Monday, January 4, 2010
विश्वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार
निलंबनाचा प्रस्ताव; आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही गंडांतर
मुंबई, ता. 2 ः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डी. के. राव याच्यासोबत ख्रिसमसच्या पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज गृह खात्याकडे पाठविला. आयपीएस अधिकारी असलेला एक उपायुक्त आणि एका सहायक आयुक्तासह चार अधिकारी; तर एका पोलिस शिपायाचा समावेश आहे.
चेंबूरच्या एका खासगी क्लबमध्ये ख्रिसमसनिमित्त झालेल्या पार्टीत डी. के. राव याच्यासोबत राजन टोळीचे सराईत गुंडही उपस्थित होते. छोटा राजन टोळीचा खास हस्तक तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीला मुंबई पोलिस दलात विशेष शाखेत उपायुक्त म्हणून काम करणारे विश्वास साळवे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रकाश वाणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तुळशीदास काकड, ठाणे येथील एक पोलिस निरीक्षक खळतकर आणि एक पोलिस शिपाई साळुंखे अशा पाच पोलिसांची उपस्थिती होती, असे सांगितले जाते. गेली तेरा वर्षे खून आणि खंडणीच्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगल्यानंतर तब्बल 30 गुन्ह्यांतून मुक्त झालेल्या डी. के. राव याच्यासोबत पार्टीला राजन टोळीचा सराईत गुंड फरीद तनाशा, सुनील पोतदार यांनीही हजेरी लावली होती. गुंडांसोबत झालेल्या या पार्टीला पोलिसांची उपस्थिती क्लबमध्ये बसविण्यात आलेल्या क्लोज सर्किट कॅमेऱ्याने टिपली. पहाटेपर्यंत गुंडांच्या हजेरीत पाहुणचार घेणाऱ्या या पोलिसांच्या चौकशीचे निर्देश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल दिले होते. या पार्टीचे व्हिडीओ क्लिप्स, छायाचित्रे व्यक्तिशः पाहिल्यानंतर या पाचही जणांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठविल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी प्रसिद्धिमाध्यमांना दिली. या पोलिसांची चौकशी होईपर्यंत या पोलिसांना निलंबित ठेवण्यात यावे, असेही या प्रस्तावात सांगण्यात आले आहे. या सर्व पोलिसांविरुद्ध सबळ पुरावे असल्यानेच शिवानंदन यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या पार्टीला उपस्थित असलेल्या अन्य उपस्थितांचे जबाब पोलिसांकडून नोंदवून घेण्यात येणार असून त्यांना साक्षीदार बनविले जाणार असल्याचेही पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, चेंबूरच्या जिमखान्यात झालेल्या त्या पार्टीला मी उपस्थितच नव्हतो. माझा त्या पार्टीशी आणि त्यातील लोकांशी कसलाच संबंध नाही. मला या प्रकरणात नाहक गोवले जात आहे. यासंबंधी आपण न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पोलिस उपायुक्त विश्वास साळवे यांनी सांगितले. तर, आपण त्या जिमखान्याचे सदस्य आहोत. तेथे आपण पत्नीसोबत जेवण घेण्यास गेलो होतो. प्रसिद्धिमाध्यमांनी दिलेले वृत्त हे आपल्याविरुद्धचे षड्यंत्र असल्याचा दावा सहायक पोलिस आयुक्त प्रकाश वाणी यांनी केला आहे.
(sakal,3rd january)
नववर्षाच्या स्वागतात थिरकली मुंबई!
"थर्टी फर्स्ट'चे जमके सेलिब्रेशन
ंमुंबई ः नववर्षाचे स्वागत अवघ्या मुंबईने मोठ्या जल्लोषात केले. "मद्य'रात्रीच्या नशेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सरकारनेही पहाटे पाच वाजेपर्यंत मद्यशाला सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने तळीरामांची चांगलीच सोय झाली. छोटीमोठी हॉटेल्स, बार आणि ढाबेही खचाखच भरून गेले होते. घड्याळाचा काटा प्रत्येक सेकंदागणिक मध्यरात्रीकडे जसा सरकरत होता तशी तरुणाई बेभान होत होती. डीजे-म्युझिक सिस्टीम्सच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होती. पर्यटकांच्या फेव्हरीट गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉइंट, गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा या परिसरांत अवघ्या मुंबापुरीचा आनंद ओसंडून वाहत होता. पंचतारांकित हॉटेलांतील "हाय प्रोफाईल' सेलिब्रेशनही चांगलेच रंगले होते. दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या "न्यू ईयर सेलिब्रेशन'वर दुःखाची किनार होती. यंदा मात्र मुंबईकरांनी जमके सेलिब्रेशन केले. मुंबई पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवल्याने गुलाबी थंडीतला "थर्टी फर्स्ट' सोहळा जल्लोष, रोषणाई, आतषबाजी आणि पार्ट्यांच्या माहोलात निर्विघ्नपणे पार पडला.
