Wednesday, May 27, 2009

पवनराजे हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत

राकेश मारिया ः पाच जणांचा शोध सुरू

तीन वर्षांपूर्वी नवी मुंबईत कळंबोली येथे कॉंग्रेसनेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या झालेल्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा जणांना अटक केली. पवनराजे यांच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात आणखी पाच आरोपींचा शोध घेण्यात येत असून हत्येमागे असलेल्यांची नावे गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला कळविल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

कळंबोली स्टील मार्केटजवळ 3 जून 2006 रोजी कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा चालक समद काझी या दोघांची अनोळखी मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्येनंतर मारेकऱ्यांनी शस्त्र तेथेच टाकून हिरव्या रंगाच्या टाटा इंडिका गाडीतून पळ काढला होता. या हत्येप्रकरणी सुरवातीला स्थानिक पोलिसांमार्फत तपास सुरू होता. या हत्येचा तपास योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप करीत पवनराजे निंबाळकर यांच्या नातेवाइकांनी हा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने हा तपास ऑक्‍टोबर -2008 मध्ये सीबीआयकडे सोपविला होता. गुन्हे शाखेच्या युनिट -5 च्या पोलिसांना 25 फेब्रुवारी रोजी शाहूनगर येथे दरोडा घालणाऱ्या टोळ्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी एक जण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा घालून पारसमल ताराचंद भडाला ऊर्फ पारस जैन (47, रा. डोंबिवली) याला अटक केली. या वेळी त्याच्याकडे दोन पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर आणि 12 जिवंत काडतुसे मिळाली होती. त्याच्या चौकशीत त्याने लोकमान्य टिळक मार्ग व भायखळा येथे दरोडे घालणाऱ्या टोळीला शस्त्र पुरविल्याची माहिती मिळाली. पोलिस कोठडीत तब्बल दोन महिने झालेल्या चौकशीनंतर जैन याने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणातील सहभागाची कबुली दिली. या वेळी त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तीस लाख रुपयांच्या सुपारीसाठी पवनराजे यांची हत्या केल्याचे सांगितले. त्याच्याच माहितीवरून पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे राहणारा दिनेश राममणी तिवारी (37) या कुख्यात गुंडाला अटक केली. पवनराजे निंबाळकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोघा मारेकऱ्यांत दिनेश तिवारीचाही समावेश होता. पवनराजे यांची हत्या कर
णाऱ्या तिवारीवर यापूर्वी उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते राम पाठक यांच्या मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. पवनराजे निंबाळकर हे त्यांच्या एका जमिनीचा व्यवहार पारसमल जैन याच्यासोबत करणार होते. याचसंबंधी चर्चा करण्याच्या नावाखाली जैन याने पवनराजे निंबाळकरांना नवी मुंबईत बोलावले होते. कळंबोली स्टील मार्केटजवळ निंबाळकर यांची गाडी येताच जैन याच्यासोबत असलेला दिनेश तिवारी आणि अन्य एका मारेकऱ्यांनी पवनराजे आणि त्यांच्या चालकाला गोळ्या झाडून ठार मारले होते. पवनराजे यांच्या हत्येचा कट मुंब्रा येथील विश्‍वास रम्मी क्‍लबमध्ये सात जणांनी आखला होता. या हल्ल्यापूर्वी पवनराजे यांच्यावर आरोपींनी दोनदा हल्ल्याचा प्रयत्न केला होता, असेही मारिया यांनी या वेळी सांगितले. या हत्येसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मारेकऱ्यांचा वापर करण्यात आला. हत्येसाठी लागणाऱ्या शस्त्रखरेदीसाठी सुरवातीला पाच लाख रुपये; तर काम झाल्यानंतर उरलेले पंचवीस लाख रुपये आरोपींना देण्यात आले होते. या हत्येसंबंधी आणखी धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली असून या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला ही माहिती कळविण्यात आल्याचेही मारिया म्हणाले. दरम्यान, गुन्हे शाखेने अटक केलेल्या या दोघा आरोपींना सीबीआयच्या कस्टडीत ठेवण्यात आले आहे.


(sakal, 26 th may)

विद्यापीठातील उपनिबंधकाला 40 हजारांची लाच घेताना अटक

शहापूर येथील एका बी. एड. महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची मान्यता मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या उपनिबंधकाला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने फोर्ट येथील मुंबई विद्यापीठाच्या इमारतीतील कार्यालयात 40 हजार रुपये घेताना अटक केली. आज सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.
प्रकाश मारुती गोसावी असे या लाचखोर उपनिबंधकाचे नाव आहे. शहापूर येथील एका शिक्षण संस्थेला बीएड महाविद्यालय सुरू करण्याची मंजुरी राज्य सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिली होती. या महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाची संलग्नता मिळण्यासाठी संस्थेचे संस्थापक व अध्यक्षांनी विद्यापीठात अर्ज केला होता. यानंतर विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समितीने डिसेंबर 2008 मध्ये महाविद्यालयाचे निरीक्षण करून जानेवारीमध्ये विद्यापीठाला अहवाल दिला होता. गेल्या महिन्यात विद्यापीठाच्या संलग्नता मान्यता विभागाचा उपनिबंधक प्रकाश गोसावी याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे संलग्नता मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार संस्थेच्या अध्यक्षांनी गोसावी याला दहा हजार रुपये दिले. लाचेचे उरलेले चाळीस हजार रुपये देण्याआधी त्यांनी याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार आज सायंकाळी फोर्ट येथील विद्यापीठाच्या इमारतीतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाकडून 40 हजार रुपये घेताना या पथकाने गोसावी याला अटक केली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत उपनिबंधकपदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यावर झालेली ही वर्षभरातील पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जाते.


(sakal,26th may)

यापुढे पोलिसांना कमांडो प्रशिक्षण सक्तीचे

पी. पी. श्रीवास्तव ः दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी निर्णय

राज्य पोलिस दलात नव्याने भरती होणाऱ्या प्रत्येक पोलिस शिपायाला तीन महिन्यांचे कमांडो ट्रेनिंग सक्तीचे करण्यात आले आहे. पोलिस ठाण्यांच्या पातळीवरदेखील प्रत्येक पोलिसाला अत्याधुनिक शस्त्रांचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पी. पी. श्रीवास्तव यांनी दिली. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होत असतानाच पोलिसांकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

मुंबई हल्ल्यानंतर पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाकडे राज्य सरकारने अधिकाधिक लक्ष दिले आहे. अतिरेक्‍यांशी मुकाबला करण्याकरिता पोलिस दलात अत्याधुनिक शस्त्रे आणि सुरक्षा उपकरणांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसांना आवश्‍यक तो निधीही उपलब्ध झाला आहे. बहुसंख्य अद्ययावत शस्त्रे व सुरक्षा उपकरणांची परदेशातून आयात करायची असल्याने त्यांना विलंब होत असल्याची कबुली श्रीवास्तव यांनी या वेळी दिली. शस्त्र आणि सुरक्षा उपकरणांची वाट न पाहता पोलिसांना दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हाताळण्याचे फारसे ज्ञान नसल्याचे उघडकीस आले. यानंतर प्रत्येक पोलिसाला अत्याधुनिक शस्त्रांच्या हाताळणीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात "क्विक रिस्पॉन्स टीम'ची स्थापना करण्यात आली आहे. अतिरेकी हल्ला समर्थपणे परतवून लावण्यासाठी "फोर्स वन' पथक तयार केले जात असून या पथकाचे प्रशिक्षण पुण्यात सुरू आहे. अशाच प्रकारचे कमांडो प्रशिक्षण पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या सात हजार पोलिसांना देण्यात आले आहे. यापुढील काळात हे प्रशिक्षण सक्तीचे केले जाणार आहे.
पोलिसांनी सागरी सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. नौदल, सीमा सुरक्षा दल आणि पोलिस संयुक्तरीत्या मुंबईसह राज्याच्या सागरी सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील आहेत. या तिघांच्या संयुक्त उपक्रमातून अनेकदा समुद्रात "राहबंदी' लावण्यात येते. मुंबईत असलेल्या 54 लॅण्डिंग पॉइंटस्‌वर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही या वेळी श्रीवास्तव म्हणाले. या वेळी कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षक रश्‍मी शुक्‍ला व सुरक्षा व संरक्षण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त विनय कारगावकर हेही उपस्थित होते.


(sakal, 26 th may)

आता समाजकार्य करायचे आहे..!

अश्‍विन नाईक ः ठाकरे भेटीमागे कोणतेही राजकारण नाही

मी अंडरवर्ल्ड डॉन नाही. माझ्या आयुष्यातील तो अतिशय वाईट काळ होता. आता मला समाजकार्य करायचे आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही. सध्यातरी राजकारणात प्रवेश करण्याचा आपला कोणताही इरादा नाही. राजकारणाबाहेर राहूनही सामाजिक काम करता येते, असे वक्तव्य पूर्वाश्रमीचा अंडरवर्ल्ड डॉन अश्‍विन नाईक याने पत्रकारांशी बोलताना केले.
न्यायालयातून आजवर दाखल झालेल्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर मुंबईत स्वगृही परतलेला पूर्वाश्रमीचा गॅंगस्टर अश्‍विन नाईक याने आज घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्याच्या पुढील वाटचालीची माहिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपले आयडॉल आहेत. त्यांना भेटण्याची इच्छा अनेक वर्षे मनात होती. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली. या भेटीमागे कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, असेही नाईक या वेळी म्हणाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट हा निव्वळ एक योगायोग होता. ते राहत असलेल्या इमारतीसमोरच आपले गुरू राहतात. त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. तेथून बाहेर पडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेल्या काही जुन्या मित्रांनी आपल्याला राज ठाकरे यांची भेट घडवून दिली. राज यांनी उचललेला मराठीचा मुद्दा योग्य आहे. यापूर्वी हा मुद्दा शिवसेना उचलत होती. मराठी माणसांचा आपल्याला अभिमान आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर बोलताना त्यांचा कौटुंबिक वाद आहे. दोघे एकत्र आले तर चांगले होईल, असेही मत त्याने मांडले. तुरुंगवासाच्या कालावधीत आपण आपले वडील, पत्नी आणि अतिशय जवळच्या लोकांना गमावले आहेत. यापुढे आपण आपल्या दोन मुलांसोबत राहणार आहोत. आपले कोणाशीही वैर नाही. ज्यांना असे वाटत असेल त्यांचे देव भले करो. यापुढे आपला जुना बांधकाम व्यवसाय सांभाळणार आहोत, असेही अश्‍विन नाईक म्हणाला. आपल्याला येत्या काळात सामाजिक कार्यात भाग घ्यायचा आहे. विशेषत्वाने खेळाकडे आपण जास्त भर देणार आहोत. हॉकी आणि बॉक्‍सिंग या खेळात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही नाईक याने या वेळी सांगितले.

धमकीची चिठ्ठी सापडल्याने विमानाचे इनर्जन्सी लॅंडिंग

"यू ऑल वील बी डेड, बाय...! ' असा मजकूर असलेली चिठ्ठी मस्कतहून चेन्नईला जात असलेल्या विमानाच्या प्रसाधनगृहात एका हवाईसुंदरीला सापडल्याने कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता पायलटने हे विमान तातडीने मुंबई विमानतळावर उतरविले. त्यानंतर विमानाची बॉम्बशोधक आणि विनाशक तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या मदतीने संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर विमानात आक्षेपार्ह असे काहीच आढळले नसल्याचे सांगण्यात आले. विमानातील प्रवाशांना मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मुंबई विमातळावर ताटकळत राहावे लागले.

