Tuesday, October 23, 2007

मुंबई,ता.23 ःबहिणीशी प्रेम करणाऱ्या तरूणाला तिच्या दोघा भावांनी साथीदारांच्या मदतीने दंडूक्‍याने बेदम मारहाण करून त्याला तीन तासांहून अधिक काळ शौचालयाच्या सेप्टी टॅंकमध्ये कोंडून ठेवल्याची खळबळजनक घटना जोगेश्‍वरी येथे घडली.याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असुन सेप्टी टॅंकमधुन वेळीच बाहेर काढल्याने बचावलेल्या या तरूणावर लोकमान्य टिळक रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
रफिक बाबुमिया शेख (33,रा.रामगडचाळ,जोगेश्‍वरी) असे या मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे.याच परीसरात राहणाऱ्या एका तरूणीवर रफिकचे प्रेम आहे.तरूणीच्या दोन भाऊ अकबर (27) आणि परवेज (25) यांना या प्रेमप्रकरणाची माहिती झाली.त्यांनी याबाबत रफिकला मज्जावही केला होता.सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रफिकला दोघांनी अंधेरीच्या गावदेवी डोंगर येथील उस्मानिया डेअरी जवळ अडविले.यावेळी त्यांच्यासोबत असेलल्या दोघा साथीदारांच्या मदतीने त्यांनी रफिकला दंडूक्‍याच्या सहय्याने बेदम मारहाण केली.या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या रफिकला ठार मारण्यासाठी नजीकच असलेल्या शौचालयाच्या सेप्टी टॅंकमध्ये कोंबले.यानंतर त्यांनी टॅंकचे झाकण बंद करून तेथून पळ काढला.तीन तासांहून अधिक काळ सेप्टीक टॅंकमध्ये कोंडून ठेवलेला रफिकची जीव वाचविण्यासाठी सुरु ओरड तेथुन जाणाऱ्या एका वाटसरुने ऐकली.या वाटसरुने टॅंकचे झाकण उघडून पाहिले असता त्यात रफिक जखमी अवस्थेत पडल्याचे त्याला आढळले.त्याने याघटनेची तातडीने पोलिसांना माहित दिली.यानंतर आलेल्य पोलिसांनी त्याला तत्काळ शीव येथील लोकमान्य टिळक रूग्णालयात दाखल केले.त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.दरम्यान,त्याने दिलेल्या फिर्यादीवरून डी.एन.नगर पोलिसांनी तरूणीचे अकबर व जावेद या दोन भावांसह मुन्ना (25) व नुरमोहम्मद (25) यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.त्यांच्या चौकशीअंती पोलिसांनी तीघांना अटक केली आहे.नुरमोहम्मद याला अटक करणे बाकी असल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस निरिक्षकांनी दिली.या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.रफिक याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.