मोठमोठ्या हॉटेलांपासून रस्त्यावरील गल्लोगल्ल्यांमध्ये जल्लोषाची धुंदी होती. रंगीबेरंगी कपड्यांतील तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष काही औरच होता. घड्याळाचा काटा बाराच्या जवळ येत होता तस तसे उत्साहाला उधाण येत होते. बारा वाजायला अवघे एक मिनीट शिल्लक असताना तरुणाईने आनंदाने काऊंटडाऊनला सुरुवात केली. चार... तीन... दोन आणि "हॅप्पी न्यू इअर' असे म्हणताच सगळ्यांनीच "चिअर्स' केले. प्रत्येकांनी एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आकाशात फटांक्यांची आतषबाजी झाली. "बाय बाय 2009' असा संदेश असलेले असंख्य फुगे सोडण्यात आले. तरुणाईने आपल्या मित्र-मैत्रिणींना आलिंगन देत असतानाच, फटाक्यांचा कडकडाट, टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजराने पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या नववर्ष स्वागताने अवघी मुंबापुरी सुखावली.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या वर्षी नववर्ष स्वागताचे कार्यक्रमच रद्द झाले होते. यंदा आनंदाची बेसुमार उधळण करीत गेल्या वर्षीची कसरही मुंबईकरांनी पुरती भरून काढली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर यंदा मोठ्या संख्येने बाहेर पडणार याची कल्पना असल्याने मोठमोठे हॉटेल्स, बार, रिसॉर्ट आणि पब्समध्ये जंगी तयारी करण्यात आली होती. "थर्टी फर्स्ट' पार्ट्यांत ग्रुपसोबत सामील व्हायचे असल्याने खासगी कंपन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी आपापली कामे उरकून सायंकाळपासूनच पार्ट्यांचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली.
मोठमोठी हॉटेल्स आणि पब्समध्ये डिक्सथेकच्या तालावर तरुणाईने अक्षरशः बेधुंद होत नववर्षाचे स्वागत केले. गेल्या वर्षी अतिरेकी हल्ल्यात लक्ष्य ठरलेल्या कुलाब्याच्या "लिओपोल्ड कॅफे'तही हा उत्साह ओसंडून वाहत होता.
पूर्व उपनगरांतही थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची कसलीच वानवा नव्हती. काही ठिकाणी सोसायट्या आणि वसाहतींतच नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत धमाल केली जात होत होती. "थर्टी फर्स्ट'ला गुरुवार आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असला तरी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत नववर्षाचे साधेपणाने जंगी स्वागत केले. बार वा हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा अनेकांनी घरीच नववर्ष स्वागताचा बेत केला होता. मित्रमंडळींसह घरीच पार्टी साजरी करीत शहराच्या रस्त्यांवर उशिरापर्यंत मनमोकळे फिरत अनेकांनी "2010'चे मोठ्या उत्साहाने स्वागत केले. आगामी वर्ष सुखसमृद्धीचे असेल, अशी आशा मनात ठेवत पहाटेपर्यंत हे सेलिब्रेशन सुरूच होते.
"थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'
वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतुकीचे अतिशय चांगल्या प्रकारे नियमन केल्यामुळे वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होती. अतिशय कडाक्याच्या थंडीत "थर्टी फर्स्ट'पेक्षा "ड्युटी फर्स्ट'ची आठवण असलेला सामान्य पोलिस सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवार सायंकाळपासूनच ठिकठिकाणी तैनात होता. नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांत यापूर्वी मुलींच्या छेडखानीच्या घडलेल्या प्रकारांमुळे मुंबईला शरमेने मान खाली घालावी लागल्याचे प्रकार घडले होते. यंदा असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पाइंट आणि मरीन ड्राईव्हपासून गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू व अक्सा अशा सर्वच चौपाट्यांवर होणाऱ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठीही पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. ठिकठिकाणी दिसणाऱ्या साध्या वेशातील पोलिसांचा वचक गर्दीत वावरणाऱ्या काही मद्यधुंद तरुणांत होता. गर्दीत संशयास्पद वावरणाऱ्यांना ताब्यात घेणे तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची पोलिसांची मोहीम बुधवार रात्रीपासूनच सुरू झाली होती. महिला वाहनचालकांचीही कसून तपासणी केली जात होती. "ब्रेथ ऍनालायजर'च्या साहाय्याने मद्यधुंद वाहनचालकांचा वाहतूक पोलिस शोध घेत होते. प्रसंगी नुसत्या वासानेच "तळीरामां'ना गाडीबाहेर काढले जात होते.