ओमन एअरवेजचे बोईंग 737 जातीचे तसेच डब्ल्यूवाय- 857 क्रमांकाचे विमान मस्कत येथून चेन्नईकडे जात होते. मुंबईजवळ असताना या विमानाच्या प्रसाधनगृहात गेलेल्या एका हवाईसुंदरीला एक चिठ्ठी आणि एक इलेक्‍ट्रॉनिक सर्किट जोडलेला धातूचा तुकडा सापडला. हवाईसुंदरीने याची माहिती पायलटला कळविली. पायलटने तातडीने मुंबई विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळताच दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास हे विमान मुंबई विमानतळावर उतरले. या वेळी विमानात असलेल्या सर्वच्या सर्व 110 प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक आणि विनाशक तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी या विमानाची कसून तपासणी केली. विमानात सापडलेला धातूचा तुकडा आणि चिठ्ठीचे परीक्षण करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली

(sakal,25th may)

समर्थ कामगार सेनेच्या कार्यालयावर हल्ला

राणेसमर्थकांना अटक ः फर्निचर, वाहनाची तोडफोड

समर्थ कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या अंधेरी येथील कार्यालयावर राणेसमर्थकांनी आज दुपारी हल्ला चढविला. या हल्ल्यात परब यांच्या कार्यालयातील फर्निचर आणि वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिस ठाण्यात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्या सहा समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याच्या वेळी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून कामगार नेते जयवंत परब आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात वाढत असलेल्या कटुतेमुळे हा हल्ला झाल्याचे बोलले जाते.

अंधेरी पश्‍चिमेला डी. एन. नगर परिसरात गणेश चौक येथे असलेल्या समर्थ कामगार सेनेच्या कार्यालयावर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास राणे समर्थकांनी हल्ला चढविला. या वेळी कार्यालयात असलेल्या नंदू कलगुटकर या कामगाराला मारहाण करून हल्लेखोरांनी कार्यालयातील सामानांची तोडफोड सुरू केली. या वेळी कार्यालयात कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी राजेश जाधव (40), नितीन नारायण (33), रामदत सुर्वे, अमिन तांडेल (30), संजय दोडके (36) आणि मेहूल जोशी (36) यांना अटक केली आहे. या हल्ल्याच्या वेळी नीतेश राणे हेही उपस्थित होते.

तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या समर्थकांत कामगार नेते जयवंत परबही होते. या कालावधीत राणे यांनी सुरू केलेल्या समर्थ कामगार सेनेची धुरा श्रीकांत सरमळकर आणि जयवंत परब यांच्यावर सोपविण्यात आली. पक्षश्रेष्ठींविरुद्ध केलेल्या उघड बंडामुळे नारायण राणे यांना सहा महिन्यांपूर्वी कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात आले. मात्र, या वेळी राणे यांच्या भूमिकेला परब यांनी पाठिंबा दिला नव्हता. राणे यांच्यासोबत न जाण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे गेल्या काही महिन्यांपासून समर्थ कामगार सेनेत अंतर्गत वाद सुरू होते. राणे यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही राणेसमर्थक आणि जयवंत परबसमर्थकांत असलेली धुसफुस सुरूच होती. त्यातच लोकसभा निवडणुकीत राणे यांना परबसमर्थकांकडून फारसे सहकार्य न झाल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे समर्थ कामगार सेनेचे चिटणीस दत्ता तांडेल यांनी "सकाळ'ला सांगितले. या वेळी राणेसमर्थकांनी 175 कंपन्यांच्या फाईल पळवून नेल्याचा आरोपही तांडेल यांनी या वेळी केला.

समर्थ कामगार सेनेच्या कार्यालयावर झालेला हल्ला कामगारांनी उत्स्फूर्तपणे केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून समर्थ कामगार सेनेचे संस्थापक नारायण राणे यांच्याविषयी अपशब्द वापरणे; तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली वावरणाऱ्या कामगारांवर अन्याय करण्याचे प्रकार संघटनेच्या कार्यालयातून सुरू होते. कामगारांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी आपण या कार्यालयात गेलो. मात्र, काही कामगारांनी या ठिकाणी अचानक तोडफोडीला सुरुवात केली. आपण या प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत असल्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी "सकाळ'ला सांगितले.


(sakal,25th may)

इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये थरार

सशस्त्र दरोडा ः जिगरबाज सुरक्षा रक्षकाचा अंत; दरोडेखोर पसार

मुंबई विमानतळाला लागूनच असलेल्या इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये शिरलेल्या चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी टर्मिनलमधील सुमारे 35 लाख रुपये किमतीची सोने आणि चांदीची नाणी असलेल्या चार पेट्या आज सकाळी पळवून नेल्या. या दरोडेखोरांना अडविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीखाली येऊन जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. कार्गो टर्मिनलवर दिवसाढवळ्या पडलेल्या या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली असून या अतिसंवेदनशील परिसरातून दरोडेखोर सहज पळून गेल्यामुळे या संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

सांताक्रूझ येथील आंतरदेशीय विमानतळाला लागूनच असलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोने आणि चांदीच्या नाण्यांच्या सहा पेट्या हैदराबाद येथील पिडीलाइट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीला पाठविण्यासाठी आणण्यात आल्या. या संपूर्ण मालमत्तेची एकूण किंमत 54 लाख 93 हजार एवढी आहे. जोगेश्‍वरी येथील नॅशनल रिफायनरीज कंपनीमार्फत पाठविण्यात आलेल्या पेट्यांची इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये तपासणी सुरू होती. सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास अचानक तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या तिघा रिव्हॉल्व्हरधारी तरुणांनी तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरवात केली. या वेळी दरोडेखोरांनी तेथे उपस्थित असलेले नॅशनल रिफायनरीज कंपनीचे कर्मचारी दिलीप बोरकर यांच्या डाव्या डोळ्यावर रिव्हॉल्व्हरने प्रहार केला. कार्गो टर्मिनसमध्ये दरोडेखोर शिरल्याचे कळताच तेथील कर्मचाऱ्यांनी एकच आरडाओरड सुरू केली. तोपर्यंत दरोडेखोरांनी सोने आणि चांदीची नाणी असलेल्या चार पेट्या इंडिका गाडीत टाकल्या आणि ते गाडीत बसून पळून जाऊ लागले. या दरोडेखोरांना गेटवर उभ्या असलेल्या डी. एस. भोसले या सुरक्षारक्षकाने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांची गाडी त्याला जोरदार धडक देऊन निघून गेली. गाडीसोबत दहा-बारा फूट फरफटत गेलेले भोसले जबर जखमी झाले. त्यांना तातडीने गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच भोसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ घुगे यांनी दिली.
ज्या इंडियन एअरलाइन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये हा प्रकार घडला तेथून विमानतळ पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे. या कार्गो टर्मिनलवर इंडियन एअरलाईन्सचे सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची शस्त्रे पुरविलेली नाहीत. विमानतळाचा परिसर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अखत्यारित येतो. मात्र कार्गो टर्मिनसच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्यांच्याकडे नसल्याबद्दलची खंत एअर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष डी. के. शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

इंडियन एअरलाईन्सच्या कार्गो टर्मिनलमध्ये दरोडा घालणारे दरोडेखोर शेजारीच असलेल्या जेट एअरवेजच्या कार्गो टर्मिनलमधून गेल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. या कार्गो टर्मिनसमध्ये सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी घेतली गेलेली नाही. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ घुगे यांनी सांगितले.


(sakal, 25th may)

Sunday, May 24, 2009

वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी 34 अधिकाऱ्यांची नियुक्ती

54 पोलिस अधिकाऱ्यांना बढती

लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदावर पदोन्नती मिळाल्यानंतर रिक्त असलेल्या 34 जागांवर आज नवीन नेमणुका करण्यात आल्या. याशिवाय पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या अन्य 54 अधिकाऱ्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर बढती देण्यात आली आहे.

राज्य पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सहायक पोलिस आयुक्तपदावर नेमणुका झाल्यानंतर मुंबईतील तीसहून अधिक पोलिस ठाण्यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षकच नव्हते. या पोलिस ठाण्यांचा कारभार, अतिरिक्त कार्यभार देऊन पोलिस निरीक्षकांमार्फत चालविला जात होता. लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्ताच्या कालावधीत या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करणे बाकी होते. निवडणुका संपल्यानंतर गेले काही महिने रिक्त असलेली वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची ही पदे आज भरण्यात आली. त्यानुसार 34 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना पोलिस ठाण्यांच्या ठिकाणी नेमणुका देण्यात आल्या आहेत. 1981 व 1983 च्या बॅचच्या 54 पोलिस निरीक्षकांनाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यात 1983 च्या बॅचमधील 35 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नव्याने झालेल्या नेमणुकांपैकी शाहूनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. ए. गुंडेवाडी यांची शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नेमणूक झाली. घाटकोपरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी. टी. पडवळ यांची बदली गुन्हे शाखेत, जोगेश्‍वरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंधेरी येथे, तर धारावीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. आर. ठाकूर यांची कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बदली झाली. पदोन्नतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक झालेल्या अधिकाऱ्यांपैकी बी. एच. भावले यांची नेमणूक आझाद मैदान, एस. आर. धनेधर यांची साकी नाका, एस. एस. सूर्यवंशी यांची पंतनगर, पी. एस. जोडगुजरी यांची शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी झाली. याशिवाय आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर जुईकर हे ऍन्टॉप हिल, तर नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक परशुराम काकड हे दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कारभार संभाळणार आहेत. सांताक्रूझ पोलिस ठाण्यात एम. पी. चौधरी, गावदेवी पोलिस ठाण्यात एस. डब्ल्यू. दिवाडकर, तर ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात एस. बी. जगताप वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून रुजू होणार आहेत. जोगेश्‍वरीला आर. व्ही. भोसले यांची, तर पार्कसाईटला एस. एम. घुगे यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली.
माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्याचे एस. पी. बाबर, शिवाजी पार्कचे विलास गुरव, आझाद मैदानचे प्रकाश शिशुपाल आणि दहिसरचे आर. व्ही. केणी यांची स्थानिक शस्त्र शाखेत नेमणूक करण्यात आली.

(sakal,23rd may)

चालकाचा खून करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक

मुंबई- पुणे एक्‍स्प्रेसवेवर चालकाचा खून करून कारचोरी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला वांद्रे पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. चोरी केलेल्या या कारची विक्रीसाठी जोगेश्‍वरी येथे आलेल्या या चोरट्यांच्या चौकशीत कारचालकाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अर्चना त्यागी यांनी दिली.

जोगेश्‍वरी पश्‍चिमेकडील 24 कॅरेट सिनेमागृहासमोर चोरीच्या कारची विक्री करणाऱ्या टोळीतील सदस्य येणार असल्याची माहिती परिमंडळ -9 चे पोलिस उपायुक्त निकेत कौशिक यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने 18 मे रोजी दुपारी सापळा रचून इनोव्हा गाडीतून आलेल्या तिघांपैकी प्रवीण निमसे (24) याला अटक केली. या वेळी रफिक बैरी (29) आणि सोहेल खान (23) हे साथीदार पळून गेले. या वेळी कारची झडती सुरू असताना पोलिसांना कारमध्ये दोन टॉवेल, दोरखंड, चप्पल आणि दोन शर्ट सापडले. याच वेळी चालकाच्या सीटजवळ रक्‍ताचे डागही आढळले. प्रवीण आणि त्याच्या साथीदारांनी गंभीर गुन्हा केला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली. तेव्हा कारचोरीसाठी साथीदारांच्या मदतीने एका कारचालकाचा खून केल्याची कबुली त्याने दिली. इनोव्हा कार भाडेतत्त्वावर घेऊन मुंबई- पुणे एक्‍स्प्रेसवेवर तळेगाव फाट्यानजीक कारचालक बाळासाहेब कामठे (25, रा. कात्रज) याचा खून केला. खुनानंतर आरोपींनी कामठे याचा मृतदेह भोसरी येथे एका कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला होता.
निमसे याच्या चौकशीत उघडकीस आलेल्या या धक्कादायक माहितीनंतर पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेऊ लागले. प्रवीणकडून मिळालेल्या माहितीवरून फरारी असलेले त्याची साथीदार मिरा रोड येथे राहत असल्याचे कळले. त्यातील दोन आरोपी भरत बोटे (26) आणि उबेद खान (29) हे दोघे जोगेश्‍वरी येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दोघांना पोलिसांनी 20 मे रोजी सापळा रचून अटक केली. या प्रकरणातील उर्वरित आरोपी सोहेल, जावेद आणि रफिक या तिघांना काल मिरा रोड येथील नयानगर परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली.


