दाबल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मात्र, या घटनेनंतर दोन्ही विमानांत असलेल्या दोनशेहून अधिक प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन मार्फत आज काढण्यात आले आहेत.
मुंबई विमानतळावर सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. विमानतळाच्या धावपट्टीवरून जेट एअरवेजचे मुंबईहून कोलकत्यासाठी जाणारे विमान उड्डाण घेणार होते. या विमानात 120 प्रवाशी आणि चार लहान मुलांचा समावेश होता. याचवेळी 104 प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे 348 क्रमांकाचे मुंबई - दिल्ली - शांघाय हे विमानही उड्डाण घेणार होते. या दोन्ही विमानांना हवाई वाहतूक नियंत्रित ठेवणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून उड्डाणाच्या सूचनाही देण्यात आल्या. दोन्ही विमानांना उड्डाणासंबंधी मिळालेल्या हिरव्या सिग्नलमुळे त्यांच्या पायलटनी विमानांचे इंजिन सुरू केले. यानंतर ही दोन्ही विमाने एकमेकांसमोर येऊन टेकऑफ घेणार तोच जेट एअरवेजच्या पायलटच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने अगदी शेवटच्या क्षणी ब्रेक दाबून पुढील अनर्थ अक्षरशः टाळला. अचानक झालेल्या या घटनेनंतर दोन्ही विमानांत बसलेल्या शेकडो प्रवाशांचे जणू तोंडचे पाणीच पळाले. यानंतर या दोन्ही विमानांची उड्डाणे काही काळ थांबविण्यात आली. दोन्ही विमाने धावपट्ट्यांवर तिरक्या रेषेत होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सने आपल्या विमानाला उड्डाण घेण्यासंबंधीच्या सूचना दिल्या. मात्र, ऐन वेळी हे उड्डाण थांबविण्यात आल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर आपल्या पायलटला धावपट्टी क्रमांक 14-32 वरून उड्डाण घेण्याच्या स्पष्ट सूचना मिळाल्या होत्या. हा संदेश आपल्यासाठीच असल्याचे समजून एअर इंडियाच्या विमानावर असलेल्या पायलटने मुख्य धावपट्टी क्रमांक 9-27 वरून उड्डाण घेण्यास सुरुवात केल्याचे जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांचे म्हणणे आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स विभागाकडून या घटनेसंबंधी प्रतिक्रिया देण्याकरिता कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही.
दरम्यान, मुंबई विमानतळावर दोन विमानांची एवढी मोठी घटना टळल्यानंतर डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशनने (डीजीसीए) या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेले कॉकपिट वॉईस रेकॉर्डर आणि फ्लाइट डाटा रेकॉर्डरची पडताळणी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. विमानाच्या उड्डाणापूर्वी पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांच्यात झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग यात उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यातूनच या घटनेला जबाबदार असलेल्यांचा शोध घेता येणार असल्याचे डीजीसीएतील सूत्रांनी सांगितले. जेट एअरवेजच्या विमानाला उड्डाणाचे निर्देश मिळाले असताना एअर इंडियाच्या पायलटने उड्डाण घेण्याची घाई का करावी, याचाही तपास केला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Subscribe to:
Posts (Atom)