(sakal,2nd january)

720 तळीराम वाहनचालकांवर कारवाई
पाच हजार जणांनी मोडले वाहतुकीचे नियम
मुंबई, ता. 1 ः नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्याचे प्याले रिचवून वाहने चालविणाऱ्या 720 तळीरामांवर; तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजारपेक्षा जास्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आजवर अवघ्या एका रात्रीत वाहनचालकांवर झालेल्या कारवाईचा हा उच्चांक असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी नववर्ष स्वागताच्या रात्री 544 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली होती.
नववर्ष स्वागताच्या वेळी दारू पिऊन गाड्या चालविण्याच्या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काल रात्री शहरात ठिकठिकाणी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविली. प्रमुख रस्ते, चौक आणि नाक्यांसह आडवाटांवरूनही मद्यपी वाहनचालक हातून सुटून जाऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिस तयारीत होते. रात्री आठ वाजल्यापासून मद्यपींविरुद्ध सुरू झालेल्या या मोहिमेत 720 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा धाक राहावा यासाठी काही ठिकाणी "स्पीड चेकगन' हातात घेऊन कारवाईसाठी सज्ज असलेल्या पोलिसांचे कटआऊट लावण्यात आले होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच हजार वाहनचालकांवर वेगवेगळ्या कलमांखाली कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी दिली. वाहतूक पोलिसांच्या ठिकठिकाणी असलेल्या उपस्थितीमुळे यावर्षी नववर्ष स्वागताच्या दिवशी शहरात अपघाताची कोणतीही गंभीर घटना घडली नसल्याचेही बर्वे यांनी सांगितले.
कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यापैकी 170 वाहनचालकांच्या प्रकरणात न्यायालयाने निर्णय दिला. त्यापैकी 141 वाहनचालकांना एक ते दहा दिवसांपर्यंत साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली, तर एका वाहनचालकाला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. सुनावणीला अनुपस्थित असलेल्या 28 जणांवर न्यायालयाने वॉरंट बजावले. कारवाई झालेल्या मद्यपी वाहनचालकांपैकी दोघांना पोलिसांनी दुसऱ्यांदा पकडले. त्यातील एकाला दोन दिवसांची साधी कैद आणि सहा महिन्यांकरिता वाहतूक परवाना निलंबित करण्याची, तर दुसऱ्याला तीन हजार रुपयांचा दंड आणि सहा महिने परवाना निलंबित करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. आज सुनावणी झालेल्या वाहनचालकांपैकी 157 जणांचा परवाना सहा महिन्यांकरिता, तर तीन जणांचा परवाना दोन वर्षांकरिता निलंबित करण्यात आला आहे.
यंदा गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, दादर, गिरगाव, जुहू, वर्सोवा येतील समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी मुंबईकरांची उसळणारी गर्दी लक्षात घेता ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. पहाटे उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांची वाहनचालकांविरुद्धची ही मोहीम सुरू होती. यावर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवरही पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्यामुळे याठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या नसल्या तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सह पोलिस आयुक्त बर्वे यांनी सांगितले.