(sakal, 22 nd may)

अपना सहकारी बॅंकेवर दरोडा

नायगावमधील घटना ः शस्त्राच्या धाकाने 29 लाख पळविले

भोईवाडा पोलिस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नायगावच्या अपना सहकारी बॅंकेच्या स्ट्रॉंग रूमधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या कॅशियर आणि सुरक्षा रक्षकाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील सुमारे 29 लाख रुपयांची रोकड जबरीने चोरून नेल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सदाकांत ढवण उद्यानासमोर असलेल्या या बॅंकेत सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. पहिल्या मजल्यावर असलेल्या या बॅंकेचा स्ट्रॉंग रूम इमारतीच्या तळमजल्यावर आहे. कॅशियर अरुण लावंड बॅंकेचे नियमित आर्थिक व्यवहार सुरू करण्याकरिता लागणारी रक्कम काढण्यासाठी सुरक्षा रक्षक अनिल कांबळे यांच्यासोबत स्ट्रॉंग रूममध्ये गेले. लावंड स्ट्रॉंग रूमधून पैसे काढत असताना सुरक्षा रक्षक कांबळे बाहेर थांबला होता. पैशाने भरलेली बॅग घेऊन लावंड बाहेर पडताच समोरून आलेल्या दोघा अनोळखी चोरट्यांनी लावंड आणि कांबळे या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्या हातातील रोख रकमेची बॅग हिसकावून घेतली. पुढच्याच क्षणात दोघेही चोरटे एका मारुती कारमधून पळून जाऊ लागले. त्यानंतर कॅशियर लावंड व सुरक्षा रक्षक कांबळे या दोघांनीही आरडाओरडा केला; मात्र त्यापूर्वीच गोविंद केणी मार्गाच्या दिशेने मारुती कारमधून हे चोरटे पळून गेले. घडलेल्या प्रकाराची माहिती बॅंक व्यवस्थापनाने लगेचच भोईवाडा पोलिसांना दिली. चोरट्यांनी पळविलेल्या बॅगेत 28 लाख 75 हजार 344 रुपयांची रोकड होती. पोलिसांनीही या परिसरात काही क्षणातच नाकाबंदी केली.
या प्रकरणी अनोळखी चोरट्यांविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळची वेळ असल्याने बॅंकेची सुरक्षा व्यवस्थाही तेवढी सक्षम नव्हती. याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंबादास गदादे यांनी सांगितले. कॅशियर लावंड स्ट्रॉंग रूममधून रोख काढण्यासाठी गेले असताना बाहेर उभा असलेला सुरक्षा रक्षक निःशस्त्र होता, असेही गदादे म्हणाले. या घटनेनंतर भोईवाडा परिसरात एकच घबराट पसरली होती. या चोरीनंतरही आज दिवसभर बॅंकेचे व्यवहार सुरळीत होते, अशी माहिती बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


(sakal,22nd may)

गडचिरोली - विशेष मोहीम राबविणार ः विर्क

नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सोळा पोलिस शहीद

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सोळा पोलिस शहीद झाल्याच्या घटनेनंतर या परिसरात वाढत्या नक्षलवादाचा बीमोड करण्याकरिता लवकरच "विशेष ऑपरेशन' सुरू केले जाणार असून उद्या (ता. 22) सकाळी या भागाच्या पाहणीसाठी आपण गडचिरोली येथे जात असल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
गडचिरोलीपासून 55 किलोमीटर आत असलेल्या धानोरा तालुक्‍यातील मुरूम गावात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दोन गाड्यांवर केलेल्या हल्ल्यात सोळा पोलिस शहीद झाले. नक्षलवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळताच त्या त्या परिसरात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी अधिकाधिक पोलिस घेऊन चाल करायची असते; मात्र मुरूम येथे नेमणुकीवर असलेले अधिकारी अय्यर यांनी नक्षलवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळताच कोणालाही न सांगता उपलब्ध पोलिसांना दोन वाहनांत घेऊन गेले. वाटेत कापलेल्या झाडांच्या आड लपलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गाड्यांवर गोळीबार केला. या वेळी पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. मात्र पोलिसांच्या तुलनेत नक्षलवादी संख्येने फारच जास्त असल्याने 16 पोलिस शहीद झाले. या परिसरात निवडणूक काळात पोलिसांनी लावलेल्या चोख बंदोबस्तामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा बसला होता. या ठिकाणी झालेल्या 56 टक्के मतदानामुळे येथील नागरिकांनी नक्षलावादाला भीक घातली नसल्याचे चित्र होते. याचाच सूड उगवण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही कारवाई केली असावी. या परिसरातील नक्षलवाद नेस्तनाबूत करण्यासाठी विशेष पावले उचलण्यात येणार आहेत. उद्या सकाळी या भागाची पाहणी करून पुढचा कृती आराखडा ठरविला जाईल, असेही विर्क या वेळी म्हणाले. याच वेळी या हल्ल्यामागील कारण शोधण्याचाही प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


(sakal, 21st may)

कसाबच्या जबाबाची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे

परराष्ट्र मंत्रालय पाककडे पुरावा सोपविणार

मुंबई हल्ल्यातील अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्या कबुली जबाबाची प्रत गुन्हे शाखेने नुकतीच केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपविली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही प्रत पुराव्याच्या स्वरूपात पाकिस्तानकडे सुपूर्द केल्याचे वृत्त आहे.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. खटल्याच्या सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल दहा हजारहून अधिक पानांचे आरोपपत्र न्यायालयासोबतच केंद्रीय गृहखात्याकडेही दिले होते. अतिरेकी कसाबने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेला कबुली जबाब गुन्हे शाखेने विशेष न्यायालयात दिला नव्हता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना या कबुली जबाबाची प्रत उपलब्ध मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने ही प्रत विशेष न्यायालय; तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दोन आठवड्यांपूर्वी दिली आहे. केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कसाबच्या कबुली जबाबाची ही प्रत पाकिस्तानला पुरावा म्हणून दिल्याचे सांगण्यात येते.


(sakal, 20th may)

मालाड येथे शाळकरी मुलीवर बलात्कार

तरुणाला अटक ः सोनसाखळी चोरीचे तब्बल सव्वीस गुन्हे

तेरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या तरुणाला चारकोप पोलिसांनी अटक केली. दोन आठवड्यांपूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची कबुलीही त्याने दिली. काही वर्षांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या या तरुणावर सोनसाखळी चोरीचे तब्बल सव्वीस गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

प्रीतेश गणेश दोशी (24) असे या आरोपीचे नाव आहे. मालाडच्या एस.व्ही.रोडवर राहणारा हा गुन्हेगार काल दुपारी मालाड येथील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीला वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करून रिक्षातून मढ आयलंड येथे घेऊन गेला. या वेळी विद्यार्थिनीच्या मैत्रिणींनी हा प्रकार तिच्या आईला कळविला. तिने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार चारकोप पोलिस ठाण्यात दाखल केली. दोन तासांनंतर ही मुलगी परत तिच्या घरी रिक्षाने आली. मढ आयलंड येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने आईला सांगितले. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलीला पोलिस ठाण्यात असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींच्या छायाचित्रांची ओळख पटविण्यास दिल्यानंतर त्यातील एकाला तिने ओळखले. या छायाचित्रांद्वारेच पोलिसांनी प्रीतेश दोशीला काल रात्री अटक केली.

दोन आठवड्यांपूर्वी बॉलिवूडमधील अभिनेत्याच्या तेरा वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्याशीही अतिप्रसंग केल्याची कबुलीही प्रीतेशने अधिक चौकशीत पोलिसांना दिली आहे. या अभिनेत्याच्या मुलीला आरोपीची ओळख पटविण्याकरिता आज चारकोप पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेहून परतलेल्या या विकृत तरुणावर मुंबईत सोनसाखळी चोरीचे तब्बल 26 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सहा चारकोप पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दाखल आहेत. त्याला आज न्यायालयाने 25 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती चारकोप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. एस. गावंडे यांनी दिली.


(sakal, 20th may)

पावसामुळे ठिक-ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा

दक्षिण आणि मध्य मुंबईसह पश्‍चिम उपनगरात पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे आज सायंकाळी या उपनगरातील रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वाहतूक शाखेचे पोलिस रात्री उशिरापर्यंत अचानक पडलेल्या शिडकाव्यामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावरील वाहतुकीचे नियमन करताना ठिक-ठिकाणी दिसत होते.
मुंबईत आज सायंकाळी पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने कासवगतीने चालत होती. चेंबूरचा अमरमहाल उड्डाणपूल, विक्रोळी एसव्हीएलआर उड्डाणपूल, जोगेश्‍वरी- विक्रोळी लिंकरोड, माहीमचा सेनापती बापट मार्ग, माहीम चर्च तसेच गोरेगाव येथील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा बोजवारा उडाला. पावसामुळे निसरड्या झालेल्या या रस्त्यांवर ठिक-ठिकाणी सांडलेल्या वाहनातील तेलामुळे दुचाकी वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यातच ठिक-ठिकाणी सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांमुळे रस्त्यांवर चांगलाच चिखल निर्माण झाला होता. नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत येणारे कित्येक वाहनचालक सायंकाळच्या सुमारास घरी परतत असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवर चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या वेगाला चांगलाच ब्रेक लागला होता. पावसामुळे झालेली ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस रात्री उशिरापर्यंत ठिक-ठिकाणी तैनात होते. पावसामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यांवर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या अपघातांच्या किरकोळ घटना घडल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दिली.


(sakal,20th may)

टाटा' औषध गैरव्यवहारातील आरोपींची मुंबईत घरे

सीबीआय ः अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करणार

कर्करोगावरील उपचारासाठी देशात प्रख्यात असलेल्या परळच्या टाटा रुग्णालयातील शंभर कोटी रुपयांच्या औषध घोटाळ्याप्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) या घोटाळ्यात अडकलेल्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुंबईत मोक्‍याच्या ठिकाणी घरे असल्याचे आढळले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी आज येथे दिली.

कर्करोगाच्या उपचाराकरिता परळचे टाटा रुग्णालय आशेचा किरण समजले जाते. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांमुळे या रुग्णालयात उपचाराकरिता देशभरातून रुग्ण येतात. सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून कर्करुग्णांकरिता आणल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या औषधांचा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी अपहार करून त्याची खुल्या बाजारात विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. रुग्णालयात असलेल्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाकडून तयार केल्या जाणाऱ्या "फंगीझोन' आणि "फंगीसम' या दोन प्रोटोकॉल मेडिसिनची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री केली जात होती. या औषधांच्या एका डोसची किंमत सहा ते पंधरा हजार रुपये अथवा त्यापेक्षाही असते. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या औषध घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेच्या चौकशीला सुरुवात केली आहे. या चौकशीत सहाही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावे मुंबईत मोक्‍याच्या ठिकाणी घरे आढळली आहेत. तसेच बॅंकांमध्येही मोठ्या प्रमाणावर ठेवी तसेच सोन्याचे दागिनेही सापडले आहेत. या घोटाळ्यात रुग्णालयाच्या प्रशासन, लेखा आणि फार्मसी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असून या प्रकरणात लवकरच आणखी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सूतोवाचही सिंग यांनी या वेळी केले. या घोटाळ्यात सापडलेल्या सहा अधिकारी कर्मचाऱ्यांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचेही सिंग या वेळी म्हणाले.

(sakal,19 th may)

अंबानींच्या हेलिकॉप्टरमधील बिघाड पायलटला आधीच कळला असता

राकेश मारिया ः "डीजीसीए'चा अहवाल पोलिसांना उपलब्ध

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधन टाकीत दगड आणि मुरूम टाकण्याच्या घटनेसंबंधी डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचा (डीजीसीए) अहवाल गुन्हे शाखेला मिळाला आहे. या अहवालानुसार हेलिकॉप्टरने उड्डाण करण्यापूर्वीच इंजिनमध्ये झालेल्या बिघाडाची माहिती पायलटला मिळाली असती, अशी माहिती गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

कालिना येथील एअरवर्क्‍स इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हॅंगरमध्ये उभ्या असलेल्या अनिल अंबानी यांच्या बेल -412 या 13 आसनी हेलिकॉप्टरची इंधनटाकी; तसेच गिअरबॉक्‍समध्ये दगड आणि मुरूम आढळले होते. त्यामुळे संभाव्य हानीसंबंधी माहिती देणारा अहवाल या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने डीजीसीएकडे मागितला होता. त्यानुसार डीजीसीएने केलेल्या पाहणीनंतर गुन्हे शाखेला नुकताच या संपूर्ण घटनेचा अहवाल दिला आहे. या अहवालानुसार हेलिकॉप्टरमध्ये घडविण्यात आलेल्या बिघाडाची माहिती टेकऑफपूर्वीच पायलटला एका इंडिकेटरद्वारे लगेचच कळत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वीच त्यात झालेला बिघाड कळू शकला असता आणि संभाव्य हानी टाळता आली असती, असे सांगण्यात आले आहे.

अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आढळलेल्या दगड आणि मुरूमाची माहिती देणारा एअरवर्क्‍सचा तंत्रज्ञ भारत बोरगे याने विलेपार्ले येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एअरवर्क्‍सच्या तिघा कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यातील वादातून अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.


(sakal,19 th may)

राशिद मलबारीला मुंबईत आणले

गुन्ह्यांची उकल होणार ः वरुण गांधींच्या हत्येची सुपारी घेतल्याचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते आणि नवनिर्वाचित खासदार वरुण गांधी यांच्या हत्येची सुपारी घेतलेला छोटा शकीलचा विश्‍वासू साथीदार राशिद मलबारी याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल रात्री मुंबईत आणले. शकीलचा आणखी एक शार्पशूटर गुरप्रीतसिंग भुल्लर याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतेच बॅंकॉकहून मुंबईत आणले आहे. बॅंकॉकमध्ये छोटा राजनवरील हल्ल्यासह परदेशात मोठमोठे "गेम' वाजविणाऱ्या या दोघांच्या एकत्रित अटकेनंतर अंडरवर्ल्डमधील अनेक महत्त्वपूर्ण गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी व्यक्त केली आहे. छोटा राजनवरील हल्ल्यातील राशिदच्या सहभागाबद्दल थायलंड पोलिसांना कळविणार असल्याचेही मारिया यांनी सांगितले. दरम्यान, मलबारी याला आज न्यायालयाने 29 मे पर्यंत पोलिस कोठडीचे आदेश दिले आहेत.

बंगळूरुच्या भटकळ येथे लपलेल्या राशिद मलबारीला केंद्रीय गुप्तचर विभाग आणि कर्नाटक पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली. छोटा शकीलचा विश्‍वासू साथीदार असलेल्या राशिदवर मुंबईत खून आणि खंडण्यांचे अनेक गुन्हे दाखल असल्याने मुंबई पोलिसांना तो हवा होता. राशिदला आणण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक येथे गेले होते. या पथकाने त्याला काल रात्री उशिरा मुंबईत आणले असून 1996 मध्ये टिळकनगर येथे शब्बीर पठाण या गुंडाच्या हत्येप्रकरणी त्याची कस्टडी घेण्यात आली आहे.

छोटा शकीलसाठी राशिदने गुरप्रीतसिंग भुल्लर आणि आणखी पाच जणांच्या सोबतीने अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. 2005 मध्ये छोटा राजनवर बॅंकॉकमध्ये गोळीबार केल्यानंतर भुल्लर आणि राशिद हे दोघेही तेथून निसटले. अनेक दिवस ते छोटा राजनच्या मागावर होते. राशिद आणि भुल्लरसोबत त्या वेळी दोन पाकिस्तानी तरुणही होते. यानंतर दोघांनी छोटा राजन टोळीच्या एजाज लकडावालावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. 2005 मध्ये झालेल्या बाळू ढोकरे याच्या हत्येतही याच दोघांचा हात होता. 1998 मध्ये हुसैन वस्त्रा याच्या हत्येनंतर राशिद मलबारी दुबईत पळून गेला होता. त्यानंतर तो बरीच वर्षे बॅंकॉकमध्ये होता आणि नंतर तो नेपाळमध्ये पळून गेला होता.
राशिद आणि भुल्लर या दोघांच्या अटकेनंतर मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील अनेक कोरी पाने भरता येतील, असे सूचक उद्‌गार सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी काढले आहेत. या दोघांची अटक छोटा शकील आणि छोटा राजन या दोन्ही टोळ्यांच्या प्रमुख गुंडांच्या परदेशातील वास्तव्याची ठिकाणे; तसेच त्यांच्या कारवायांची माहिती मिळेल, असेही मारिया या वेळी म्हणाले.


( sakal ,18 th may)

मराठी मतांच्या विभाजनामुळे गायकवाड यांचा विजय सुकर

दक्षिण-मध्य मुंबई विश्‍लेषण



केंद्र सरकारकडून धारावीच्या विकासासाठी आणलेला कोट्यवधी रुपयांचा निधी, मतदारसंघाच्या विकासासाठी केलेली धडपड, सामान्य नागरिकांच्या लहानसहान कामांना दिलेला वाव यांच्यासह ऐनवेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराच्या स्वरूपात शिवसेनेच्या मतांचे झालेले विभाजन या जमेच्या बाजूंच्या जोरावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड विक्रमी मताधिक्‍यांनी निवडून आले. या मतदारसंघांतून सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या गायकवाड यांच्यापुढे आता "धारावी विकास प्रकल्पा'च्या सुनियोजित अंमलबजावणीचे आव्हान आहे.

धारावी, शीव, माहीम, वडाळा, चेंबूर आणि अणुशक्तीनगर अशी संमिश्र लोकसंख्या असलेला दक्षिण-मध्य मुंबई हा गायकवाड यांचा लोकसभा मतदारसंघ. तब्बल 15 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघावर तसे कॉंग्रेस आघाडीचेच वर्चस्व. या ठिकाणी कॉंग्रेसचे पाच आमदार आणि 24 नगरसेवक आहेत. त्यामुळे या जागेवर निवडून येण्यासाठी गायकवाड यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत असेच सुरुवातीच्या काळात चित्र होते; मात्र वर्षभरापूर्वी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मराठी मतदारांना साद घालणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने श्‍वेता परूळकर यांना रणांगणात उतरवल्यानंतर गायकवाड यांची ही लढत तेवढी सोपी नव्हती हे स्पष्ट झाले. या मतदारसंघात उभे असलेले बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष यांचे उमेदवार गायकवाड यांच्या मतांच्या विभाजनाला कारणीभूत ठरणार होते. त्यामुळेच या मतदारसंघात होणारी लढत तशी चुरशीची ठरणार होती. वरवर तिरंगी वाटणाऱ्या या लढतीत बहुजन समाज तसेच अल्पसंख्याकांच्या मतांचे होणारे संभाव्य विभाजन रोखण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतून प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात आली.

एकनाथ गायकवाड यांना विजयी करण्यासाठी आघाडीतील सर्वच पक्षांनी काम केल्याचे दिसत असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार श्‍वेता परूळकर यांनी घेतलेली तब्बल एक लाख आठ हजार 341 मते ही कॉंग्रेसच्या पथ्यावर पडली असेच म्हणावे लागेल. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांना पडलेली मते आणि श्‍वेता परूळकर यांना मिळालेल्या मतांची बेरीज केली असता सुरेश गंभीर चांगल्या फरकाने विजयी झाले असते असे दिसून येते. मराठी मतदारांनी शिवसेनेऐवजी मनसेला पसंती दिली. गेल्या निवडणुकीत शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा पराभव करून एकनाथ गायकवाड जायंट किलर ठरले होते. त्यापूर्वी याच मतदारसंघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. या सगळ्या बाबी असल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसता तर गायकवाड यांना यंदाची निवडणूक जिंकणे जड गेले असते.
या मतदारसंघात साडेसहा लाख मराठी मतदार आहेत. त्यांच्या अपेक्षांची पूर्तताही गायकवाड यांना करावी लागणार आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा सर्वांगीण विकास हाच गायकवाड यांच्या कामाचा अजेंडा राहणार आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्षे राहणाऱ्या सर्वसामान्य झोपडीवासीयांना किमान 350 चौरस फुटांचे घर उपलब्ध करण्यासाठी तसेच या ठिकाणी असलेल्या लघुउद्योगांच्या वाढीला चालना देण्यासाठी त्यांना प्रामुख्याने प्रयत्न करावे लागणार आहेत. "धारावी डेव्हलपमेंट'च्या नावे होणाऱ्या या मतदारसंघाच्या विकासासाठी गायकवाड यांना प्रकर्षाने प्रयत्न करावे लागतील, हे निश्‍चित.


(sakal,16 th may)

टाटा हॉस्पिटलचे अधिकारी खातायत मृतांच्या टाळूवरचे लोणी

वितरण मृतांच्या नावाने ः महागड्या औषधांची खुल्या बाजारात विक्री

असाध्य अशा कर्करोगावर उपचाराकरिता आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या परळच्या टाटा मेमोरिअल रुग्णालयात मृत रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या औषधांचे वितरण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कर्करुग्णांसाठी कमी किमतीत उपलब्ध होणारी कोट्यवधी रुपयांच्या जीवरक्षक औषधांची खुल्या बाजारात चढ्या दराने विक्री करणारे मोठे रॅकेट केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणले आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला हा औषधांचा गैरव्यवहार शंभर कोटी रुपयांचा असल्याची शक्‍यता सीबीआयचे सहसंचालक ऋषीराज सिंग यांनी एका पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या प्रकरणी रुग्णालयातील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरांवर सीबीआयने छापे घातले असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत असल्याचेही सिंग यांनी सांगितले.

कर्करोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना जीवरक्षक ठरणाऱ्या औषधांचा टाटा मेमोरिअल रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार तसेच त्याची अवैध विक्री होत असल्याची तक्रार 29 एप्रिल रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या वितरणावर लक्ष ठेवले. तसेच रुग्णालयातील औषध विभागातील कागदपत्रांच्या दस्तऐवजाचीही तपासणी सुरू केली असता रुग्णालयाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागामार्फत पुरविल्या जाणाऱ्या प्रोटोकॉल मेडिसिन्सच्या प्रत्यक्ष वितरणातही मोठ्या प्रमाणावर तफावत आढळली. यानंतर सीबीआयच्या पथकाने केलेल्या सखोल तपासात कर्करुग्णांना अतिशय कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या महागड्या औषधांची रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी खुल्या बाजारात सर्रास विक्री करीत असल्याचे उघडकीस आले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांचे नातेवाईक अथवा अनोळखी व्यक्तींच्या नावे खोट्या पावत्या बनवून त्यांना या औषधांचे वितरण केले जात असल्याचे भासविण्यात येत होते. याशिवाय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती न देता रुग्णाच्या नावे त्याला प्रत्यक्ष दिलेल्या औषधापेक्षा जास्त औषधांची नोंद केली जात असल्याचेही उघडकीस आले. खुल्या बाजारात अतिशय महाग असलेल्या या औषधांच्या विक्रीकरिता रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचारी हवा तो मार्ग पत्करून नफा कमवीत असल्याचे स्पष्ट झाले. तपासात टाटा रुग्णालयाच्या सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. रेखा बतूरा, डिस्पेन्सरी विभागाचे कार्यालयप्रमुख वाय. बी. दीक्षित, फार्मासिस्ट पी. बी. ढाके, नमिता देशपांडे, लीना नखरे आणि चेतना पवार हे सहा अधिकारी व कर्मचारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे. रुग्ण
ालयातील आणखी किमान सात अधिकारी या रॅकेटमध्ये गुंतले असल्याची शक्‍यता असून त्यांची चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोषी असलेल्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या घरांवर सीबीआयच्या पथकाने छापे घातले असून त्यांच्या मालमत्तेचीही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सिंग यांनी पत्रकारांना दिली.
टाटा रुग्णालयात कर्करुग्णांसाठी वर्षाला 80 कोटी 50 लाख रुपयांच्या औषधांची खरेदी केली जाते. गेल्या चार वर्षांपासून या रुग्णालयात औषधांची काळ्या बाजारात विक्री होत होती.
दरम्यान, या प्रकरणी रुग्णालयाचे संचालक आर. बडवे यांनी सीबीआयच्या तपासाला रुग्णालय प्रशासन पूर्णपणे योग्य ते सहकार्य करीत असून दोषी आढळलेल्या सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षीच निलंबित करण्यात आल्याचे अधिकृत प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.