(sakal, 1st january)

बुलेटप्रूफ जॅकेटच्या गहाळ फाईलचे भूत घालणार धुमाकूळ
आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना हलगर्जीपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस
मुंबई, ता. 31 ः पोलिस आयुक्त कार्यालयातून गहाळ झालेल्या बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीच्या फाईलचे भूत नव्या वर्षातही पोलिस दलातील आठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर बसणार आहे. या जॅकेट खरेदीचा व्यवहार झाल्याच्या 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त, तसेच मुख्यालयाचे उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ अधिकाऱ्यांना ही फाईल जपून न ठेवल्याप्रकरणी गृह खात्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक, तसेच सहपोलिस आयुक्त पदाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे सहपोलिस आयुक्त हेमंत करकरे यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेट गहाळ झाले होते. पोलिसांना देण्यात आलेले हे जॅकेट निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ते गहाळ करण्यात आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांना पुरविण्यात आलेल्या या बुलेटप्रूफ जॅकेटचा दर्जा तपासण्यासाठी माहितीच्या अधिकारात या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी व्यवहाराच्या फाईलची मागणी करण्यात आली होती; मात्र ही फाईल गहाळ झाल्याचे उत्तर पोलिसांकडून देण्यात आले होते. त्यामुळे बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याच्या संशयाला बळकटी आली होती. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रशासन विभागातून गहाळ झालेली ही फाईल गेल्या आठवड्यात आश्चर्यकारकरीत्या सापडली. अर्धवट व अस्ताव्यस्त अवस्थेत सापडलेल्या या फाईलमधील अनेक महत्त्वपूर्ण पाने बेपत्ता असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिस आयुक्त कार्यालयातून 2008 मध्ये ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताब्यात ही फाईल असणे अपेक्षित होते, त्या तिघांची चौकशी करून, त्यासंबंधीचा अहवाल गृह खात्याला पाठविण्यात आला. गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी या अहवालावर कारवाई करीत असतानाच 2002 पासून मुंबईत प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त व मुख्यालय-1 चे पोलिस उपायुक्त म्हणून काम केलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. 2002 मध्ये या बुलेटप्रूफ जॅकेटच्या खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याने तेव्हापासून आजपर्यंत या पदांवर काम केलेल्या सर्व अधिकाऱ्यांकडून गहाळ झालेल्या या फाईलबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात पाठविण्यात आलेल्या या नोटिशीबाबत 2 जानेवारीपर्यंत या अध
िकाऱ्यांनी आपली उत्तरे द्यायची आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट खरेदीची फाईल हाताळण्याबाबत केलेल्या हलगर्जीपणाबाबत आपल्यावर कारवाई का केली जाऊ नये, अशा आशयाची ही नोटीस असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य सचिव चंद्रा अय्यंगार यांनी दिली. नोटीस बजावलेल्या या अधिकाऱ्यांत गृह खात्याचे विद्यमान प्रधान सचिव व 2003-05 या काळात सहपोलिस आयुक्त म्हणून कारभार पाहणारे प्रेमकृष्ण जैन, अतिरिक्त पोलिस महासंचालक सुभाष आवटे (2005-07), विद्यमान सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे यांचा समावेश आहे. मुख्यालयाचे विद्यमान पोलिस उपायुक्त विजयसिंह जाधव यांच्यासह पाच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांतून सहपोलिस आयुक्तपदी असलेले व पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेले माजी आयपीएस अधिकारी धनंजय जाधव (2001-02), कायदा व सुव्यवस्था विभागाचे माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व सध्या दीर्घ रजेवर असलेले संजीव दयाळ (2002-03) यांना आश्चर्यकारकपणे वगळण्यात आले आहे. जाधव निवृत्त झाल्यामुळे; तर दयाळ प्रदीर्घ रजेवर असल्याने त्यांना ही नोटीस देण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण अय्यंगार यांनी दिले.
(sakal,1st january)
Thursday, July 30, 2009
पोलिस महासंचालक विर्क यांना मुदतवाढ
केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक आणि अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत केलेल्या उल्लेखनीय कामांच्या जोरावर राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लावण्यावरून राज्यातील सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले काही दिवस सुरू असलेले मतभेद विर्क यांना मिळालेल्या मुदतवाढीनंतर शमले आहेत. येत्या 31 जुलै रोजी विर्क निवृत्त होणार होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने यंदा 13 मार्च रोजी विर्क यांची पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली. नेमणुकीनंतर विर्क यांना अवघ्या चार महिन्यांचा कालावधी मिळाला. यापूर्वी पंजाबमध्ये पोलिस महासंचालक म्हणून काम केलेल्या विर्क यांनी तेथे मोडून काढलेला दहशतवाद तसेच आगामी काळात राबवायच्या नक्षलविरोधी अभियानाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ मिळण्यास महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जाते. ऑक्टोबर अखेरपर्यंत काम करण्याची संधी मिळालेल्या विर्क यांच्या कार्यकाळातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पोलिस महासंचालकपदावर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये तीव्र मतभेद झाले होते. विर्क यांच्या निवृत्तीनंतर या पदावर ए. एन. रॉय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आग्रही होता. त्यानंतर मात्र निवृत्तीच्या दारात असलेल्या विर्क यांनी दिल्लीत असलेल्या आपल्या जुन्या संपर्काच्या जोरावर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींच्या गाठीभेटी घेतल्या. यानंतरच त्यांना या पदावर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास हिरवा कंदील मिळाल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात येते. राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांना नुकतीच सरकारने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांना मुतदवाढ दिली जात असेल तर पोलिस महासंचालकांच्या बाबतीत दुजाभाव केला जाऊ नये, अशी भूमिका घेत सरकारने विर्क यांच्या मुदतवाढीला हिरवा कंदील दाखविला.
मूळचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी असलेल्या विर्क यांची बॅच 1970 ची आहे. केंद्र सरकारच्या प्रतिनियुक्तीवर गेल्यानंतर 23 वर्षे ते पंजाबमध्ये कार्यरत होते. पंजाबमध्ये त्यांना पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटकही झाली होती; मात्र कायदेशीर लढाई लढत या सर्व आरोपांतून ते निर्दोष मुक्त झाले. सध्या महाराष्ट्राचे तेहतीसावे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या विर्क यांनी मिळालेल्या मुदतवाढीबाबत समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि गृहमंत्री जयंत पाटील यांनी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही विर्क या वेळी म्हणाले.
काम करीत राहणार ः विर्क
आपल्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण काम करीत राहणार आहोत. मुदतवाढ मिळाल्यानंतर येत्या काळात दहशतवाद आणि नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जाणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी व्यक्त केली. फोर्सवन, शीघ्र कृती दल आणि दहशतवादविरोधी पथकात सुधारणा घडवून आणण्यासाठी येत्या काळात पावले उचलली जाणार आहेत. ही तिन्ही दले अधिक सक्षम करीत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहोत. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत कमी होत आहे. गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम स्थापण्यात येणार असल्याचेही विर्क यांनी सांगितले.
(sakaal,29 th july)

आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य पोलिस दलातील आयपीएस आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह खात्याने केल्या आहेत. काल रात्री उशिरा जाहीर झालेल्या या बदल्यांमुळे अनेक महिने रिक्त असलेल्या पोलिस दलातील महत्त्वाच्या पदांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. येत्या आठवडाभरात आणखी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या आणि बदल्यांचे संकेत गृह खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.
बदल्या झालेल्या या अधिकाऱ्यांची नावे आणि नवीन नियुक्तीचे ठिकाण पुढीलप्रमाणे. कंसात सध्याचे पद - एन. पी. म्हस्के ( मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधान मंडळ) - पोलिस अधीक्षक - नंदुरबार , डॉ. आर. ए. शिसवे (पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग)- पोलिस अधीक्षक - बुलडाणा, ए. व्ही. देशभ्रतार (पोलिस अधीक्षक, बुलडाणा)- पोलिस अधीक्षक, धुळे, पी. एस. पाटणकर (पोलिस अधीक्षक, हिंगोली ) - पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग, के. जी. पाटील ( पोलिस अधीक्षक, नंदुरबार) - पोलिस अधीक्षक, हिंगोली, एस. व्ही. कोल्हे ( पोलिस अधीक्षक , धुळे) - पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, नागपूर , मधुकर वसावे (पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, नागपूर) - प्राचार्य पी. टी. एस. नाशिक, डॉ. जय जाधव ( पोलिस उपायुक्त , नाशिक )- पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा , पुणे , एस. आर. चव्हाण ( पोलिस अधीक्षक महामार्ग , पुणे)- पोलिस अधीक्षक , राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे , डॉ. सुरेश मेखला (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ) - पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, डी. एम. फडतरे (पोलिस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण )- पोलिस उपायुक्त, पुणे शहर , एम. के. भोसले (पोलिस उपायुक्त, अमरावती ) - पोलिस उपायुक्त ल - विभाग, मुंबई , ए. आर. मोराळे ( अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण )- पोलिस उपायुक्त परिमंडळ -5 , ठाणे शहर , बी. जी. शेखर ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस अधीक्षक महामार्ग सुरक्षा, ठाणे , एस. डी. आवाड ( पोलिस अधीक्षक , महामार्ग सुरक्षा, ठाणे) - नियुक्तीच्या प्रतीक्षेत, सी. जी. दैठणकर ( पोलिस उपायुक्त, मुख्यालय , ठाणे शहर ) - पोलिस उपायुक्त , परिमंडळ -2 , भिवंडी , बी. एस. शिंदे (पोलिस उपायुक्त, परिमंडळ -5 , ठाणे ) - पोलिस उपायुक्त परिमडंळ - 3, ठाणे शहर , एस. टी. राठोड (पोलिस अधीक्षक, एसीबी, नांदेड )- पोलिस उपायुक्त , मुख्यालय, ठाणे शहर, आर. एल. पोकळे (महाराष्ट्र पोलिस अकादमी , नाशिक)- अपर पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण , कैसर खलीद (समादे