(sakal,15th may)

मुंबईत मतमोजणीसाठी सात हजार पोलिस तैनात

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मुंबई पोलिस सज्ज झाले असून मतमोजणीनंतर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी तब्बल सात हजार पोलिस शहरात तैनात ठेवण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त राज्य राखीव पोलिस दलाच्या 37 तुकड्या पोलिसांच्या मदतीला राहणार आहेत. शहरात असलेल्या संवेदनशील मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचे विशेषत्वाने लक्ष राहणार आहे. निकालानंतर शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांना विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह दोन हजार 600 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

(sakal,15th may)

मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त

सुप्रकाश चक्रवर्ती ः मिरवणुकांना सशर्त परवानगी

तीन टप्प्यांत झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकरिता राज्यात सर्वच मतमोजणी केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, विजयी मिरवणुकांच्या वेळी कोणतेही अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी या मिरवणुकांना सशर्त परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पोलिस महासंचालक (निवडणूक) सुप्रकाश चक्रवर्ती यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

राज्यात लोकसभेच्या 48 जागांकरिता 16, 23 आणि 30 एप्रिल रोजी मतदान झाले. मतदारराजाने कोणत्या पक्षाला आपल्या मतांचा कौल दिला आहे हे 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या दिवशी मतमोजणी केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार न होता मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी राज्य पोलिस दल सज्ज झाले आहे. मतमोजणी केंद्रांपासून शंभर मीटर अंतराच्या परिसरात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश करता येणार नाही. संवेदनशील मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रांवर राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांना तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेतली जाणार आहे. मतमोजणी केंद्रांवर विविध पक्षांच्या गटांत वाद; तसेच हमरीतुमरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेषत्वाने खबरदारी घेण्यात येत असल्याचेही चक्रवर्ती यांनी या वेळी सांगितले.
शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यातील सर्वच मतमोजणी केंद्रांवरील निकाल हाती येणे अपेक्षित आहे. जिंकलेल्या उमेदवारांच्या विजयी मिरवणुकांना त्यांचे मिरवणुकीचे मार्ग कोणते आहेत ते पाहूनच पोलिस परवानगी दिली जाणार आहे. अनेकदा काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे पराभूत झालेल्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कुरापती काढण्याचे प्रकार घडतात. सुरुवातीला क्षुल्लक असलेल्या या वादातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे मतमोजणी आणि विजयी मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी सावधगिरी बाळगण्यात येत असल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले. प्रत्येक जिल्हा व पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील युनिट कमांडर मतमोजणीसाठीच्या या बंदोबस्तावर विशेषत्वाने लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


(sakal,14th may)

धाडसी कामगिरी करणाऱ्या 49 पोलिसांचा गौरव

आयुक्तांच्या हस्ते सन्मान ः पोलिस महासंचालक पदकांचे वितरण

मुंबई पोलिस दलात उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी केल्याबद्दल देण्यात येणाऱ्या पोलिस महासंचालकांच्या गुणवत्ता पदकांचे वितरण आज पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्या हस्ते करण्यात आले. 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी अतुलनीय धाडस दाखविलेल्या बॉम्बशोधक आणि विनाशक पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल 49 पोलिस अधिकारी - कर्मचारी यंदा या पदकाचे मानकरी ठरले आहेत.

आझाद मैदान पोलिस क्‍लब येथे दुपारी झालेल्या या पदकवितरण कार्यक्रमाला पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्यासह प्रशासन विभागाचे सहपोलिस आयुक्त भगवंत मोरे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त के. एल. प्रसाद, गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. 2008 मध्ये केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल ही पदके प्रदान करण्यात आली. प्रशंसनीय सेवेबद्दल अतिरिक्त पोलिस आयुक्त अर्चना त्यागी, पोलिस उपायुक्त अमर जाधव, शशिकांत महावरकर आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डी. जी. होटकर यांना गौरविण्यात आले. या पदकांवर 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी जिवाची बाजी लावून अतिरेक्‍यांनी ठेवलेल्या बॉम्बचा शोध घेऊन ते निकामी करण्याची कामगिरी बजावलेल्या बॉम्बशोधक व विनाशक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेषत्वाने गौरव करण्यात आला. या पथकाचे पोलिस निरीक्षक स्टिवन अँथोनी, एकनाथ खोल्लम, पोलिस उपनिरीक्षक सचिन गावडे, दीपक सावंत, आल्हाद टेंबुलकर, विलास राणे, बाळकृष्ण घाडीगावकर, मनोज शेडगे, राजू पाटील, प्रकाश वाडकर, राजेंद्र गोडसे, पोलिस शिपाई सुभाष गावडे, किशोर नावर, नितीन लाड, आशिष महाडिक, विवेक नार्वेकर, आनंद देवार्डेकर, रवींद्र अडसूळ, गुरूनाथ नार्वेकर, महेंद्र केसरकर, माहीम पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार विलास गणेशकर यांना ही पदके देण्यात आली.
याशिवाय क्‍लिष्ट व बहुचर्चित गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल डोंगरी विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल नलावडे, मरोळच्या सशस्त्र पोलिस मुख्यालयातील विलासराव चंदनशिवे, मालवणीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत हरगुडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभय शास्त्री, मलबार हिल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इक्‍बाल शेख , सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीव नारकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश कदम, समाजसेवा शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीपत पाटील, जोगेश्‍वरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनंत दळवी, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अरुण अदम, पोलिस हवालदार किसन घुगे, गजानन चौगुले, पोलिस नाईक हेमंत राणे, लहू चव्हाण, जयवंत सकपाळ, प्रकाश देसाई, सुनील देसाई, शिवाजी सावंत यांना पदके देण्यात आली. निष्कलंक सेवेबद्दल आग्रीपाड्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र खंडागळे तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक सुरेश मगदुम यांना गौरविण्यात आले. मुंबई पोलिस इन्फोलाईन, एल्डरलाईनमधील प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस उपनिरीक्षक फिरोज पटेल, जनतेत पोलिसांची प्रतिमा उंचाविण्याची कामगिरी बजावल्याबद्दल विनोद विचारे यांना महासंचालकांच्या पदकाने सन्मानित करण्यात आले.


(sakal,13th may)

विर्क, रिबेरो आणि खोपडेंविरुद्ध कारवाईची मागणी करणार

ऍड्‌. संघराज रूपवते ः मनोहर कदमला सहानुभूती

रमाबाई आंबेडकरनगर येथे झालेल्या गोळीबारप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविलेला पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याला "यंत्रणेचा बळी' ठरविल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांच्यासह दोन निवृत्त व सेवेत असलेला एक अशा चौघा आयपीएस अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली जाणार आहे. रमाबाईनगर येथील गोळीबारात मृतांच्या नातेवाईकांची न्यायालयात बाजू लावून धरणारे ऍड्‌. संघराज रूपवते यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तब्बल बारा वर्षे चाललेल्या रमाबाईनगर गोळीबार प्रकरणाचा निकाल न्यायालयाने नुकताच दिला. या गोळीबाराबाबत राज्य राखीव पोलिस दलाचा उपनिरीक्षक मनोहर कदम याला पूर्णतः जबाबदार धरत त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पोलिस दलातील वरिष्ठ; तसेच निवृत्त अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षक मनोहर कदम याला सहानुभूती दर्शविणारी वक्तव्ये केली. अशातच काल पुणे येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी, कदम हा व्यवस्थेचा बळी असल्याचे वक्तव्य केले. सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेनंतर कदम यांचा अपिलाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा वेळी पोलिस महासंचालकांसह वरिष्ठ आय.पी.एस. अधिकाऱ्यांनी कदम याच्या कृत्याला सहानुभूती दर्शविणारे वक्तव्य करणे हे न्यायालयाचा अवमान करणारे; तसेच न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करणारे असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे. माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो, वाय. पी. सिंग आणि सध्या पोलिस सेवेत असलेले आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, दोषी पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याचे आजारपण हा एक बनाव असल्याचेही पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

विर्क यांनी माफी मागावी ः आठवले
पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम याच्याबाबत केलेल्या सहानुभूतीपूर्वक वक्तव्याबाबत राज्याचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांनी माफी मागावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली. याप्रकरणी आपण गृहमंत्री जयंत पाटील यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे आठवले म्हणाले. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या या वक्तव्याबाबत आपल्याला आश्‍चर्य वाटत असून, विर्क यांनी उपनिरीक्षक कदम याची बाजू घेणे हा पोलिस खात्याला कलंक असल्याचेही त्यांनी काढलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.



(sakal,13th may)

मानवी तस्करी रोखण्यासाठी प्रथमच पथकाची स्थापना

घटनांमध्ये वाढ ः देशातील पहिले पथक

मानवी तस्करीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्याकरिता पोलिसांच्या गुन्हे शाखेने मानवी तस्करीविरोधी पथकाची स्थापना केली आहे. मानवी तस्करी रोखण्यासाठी विशेषत्वाने स्थापन झालेले हे देशातील पहिले पथक असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईत अशा प्रकारच्या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
वेगवेगळ्या कारणांमुळे पासपोर्ट नाकारलेल्या व्यक्तींना खोट्या नावांनी परदेशांत लाखो रुपये घेऊन पाठविण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता होत नसल्याने कामानिमित्त परदेशात जाणाऱ्यांची संख्याही मोठी असल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष वेधले. गेल्या वर्षभरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मानवी तस्करी करणाऱ्यांवर केलेल्या सहा कारवायांत तब्बल चाळीस आरोपींना अटक करण्यात आली. यात समाजातील प्रथितयश व्यक्ती, पासपोर्ट विभागातील कर्मचारी, एअरलाईन्स कर्मचारी आणि काही दलालांचा समावेश आहे. मार्च महिन्यांत पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत एअर इंडियाच्या दोघा कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक करण्यात आली. या दोघा कर्मचाऱ्यांनी दोन महिलांना त्यांच्या पत्नीच्या पासपोर्टवर अमेरिकेला नेले होते. भविष्यात अशा प्रकारच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी हे पथक स्थापन करण्याकरिता पुढाकार घेतला. समाजसेवा शाखेच्या अखत्यारीत सुरू झालेले हे पथक स्वतंत्ररीत्या काम करणार असल्याची माहितीही गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

(sakal,13th may)

बनावट "एके-47'ने पोलिसांची गफलत

निनावी दूरध्वनी ः चित्रीकरणासाठी होणार होता वापर

पोलिस नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणाणतो... साधारण पन्नाशीतील एक व्यक्ती प्राणघातक शस्त्रांचा साठा टॅक्‍सीतून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळते. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आलेल्या दूरध्वनीमुळे पोलिसही हबकतात आणि मग टॅक्‍सीचा पाठलाग सुरू होतो... पोलिसांना संशयास्पद टॅक्‍सी सापडते... प्राणघातक शस्त्रसाठाही सापडतो; पण ते संबंधित व्यक्तीला सोडून देतात... कारण हा शस्त्रसाठा असतो नकली!
मंगळवारची सायंकाळ मुंबई पोलिसांसाठी जरा धावपळीची ठरली. निनावी दूरध्वनीवरून एके-47 रायफली घेऊन एक व्यक्ती टॅक्‍सीतून फिरत असल्याचा निरोप मिळाल्याने तेही सावध होतात.
पुढच्याच क्षणात हा संदेश वायरलेसवरून शहरात पाठवून पोलिसांना खबरदारीचा इशारा दिला जातो. माटुंगा पोलिसांच्या असॉल्ट मोबाईलला ती संशयास्पद टॅक्‍सी आढळते. पोलिस या टॅक्‍सीला थांबवून आत बसलेल्या व्यक्तीची विचारपूस करतात. तिच्याकडे असलेल्या सहा "एके-47' रायफल पाहून एक क्षण पोलिसांनाही काय करावे ते सूचत नाही; मात्र पुढच्याच क्षणात टॅक्‍सीत बसलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांची झालेली गफलत लक्षात येते. तो लगेचच आपल्याकडे असलेल्या सर्व रायफली बनावट असून, चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्या पुण्याला नेत असल्याचे सांगतो आणि एवढा वेळ टॅक्‍सीच्या मागावर असलेले पोलिस सुटकेचा निःश्‍वास सोडतात...
माटुंगा पोलिसांसोबत काल सायंकाळी घडलेल्या या किश्‍श्‍याची चांगलीच चर्चा आज दिवसभर पोलिस दलात होती. काल सायंकाळी चारच्या सुमारास एका सजग नागरिकाने दादर - टीटी येथून टॅक्‍सी पकडून जात असलेल्या एका व्यक्तीला सोबत प्राणघातक शस्त्रे घेऊन जाताना पाहिले आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला. खार पश्‍चिमेला जवाहरनगर येथे राहणारे रमेश श्रीपती शिंदे हा बनावट शस्त्रसाठा घेऊन जात होते. पोलिसांनी त्यांना सुरुवातीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेली ही शस्त्रे बनावट असल्याची खात्री करून घेतली. "मूव्ही ऍक्‍शन डमी इफेक्‍ट असोसिएशन' या संस्थेत नोकरी करीत असलेल्या शिंदे यांनी त्यांच्याकडे असलेला या शस्त्रांचा परवाना आणि आवश्‍यक ती कागदपत्रे पोलिसांना दाखविल्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली. सखोल चौकशीअंती पोलिसांनी हस्तगत केलेली शस्त्रे पुन्हा शिंदे यांच्या ताब्यात दिली आणि या प्रकरणावर पडदा पडला.



(sakal,13th may)

तीन वर्षांच्या अपहृत बालिकेची हत्या

गोरेगावात हळहळ : एका संशयिताला अटक

आठवडाभरापूर्वी गोरेगाव येथून अपहरण झालेल्या तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अपहृत मुलीचा मृतदेह याच परिसरातील संस्कारधाम हायस्कूलजवळ असलेल्या इलेक्‍ट्रीक मीटर केबिनमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गोरेगाव पश्‍चिमेला आदर्शनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या जैनब अमजद खान ही तीन वर्षीय मुलगी घरासमोर खेळत असताना 5 मे रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाली. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर जैनमच्या आईने या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, मात्र सायंकाळी घरासमोरच खेळणाऱ्या काही मुलांनी दिलेल्या माहितीनुसार जैनबला एक तरुण उचलून घेऊन निघून गेल्याचे तिच्या पालकांना समजले. यानंतर त्याच रात्री गोरेगाव पोलिस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्या शोधार्थ पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी वसई, विरार, कल्याण, नालासोपारा येथे पाठविण्यात आलेल्या पोलिस पथकांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नव्हते, मात्र आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जैनबचा मृतदेह तीन डोंगरी परिसरात असलेल्या संस्कारधाम हायस्कूलच्या शेजारी असलेल्या एका इलेक्‍ट्रिकल मीटर केबिनमध्ये नग्नावस्थेत आढळला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला. तपासाअंती हा मृतदेह 5 मे रोजी अपहरण झालेल्या जैनबचाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ही माहिती तिच्या घरच्या मंडळींना कळवून मृतदेह शवविच्छेदनाकरिता भगवती रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन अहवालात जैनबचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती गोरेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव महाडीक यांनी दिली. जैनबचे वडील दोन वर्षे दुबईत नोकरीसाठी गेले होते. काही महिन्यांपूर्वी ते मुंबईत परत आले आहेत. जैनबच्या अपहरणानंतर तिच्या कुटुंबीयांकडे अपहरणकर्त्यांनी कसलीही मागणी केलेली नाही. त्यामुळे या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर जैनब राहत असलेल्या आदर्शनगर परिसरात एकच
हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी जैनबचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून, शवविच्छेदनानंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत असल्याचेही पोलिस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले.दरम्यान, जैनब खान या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी शेखर पांडुरंग कीर (वय 32) या नराधमाला अटक केली आहे. कीर याने जैनबच्या हत्येची कबुली दिली आहे. यापूर्वीही त्याने नालासोपारा येथील एका लहान मुलीचे अपहरण करून, तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात चालू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापूराव महाडिक यांनी दिली. जैनबच्या हत्येचे कारण कीर याच्याकडून अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीला पाहण्यासाठी आदर्शनगर येथील नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या जमावामुळे या परिसरातील वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता. पोलिसांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्यासमोर बंदोबस्त लावून संतप्त जमावाला पोलिस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावरून हटविल्याचे सूत्रांनी सांगितले.


(sakal,11thmay)

टीव्ही बंद न केल्याने पित्याकडून मुलाचा खून

"आयपीएल'चा बळी ः जोगेश्‍वरीतील घटनेमुळे खळबळ

टीव्हीवर इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील क्रिकेट सामना पाहण्यावरून उद्‌भवलेल्या किरकोळ वादातून एका पित्याने आपल्या चोवीस वर्षीय मुलाचा भोसकून खून केला. जोगेश्‍वरी येथे काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पित्याला अटक केली आहे.

जोगेश्‍वरी पूर्वेकडील शंकरवाडी येथील गोम्स चाळीत संदेश मेघनाथ कांबळे हा तरुण टीव्हीवर इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील क्रिकेट सामना पाहण्यात दंग होता. एका खासगी एजन्सीत सुरक्षारक्षकाचे काम करणारे त्याचे वडील मेघनाथ कांबळे (वय 60) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी परतले. टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहणाऱ्या संदेशला त्यांनी टीव्ही बंद करण्यास सांगितले. सामना ऐन रंगात आल्याने वडिलांच्या बोलण्याकडे त्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे मेघनाथ कांबळे यांनी त्याच्यावर ओरडायला सुरुवात केली. आपल्याला सकाळी कामावर लवकर जायचे असल्याने थोडा आराम मिळावा यासाठी त्यांनी संदेशला पुन्हा एकवार टीव्ही बंद करण्यास सांगितले. मात्र, संदेश आपल्याला जुमानत नसल्याचे पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी स्वयंपाकघरातील सुरी घेऊन संदेशच्या छातीत डाव्या बाजूला वार केला. संदेश तेथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या प्रकारामुळे संदेशची आई आणि लहान भाऊ यांनी आरडाओरड केली. शेजारी आणि संदेशचा लहान भाऊ यांनी त्याला तातडीने नजीकच्या होली क्रॉस रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच संदेशचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर रात्री उशिरा संदेशच्या आईने मेघवाडी पोलिस ठाण्यात तिच्या पतीविरुद्ध मुलाच्या खुनाची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मेघनाथ कांबळे यास अटक केली. संदेशचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मेघवाडी पोलिसांनी दिली.

(sakal,11th may)

Sunday, May 10, 2009

कमलजीत राजपाल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सीसीआयचे सीईओ ः अश्‍लील इमेलचे प्रकरण


क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया (सीसीआय) चे सीईओ कमलजीत राजपाल यांनी आज सायंकाळी त्यांच्या कफ परेड येथील घरात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची कफ परेड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावर असलेल्या व्हिनस अपार्टमेंटमध्ये राहणारे कमलजीत राजपाल (53) हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत आपल्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्‍यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कमलजीत यांना त्यांच्या मुलाने तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनराज वंजारी यांनी दिली.
एका महिलेला अश्‍लील मजकूर असलेला ईमेल पाठविल्याप्रकरणी कमलजीत यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तणाव सहन न झाल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जाते; मात्र या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वंजारी यांनी सांगितले.

(sakal,8th may)

कमलजीत राजपाल यांचा आत्महत्येचा प्रयत्न

सीसीआयचे सीईओ ः अश्‍लील इमेलचे प्रकरण


क्रिकेट क्‍लब ऑफ इंडिया (सीसीआय) चे सीईओ कमलजीत राजपाल यांनी आज सायंकाळी त्यांच्या कफ परेड येथील घरात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची कफ परेड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावर असलेल्या व्हिनस अपार्टमेंटमध्ये राहणारे कमलजीत राजपाल (53) हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत आपल्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्‍यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कमलजीत यांना त्यांच्या मुलाने तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनराज वंजारी यांनी दिली.
एका महिलेला अश्‍लील मजकूर असलेला ईमेल पाठविल्याप्रकरणी कमलजीत यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तणाव सहन न झाल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जाते; मात्र या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वंजारी यांनी सांगितले.

(sakal,8th may)

दोन तरुणांना अटक करून 44 लाख रुपये जप्त

हवाला रॅकेट ः लातूरच्या व्यापाऱ्यावर संशय

हवाला रॅकेटद्वारे मुंबईत 44 लाख रुपये घेऊन आलेल्या दोन तरुणांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी मुसाफिरखाना येथे लावलेल्या नाकाबंदीत अटक करण्यात आली. या रकमेपैकी 12 लाख रुपये एका तरुणाने अंगावर चढविलेल्या जॅकेटमध्येच होते. ही बेहिशेबी मालमत्ता लातूरच्या एका बड्या व्यापाऱ्याची असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
सुजित विलास शिंदे (21) व गणेश विठ्ठल शिंदे (25) अशी या दोन तरुणांची नावे आहेत. काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बाबूराव शेट्ये चौक येथे सुरू असलेल्या नाकाबंदीच्या वेळी पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. या वेळी सहायक पोलिस उपनिरीक्षक जालिंदर माने यांनी मोहम्मद अली रोडवरून आलेल्या एका टॅक्‍सीला हेरले. पोलिसांची तपासणी सुरू असल्याचे पाहून काही क्षणांतच ही टॅक्‍सी एका ठिकाणी थबकली. सहायक पोलिस उपनिरीक्षक माने यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी या टॅक्‍सीवर लक्ष ठेवून टॅक्‍सी जवळ येताच थांबविली. टॅक्‍सीत बसलेल्या सुजित शिंदे व गणेश शिंदे या दोन तरुणांना टॅक्‍सीतून उतरण्यास सांगितले; मात्र दोघांनी टॅक्‍सीतून उतरण्यास नकार दिला. या वेळी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेबाबत विचारणा केली; मात्र त्याबाबतही काहीच उत्तरे मिळत नसल्याचे पाहून पोलिसांनी सुजितची कॉलर धरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांच्या हाताला 500 रुपयांच्या नोटांचे बंडल लागले. पोलिसांनी लगेचच त्याची अंगझडती घेतली, तेव्हा अंगावर चढविलेल्या जॅकेटमध्ये तब्बल 12 लाख रुपये त्याने लपविल्याचे उघडकीस आले. यानंतर बॅगेची तपासणी केली असता, बॅगेतही एक हजार, 500 व 100 रुपयांच्या नोटांच्या बंडलांनी ही बॅग खचाखच भरल्याचे आढळले. पोलिसांनी दोघांना तेथेच अटक केली. सुजित याच्या चौकशीत तो लातूरच्या फलटण येथील; तर गणेश साताऱ्याच्या कोरेगाव येथील राहणारा असल्याचे उघडकीस आले. या दोघांनी हवालामार्गे तब्बल 44 लाख रुपये मुंबईत आणल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बेहिशेबी मालमत्ता या दोन तरुणांकडे कोणी दिली याचा शोध पोलिस घेत आहेत; मात्र प्राथमिक तपासात ही रक्कम लातूर येथील एका बड्या व्यापाऱ्याची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोन आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती परिमंड
ळ-1 चे पोलिस उपायुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिली.


(sakal,8th may)

रमाबाईनगरातील घराघरांत समाधान...!