शक, राज्य राखीव पोलिस बल , गट क्रमांक -4, नागपूर)- पोलिस उपायुक्त, रेल्वे, मुंबई, पी. सी. पाटील (अपर पोलिस अधीक्षक, बारामती) - प्राचार्य , पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नानवीज, पुणे, आर. आर. ननावरे (पोलिस अधीक्षक, पीसीआर, औरंगाबाद ) - अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर , डॉ. प्रभाकर बुधवंत (पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर) - पोलिस उपायुक्त, अमरावती शहर, सी. के. कानडे (पोलिस उपायुक्त परिमंडळ-2, नागपूर ) - पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई , बी. एम. ग्वालबंसी ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्रं-3, जालना) - समादेशक , रा.रा.पो.बल. गट क्र-6, धुळे, सी. एस. जानराव ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र-6, धुळे ) - समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र.-5, दौंड , आर. एम. लाडके ( समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र.-5, दौंड, पुणे)- समादेशक, रा.रा.पो.बल, गट क्र.-3,
ेजालना., अमर जाधव (पोलिस उपायुक्त, अभियान, मुंबई )- पोलिस उपायुक्त, गुन्हे प्रकटीकरण-1, एस. आर. पारसकर (नियुक्तीच्या प्रतीक्षेत)- पोलिस उपायुक्त, अमली पदार्थविरोधी पथक, मुंबई , ब्रिजेश बहादूरसिंग (समादेशक, रा.रा.पो.बल. गट क्र-11. नवी मुंबई)- पोलिस उपायुक्त, परिमंडळ-8, पी. पी. मुत्याळ (नियुक्तीच्या प्रतीक्षेत)- पोलिस उपायुक्त, परिमंडळ-10, मुंबई, के. एम. एम. प्रसन्ना (पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-10, मुंबई)- नियुक्तीच्या प्रतीक्षेत, आर. के. मोरे (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक) - अपर पोलिस अधीक्षक, खामगाव, बुलडाणा, राजेश प्रधान (पोलिस अधीक्षक, गडचिरोली ) - पोलिस अधीक्षक, यवतमाळ, एम. एम. रानडे (पोलिस उपायुक्त, मुंबई )- पोलिस उपायुक्त, नागपूर शहर, यशस्वी यादव (पोलिस अधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर)- पोलिस अधीक्षक, कोल्हापूर , सी. जी. कुंभार ( पोलिस अधीक्षक, कोल्हापूर )- पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे , नवीनचंद्र रेड्डी (उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई ) - पोलिस उपायुक्त, मुख्यालय, औरंगाबाद शहर , एस. डी. वाघमारे (पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर) - अपर पोलिस अधीक्षक, बीड , पी. बी. सावंत ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस उपायुक्त, दहशतवादविरोधी पथक , मुंबई , एस. एस. तडवी (पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अधीक्षक, नाशिक)- पोलिस उपायुक्त, मुंबई, एच. एन. पवार ( प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, अकोला) - पोलिस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती , एन. एम. पारधे (प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, जालना) - प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण विद्यालय, नागपूर), एस. जे. सागर (पोलिस अधीक्षक, भंडारा) - पोलिस अधीक्षक, एसीबी, अमरावती, व्ही. के. परदेशी ( पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग , औरंगाबाद) - पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर , एम. बी. तांबडे (पोलिस उपायुक्त, औरंगाबाद शहर)- समादेशक , भारत राखीव बटालियन, औरंगाबाद , निशिथ मिश्रा (पोलिस अधीक्षक, नक्षलवादविरोधी अभियान, नागपूर) - पोलिस अधीक्षक, भंडारा, एस. जयकुमार ( अपर पोलिस अधीक्षक, गडचिरोली) - पोलिस अधीक्षक, गडचिरोली, एस. ए. मोहेकर (अपर पोलिस अधीक्षक, अंबाजोगई, बीड) - अपर पोलिस अधीक्षक, जालना, एस. टी. बोडखे ( पोलिस अधीक्षक, यवतमाळ ) - मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधान मंडळ, मुंबई, के. ई. जाधव ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत ) - पोलिस उपायुक्त, नागपूर शहर , श्रीमती ए. एम. भित्रे ( पोलिस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा )- पोलिस उपायुक्त, वाहतूक, मुंबई , एस. व्ही. शिंत्रे ( पोलिस उपायुक्त, ठाणे शहर ) - पोलिस उपायुक्त, मुंबई, एम. जे. भोईर (पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई)- पोलिस उपायुक्त, अभियान , मुंबई, निसार तांबोळी ( पोलिस उपायुक्त , परिमंडळ -8) - पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा , मुंबई , एस. एच. महावरकर ( नियुक्तीच्या प्रतीक्षेत )- पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई.