सबको चाय पिलाव... कोल्डड्रिंक्‍स लाव... चला बाबासाहेबांच्या पुतळ्याला सगळ्यांनी मिळून पुष्पहार घालूया... न्यायदेवतेचे आभार मानणारे बोर्ड लिहूया... कडेकोट पोलिस बंदोबस्तात घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकरनगरात नागरिकांची सुरू असलेली ही लगबग या परिसरात नव्याने येणाऱ्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होती. तब्बल एक तपाच्या प्रतीक्षेनंतर येथील प्रत्येक नागरिकाला आज न्याय मिळाला होता. बारा वर्षांपूर्वी याच रमाबाई आंबेडकरनगरात निरपराध लोकांवर केलेल्या गोळीबाराच्या खटल्याचा निकाल आज लागला. पोलिसांना या गोळीबाराचे आदेश देणारा तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मनोहर अंबादास कदम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याचे समजताच या नगरातील प्रत्येक घरात समाधानाचे वातावरण होते.

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकरनगरात 11 जुलै 1997 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर तेथील नागरिकांनी आंदोलन केले. या उद्रेकाला रोखण्याकरीता त्या वेळी बंदोबस्त नेमणुकीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक मनोहर कदम यांनी पोलिसांना आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश दिले खरे; मात्र या गोळीबारात दहा निरपराध लोकांनी प्राण गमावले, तर कित्येक जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश देणाऱ्या उपनिरीक्षक मनोहर कदम यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तेव्हापासून सुरू झाली. या गोळीबाराच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या न्यायमूर्ती गुंडेवार आयोगाने उपनिरीक्षक कदम यांना दोषी ठरवीत त्यांच्यावर खटला दाखल केला. या खटल्याच्या निकालाकडे रमाबाई आंबेडकरनगरचेच नाही, तर सबंध देशाचे लक्ष लागले होते. बारा वर्षे सुरू असलेल्या या प्रकरणाचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यात कदम याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
या निकालानंतर रमाबाई आंबेडकरनगरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गेल्या पंधरवड्यापासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अखेर आज या लक्षवेधी खटल्याचा निकाल लागला. या निकालानंतर रमाबाई आंबेडकरनगरात राहणाऱ्या आबालवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. गोळीबारात मरण पावलेल्यांचे नातेवाईक, जखमी आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासह या काळात पोलिसांनी ज्या ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले त्या सगळ्यांनीच मनोहर कदम याला झालेल्या शिक्षेचे स्वागत केले. निकालानंतर या नगरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सायंकाळी प्रचंड संख्येने नागरिक जमा झाले. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून; तसेच मेणबत्त्या प्रज्वलीत करून त्यांनी अभिवादन केले.
निकालाबाबत आपण समाधानी आहोत; मात्र दहा जणांचे प्राण घेणाऱ्या मनोहर कदमरुपी "इंडियन कसाब'ला वरच्या न्यायालयातही फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पोलिसांनी आंदोलनाच्या वेळी 35 आंदोलकांवर दाखल केलेल्या खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते; तसेच या घटनेनंतर "रमाबाई आंबेडकरनगरातील हत्याकांड' नावाचे पुस्तक लिहिणारे डॉ. हरीश अहिरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. सामान्य नागरिकांवर गोळीबार करणाऱ्यांना न्यायालयाने शिक्षा दिली; मात्र त्या दिवशी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांचा शोध अद्याप लागला नसल्याची खंत दीपक भोसले यांनी व्यक्त केली.

--------

लोकशाहीर घोगरेचे आत्मबलिदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेच्या घटनेनंतर सबंध देशभरातील दलित समाजात संतापाची तीव्र लाट उसळली होती. पोलिसांच्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाल्याचे कळताच संतापलेला भीमसैनिक घराघरांतून बाहेर पडून आंदोलनात सामील झाला. कुर्ला पूर्वेला बर्वे रस्त्यालगत असलेल्या बुद्धकॉलनीतील संतप्त तरुणही या आंदोलनात उतरले. या वेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जितेश भालेराव या उमद्या तरुणाचाही नाहक बळी गेला. रमाबाई आंबेडकरनगरात झालेल्या गोळीबारानंतर विचलित झालेल्या विलास घोगरे या लोकशाहिराने त्याच्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविले होते.

(sakal,7th may)

तो दिवस आठवला की अंगावर काटा उभा राहतो...

विजय गायकवाड ः रमाबाईनगर गोळीबारातील जखमी

" 11 जुलै 1997 ची ती सकाळ. सव्वासात वाजले असावेत. व्हिडीओ भाड्याने देण्याचा धंदा असल्याने नेहमीप्रमाणे आदल्या रात्री उशिरा झोपलो होतो. सकाळी सातला उठलो. डोळ्यावर थोडीशी झोप होतीच. बाहेर काय झालंय याची जराही कल्पना नव्हती. मी घरासमोरून आजच्या पवार चौकाच्या दिशेने जात होतो तोच अचानक आलेल्या गोळीने माझ्या गळ्याचा वेध घेतला. मला धाडकन जमिनीवर कोसळताना मावशी बनाबाई खरात यांनी पाहिले आणि त्या धावतच आल्या. दहा दिवसांनी मला शुद्ध आली. त्या दिवशी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरू असल्याचे मला कळले. "त्या' दिवशी झालेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू, तर कित्येक जण गंभीर जखमी झाल्याचे समजले. माझ्यासोबत ज्यांना गोळ्या लागल्या त्यात तिघे जखमी झाले; तर एक निष्पाप तरुण मरण पावला. आजही तो दिवस आठवला तरी अंगावर काटा येतो केवळ नशिबाची साथ होती म्हणून वाचलो,' अशी प्रतिक्रिया या गोळीबारातून बालंबाल बचावलेला विजय गायकवाड याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
रमाबाई आंबेडकरनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात विजय गायकवाड सारखे कितीतरी निष्पाप जखमी झाले. त्या दिवशी पोलिसांनी घडविलेल्या संहाराची माहिती सांगताना विजयचे चमकणारे डोळे काळजाचा ठोका चुकवत होते. मला ज्या ठिकाणी गोळी लागली त्याच ठिकाणी हिरामण गायकवाड, बबलू वर्मा, सुदेवी गिरी आणि बापू कोळेकर यांनाही गोळ्या लागल्या. त्यात बबलू वर्मा मरण पावला. त्याच्या छातीची चाळण झाली होती. सुदेवी गिरी ही पस्तीसवर्षीय महिला तर एका क्षणासाठी त्या वेळी अवघा तीन वर्षांचा असलेला त्यांचा मुलगा राहुल याला घेण्यासाठी जात होती. तोच मागून आलेल्या दोन गोळ्या त्यांच्या हाताच्या पंजात तसेच दंडात शिरल्या. गेली बारा वर्षे आम्ही न्यायासाठी झगडत होतो. आज न्यायालयाच्या निकालानंतर आम्हाला समाधान वाटते. सरकारने या घटनेनंतर आम्हा जखमींना सर्व प्रकारची मदत केली. पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्यांना केंद्र सरकारने रेल्वेत कायमस्वरूपी नोकरीत घेतले. गेली कित्येक वर्षे आमच्यापैकी आठ जखमी न्यायालयाच्या तारखांना सतत हजर राहात होतो. अखेर आज न्याय मिळाला, असे सांगताना विजयचा आनंद लपत नव्हता

(sakal, 7th may)

धमकीनंतर महाजन कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा

राकेश मारिया ः राहुल महाजन यांच्याकडून तक्रार दाखल


"बिग बॉस' या रिऍलिटी शोमध्ये मिळालेले पैसे परत करावेत; तसेच दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या प्रवीण महाजन यांच्या आगामी पुस्तकाबाबत कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला जाऊ नये; अन्यथा तुमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे, अशा धमकीची दोन पत्रे मिळाल्यानंतर राहुल महाजन यांनी आज सायंकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर महाजन कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला असून, आवश्‍यकतेप्रमाणे संरक्षणातही वाढ करण्यात आल्याची माहिती सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वरळीच्या "पूर्णा' इमारतीत असलेल्या निवासस्थानी ही दोन्ही पत्रे 24 एप्रिल आणि 4 मे रोजी आली. यातील राहुल महाजनच्या नावे आलेल्या पहिल्या पत्रात त्याचा सहभाग असलेल्या "बिग बॉस' या रिऍलिटी शोमधून मिळालेली रक्कम त्याने परत करावी; तसेच या शोची अंतिम फेरी कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा न करता पुन्हा घेण्यात यावी, असे म्हटले आहे. "बिग बॉस' हा रिऍलिटी शो संपल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राहुल एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून काम करीत आहे. अशातच 4 मे रोजी राहुलची आई रेखा महाजन यांच्या नावे दुसरे पत्र आले. या पत्रात राहुलला पाठविलेल्या पत्रातील धमकीचा उल्लेख आहे; याशिवाय त्यांचे पती प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला त्यांचा भाऊ प्रवीण महाजन याच्या आगामी पुस्तकावर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेऊ नये, असे बजावण्यात आले आहे. या पुस्तकावर कोणत्याही प्रकारची हरकत घेतल्यास संपूर्ण महाजन कुटुंबीय, त्यांची मुलगी तसेच भारतीय जनता पक्षाच्या युवा नेत्या पूनम, त्यांची मुले आणि कुटुंबीयांच्या जीविताची खैर नाही, असे धमकविण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या जीविताला असलेल्या धोक्‍यामुळे काल सायंकाळी राहुल महाजन यांनी गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली होती. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महाजन यांनी या धमकीच्या पत्रांबाबत लेखी तक्रार गुन्हे शाखेकडे दाखल केली आहे.

महाजन यांना आलेली ही दोन्ही पत्रे एकाच व्यक्तीने लिहिलेली आहेत. पोस्टाने आलेल्या या पत्रातील मजकूर इंग्रजीत लिहिलेला आहे. या दोन्ही पत्रांची गंभीर दखल घेत पोलिसांनी रेखा महाजन, राहुल महाजन, पूनम महाजन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. या दोन्ही कुटुंबीयांच्या सुरक्षा व्यवस्थेत आवश्‍यकतेनुसार वाढ करण्यात आल्याची माहिती राकेश मारिया यांनी दिली.


(sakal,6th may)

अंबानी हेलिकॉप्टर - "एअरवर्क्‍स'च्या दोघांना अटक

घातपाताचा प्रयत्न ः भारत बोरगेंमुळेच कट उघडकीस

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम टाकल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंजिनियरिंग कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना काल रात्री पावणेबारा वाजता अटक केली. या दोघांच्या चौकशीत हा प्रकार कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या वादातून झाल्याचे उघडकीस आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आज दिली. आरोपींनी केलेल्या या कृत्यामुळे हेलिकॉप्टरच्या होणाऱ्या संभाव्य हानीसंबंधी तज्ज्ञांकडून येणारा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. विलेपार्ले रेल्वेस्थानकात उपनगरीय गाडीखाली आत्महत्या करणारे "एअरवर्क्‍स'चे तंत्रज्ञ भारत बोरगे यांच्या सतर्कतेमुळेच हा गंभीर प्रकार उघडकीस आल्याचेही मारिया यांनी या वेळी सांगितले.
उदय मनोहर वारेकर (वय 32) व पलराज गणपती थेवर (48) अशी या अटकेतील आरोपींची नावे आहेत. "एअरवर्क्‍स इंजिनियरिंग'मध्ये हे दोघेही हेल्पर म्हणून काम करीत होते. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बेल-412 या 13 आसनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकी व गिअर बॉक्‍समध्ये लहान दगड आणि मुरूम आढळले होते. 23 एप्रिल रोजी सायंकाळी या हेलिकॉप्टरची देखभाल करणारे तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीची पाहणी केल्यानंतर उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. 28 एप्रिल रोजी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणणारे तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी विलेपार्ले रेल्वेस्थानकात चर्चगेटला जाणाऱ्या उपनगरी गाडीखाली आत्महत्या केल्यामुळे याबाबतचे गूढ अधिक वाढले होते.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेने एअरवर्क्‍स कंपनी आणि तेथे कार्यरत असलेल्या युनियनशी संबंधित 70 हून अधिक कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यानंतर त्यांनी उदय वारेकर व पलराज थेवर या दोघांना काल रात्री पावणेबारा वाजता अटक केली. या वेळी चौकशीत कंपनी व्यवस्थापन आणि महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाशी संबंधित 52 कर्मचाऱ्यांमध्ये 1995 पासून सुरू असलेल्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. 24 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरचे उड्डाण होणार असल्याने 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी त्याच्या मेंटेनन्ससचे काम सुरू केले. देखभाल-दुरुस्तीनंतर वारेकर व थेवर हे दोघेही हेलिकॉप्टर धुण्यासाठी म्हणून तेथे गेले. त्यानंतर संधी मिळताच वारेकर याने इंधनटाकीत लहान दगड व मुरूम टाकला होता. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आढळलेल्या दगड व मुरुमामुळे होणाऱ्या संभाव्य हानीसंबंधी गुन्हे शाखेने डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या तज्ज्ञांकडून अहवाल मागविला आहे. हा अहवाल आल्यानंतर या घटनेमागील गांभीर्य अधिक स्पष्ट होईल, असेही मारिया यांनी सांगितले. यापूर्वीही कंपनीत अशाच प्रकारच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यापैकी दोन घटनांशी वारेकर व थेवर यांचा संबंध असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या दोघांना 15 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