(sakaal, 28 th july)

आता पोलिस नियंत्रण कक्षांत कमांड सेंटर
दोन महिन्यांत आमूलाग्र बदल घडविणार : शिवानंदन
आपत्कालीन स्थितीत नागरिकांना पोलिस नियंत्रण कक्षांतून विनाविलंब प्रतिसाद मिळावा, याकरिता या कक्षांतच कमांड सेंटरही तयार करण्यात येणार आहेत. येत्या काळात नियंत्रण कक्षांत होणाऱ्या या व अन्य आमूलाग्र बदलांकरिता 2 कोटी 60 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना दिली.
तरुण पिढीसोबत सुसंवाद साधण्याकरिता मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या www.copconnect.in या वेबसाईटचे उद्घाटन आज चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात करण्यात आले. याप्रसंगी मुंबईच्या नगरपाल इंदू सहानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन तरुणाईत व्यसनाधीनता तसेच अमलीपदार्थांचे सेवन वाढत असल्याचे चित्र आहे. अशा विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीकडे नेण्याकरिता काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने या वेबसाईटच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाणार आहे. याशिवाय परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने प्रबोधन केले जाणार आहे.
एक कोटी 60 लाख लोकसंख्येच्या मुंबईत प्रत्येकाच्या कारवायांकडे मर्यादित पोलिस बळाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. अशा वेळी तरुण पिढीने पोलिसांचे डोळे होऊन पोलिसांना मदत करावी, असे आवाहन या वेळी शिवानंदन यांनी केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पोलिस नियंत्रण कक्षात येत्या दोन महिन्यांच्या काळात लक्षणीय सुधारणा घडविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांत संभाषण कौशल्य वाढावे याकरिता वांद्रे-कुर्ला संकुल येथे कार्यशाळा घेण्यात येत आहे. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यासारख्या घटनेला चोख उत्तर देण्यासाठी पोलिस दलाला अत्याधुनिक प्रशिक्षण देऊन सुसज्ज करण्यात येत आहे. आपत्कालीन स्थितीत बॉम्ब तसेच अत्याधुनिक स्फोटकांची ओळख व्हावी तसेच बॉम्बशोधक व विनाशक पथक येईपर्यंत ती हाताळता यावीत याकरिता तीनशे पोलिसांना नायगाव येथे विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दक्षतेचा इशाऱ्याने घबराट नको
मुंबई, दिल्ली यांसह जगभरातील प्रमुख शहरे नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असतात. या शहरांत घातपाती कारवायांची शक्यता कधीच नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून नेहमीच सतर्कता बाळगण्यात येते. पोलिसांनी दक्ष राहावे यासाठी गुप्तचर यंत्रणांकडून वेळोवेळी अहवाल पाठविण्यात येतात. याचा अर्थ त्या शहराला लगेचच अतिरेकी हल्ल्याचा धोका आहे असे म्हणणे चुकीचे आहे. प्रसिद्धिमाध्यमांत येणाऱ्या अशा बातम्यांनी नागरिकांत नाहक घबराट पसरत असल्याचेही शिवानंदन यांनी या वेळी सांगितले.
(sakaal,25 th juyl)

Subscribe to:
Comments (Atom)