(चौकट)
यापूर्वीचे घातपाताचे प्रयत्न
27 ऑगस्ट 2008 ः हॅंगरवर उभ्या असलेल्या एका हेलिकॉप्टरवर कर्मचाऱ्यांनी वीट फेकली.
27 ऑक्‍टोबर 2008 ः हॅंगरच्या परिसरात उभ्या असलेल्या विमानाजवळ सुतळी बॉम्ब फोडला.
3 जानेवारी 2009 ः कंपनीच्या आवारात दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरजवळ सुतळी बॉम्ब फोडण्यात आले. या वेळी जवळच एक पेट्रोल भरलेला कॅनही ठेवण्यात आला. फटाक्‍यांमुळे लागलेली आग विझविण्यात आली. याबाबत अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
6 मार्च 2009 ः कंपनीच्या हॅंगरमध्ये असलेल्या एका कपाटात फटाके फोडण्यात आले. या वेळीही तेथे पेट्रोल भरलेला कॅन ठेवण्यात आला होता.
---------------
असा उघडकीस आला कट...!
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या मेंटेनन्सचे काम 23 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. "एअरवर्क्‍स'चे तंत्रज्ञ भारत बोरगे यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानंतर दुपारी उदय वारेकर व पलराज थेवरला हेलिकॉप्टरची स्वच्छता करण्यास सांगितले. संधी मिळताच दोघांनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत व गिअर बॉक्‍समध्ये दगड व मुरूम टाकले. सायंकाळी पुन्हा एकदा बोरगे हेलिकॉप्टरची पाहणी करायला आले. तेव्हा इंधनटाकीचे झाकण योग्य प्रकारे बसविले नसल्याचे आढळले. सकाळीच केलेल्या पाहणीच्या वेळी आपण स्वतः इंधनटाकीचे झाकण लावल्यामुळे सायंकाळी ते कोणीतरी उघडून पुन्हा चुकीच्या पद्धतीने बसविल्याचे बोरगे यांना जाणवले. त्यांनी झाकण उघडून पाहिल्यानंतर इंधनटाकीत मुरूम आणि गिअर बॉक्‍समध्ये दगड टाकल्याचे त्यांना आढळले. ही माहिती त्यांनी तातडीने कंपनी व्यवस्थापक सुधाकर सुर्वे यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

(sakal,4th may)

प्रियांका चोप्राविरोधात पोलिसांत तक्रार

म्युझिकचा धांगडधिंगा ः पार्टी आयोजकाला न्यायालयात हजर राहण्याचा आदेश

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आपल्या मित्रमंडळींना गुरुवारी रात्री आपल्या घरी दिलेली पार्टी तिला चांगलीच भोवण्याची चिन्हे आहेत. पहाटे उशिरापर्यंत धांगडधिंग्यात सुरू असलेल्या या पार्टीत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजविल्याप्रकरणी तिच्या सोसायटीतील रहिवाशांनी वर्सोवा पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पार्टी आयोजित करणाऱ्याकडून पाच हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली असून, त्याला उद्या न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
प्रियांकाने तिच्या वर्सोवा येथील "राज क्‍लासिक' सोसायटीतील घरात काल रात्री मित्रांसाठी एक पार्टी ठेवली होती. बॉलीवूडमधील अनेक कलाकार या पार्टीला उपस्थित होते. या पार्टीत शुक्रवारी पहाटेपर्यंत जोरजोरात साऊंड सिस्टीम सुरू होती. म्युझिकच्या मोठ्या आवाजाने सोसायटीतील रहिवाशांची झोपमोड झाल्याने ते चांगलेच संतापले. त्यांनी आवाज कमी करून पार्टी करण्याच्या सूचना प्रियांकाला केल्या; पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. पहाटे अडीचपर्यंत हा प्रकार तसाच सुरू राहिल्याने रहिवाशांनी प्रियांकाविरुद्ध पोलिस नियंत्रण कक्षात तक्रार दिली. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी ही माहिती वर्सोवा पोलिसांना कळविली. त्यानंतर सोसायटीत पोचलेल्या पोलिसांनी ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली आणि पार्टी आयोजित करणाऱ्या राजा मोहम्मद बशीर याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. त्याला उद्या न्यायालयात बोलाविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


(sakal,1st may)

गृहनिर्माणच्या महासंचालकपदी ए. एन. रॉय यांची नियुक्ती

आदेश जारी : प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

गृहनिर्माण विभागाचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांची राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रिक्त असलेल्या गृहनिर्माण विभागाच्या महासंचालकपदावर माजी पोलिस महासंचालक ए. एन. रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधी गृहखात्याने दिलेल्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली असून, या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.
तीन अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून राज्याच्या पोलिस महासंचालकपदी ए. एन. रॉय यांची केलेली नेमणूक उच्च न्यायालयाने बेकायदा ठरविल्यानंतर या जागी गृहनिर्माण विभागाचे पोलिस महासंचालक एस. एस. विर्क यांची नेमणूक करण्यात आली. विर्क यांच्या नियुक्तीनंतर रॉय दीर्घकालीन रजेवर गेले होते. सरकारने कोणतीही नवीन नियुक्ती न दिल्यामुळे रॉय गेल्या काही दिवसांपासून नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते, मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने रॉय यांच्या नवीन नियुक्तीचा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला होता. काल मुंबई व ठाणे येथील 10 जागांकरिता तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रॉय यांच्या नियुक्तीच्या गृहखात्याच्या प्रस्तावावर सह्या करून आदेशही काढले. रॉय गृहनिर्माण विभागाच्या महासंचालकपदावर दुसऱ्यांदा रुजू होत आहेत. राज्याच्या पोलिस महासंचालकपदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते याच विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते.


(sakal,1st may)

रिलायन्स'च्या तीनही अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट

रिलायन्स'च्या तीनही अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट

बोरगे आत्महत्या प्रकरण ः आवश्‍यकता भासल्यास पुन्हा चौकशी

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत सापडलेल्या दगड व मुरूम प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेले एअरवर्क्‍स कंपनीचे तंत्रज्ञ भारत बोरगे यांच्या आत्महत्येनंतर चौकशी झालेल्या अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या तीन अधिकाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, आवश्‍यकता भासल्यास या अधिकाऱ्यांना रेल्वे पोलिस पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहेत.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बेल-412 या 13 आसनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत 23 एप्रिल रोजी दगड व मुरूम आढळले होते. या हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंजिनियरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भारत बोरगे यांनी पहिल्यांदा हे दगड व मुरूम पाहिले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनिल धीरूभाई अंबानी उद्योगसमूहाने अंबानी यांच्या हत्येच्या कटाची शक्‍यता वर्तविली होती. या घटनेनंतर अंबानी समूहाचे सुरक्षा अधिकारी व निवृत्त पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप, माजी सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे आणि हवाई सुरक्षा प्रमुख निवृत्त विंग कमांडर सावला यांनी कालिना येथे असलेल्या "एअरवर्क्‍स'च्या हॅंगरवर भारत बोरगे यांची भेट घेतली होती. 15 मिनिटांच्या या भेटीत या अधिकाऱ्यांनी बोरगे यांचे कौतुक केले; तर काळे यांनी, बोरगे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन आवश्‍यकता भासल्यास फोन करू, असे सांगितले होते. यानंतर हे तीन अधिकारी तेथून निघून गेले होते. मंगळवारी सकाळी बोरगे यांनी विलेपार्ले येथे चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. या वेळी बोरगे यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या पत्रात "रिलायन्स'चे तीन अधिकारी भेटल्याचा उल्लेख होता. बोरगे यांच्या आत्महत्येशी "रिलायन्स'च्या अधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी रेल्वे पोलिसांनी या अधिकाऱ्यांचे काल जबाब नोंदवून घेतले. तिघांच्या चौकशीत त्यांनी आपण बोरगे यांना धन्यवाद देण्यासाठी गेलो होतो, असे म्हटले आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात येत आहे. बोरगे यांच्या मोबाईल फोन रेकॉर्डवरून त्यांना आत्महत्येपूर्वी आलेल्या दूरध्वनींचा तपास केला असून, अद्याप आक्षेपार्ह असे काहीच आढळून आलेले नाही. बोरगे यांच्या मृतदेहाच्या विच्छेदनाचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच आला आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे रेल्वे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

(sakal,1st may)

रिलायन्स'च्या तीनही अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट

रिलायन्स'च्या तीनही अधिकाऱ्यांना क्‍लीन चिट

बोरगे आत्महत्या प्रकरण ः आवश्‍यकता भासल्यास पुन्हा चौकशी

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत सापडलेल्या दगड व मुरूम प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेले एअरवर्क्‍स कंपनीचे तंत्रज्ञ भारत बोरगे यांच्या आत्महत्येनंतर चौकशी झालेल्या अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या तीन अधिकाऱ्यांना रेल्वे पोलिसांनी क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, आवश्‍यकता भासल्यास या अधिकाऱ्यांना रेल्वे पोलिस पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहेत.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बेल-412 या 13 आसनी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत 23 एप्रिल रोजी दगड व मुरूम आढळले होते. या हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंजिनियरिंग इंडिया लिमिटेड या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या भारत बोरगे यांनी पहिल्यांदा हे दगड व मुरूम पाहिले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनिल धीरूभाई अंबानी उद्योगसमूहाने अंबानी यांच्या हत्येच्या कटाची शक्‍यता वर्तविली होती. या घटनेनंतर अंबानी समूहाचे सुरक्षा अधिकारी व निवृत्त पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप, माजी सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे आणि हवाई सुरक्षा प्रमुख निवृत्त विंग कमांडर सावला यांनी कालिना येथे असलेल्या "एअरवर्क्‍स'च्या हॅंगरवर भारत बोरगे यांची भेट घेतली होती. 15 मिनिटांच्या या भेटीत या अधिकाऱ्यांनी बोरगे यांचे कौतुक केले; तर काळे यांनी, बोरगे यांचा मोबाईल क्रमांक घेऊन आवश्‍यकता भासल्यास फोन करू, असे सांगितले होते. यानंतर हे तीन अधिकारी तेथून निघून गेले होते. मंगळवारी सकाळी बोरगे यांनी विलेपार्ले येथे चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. या वेळी बोरगे यांच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या पत्रात "रिलायन्स'चे तीन अधिकारी भेटल्याचा उल्लेख होता. बोरगे यांच्या आत्महत्येशी "रिलायन्स'च्या अधिकाऱ्यांचा काही संबंध आहे का, हे पडताळून पाहण्यासाठी रेल्वे पोलिसांनी या अधिकाऱ्यांचे काल जबाब नोंदवून घेतले. तिघांच्या चौकशीत त्यांनी आपण बोरगे यांना धन्यवाद देण्यासाठी गेलो होतो, असे म्हटले आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखेतील पोलिस अधिकाऱ्याचा जबाब नोंदविण्यात येत आहे. बोरगे यांच्या मोबाईल फोन रेकॉर्डवरून त्यांना आत्महत्येपूर्वी आलेल्या दूरध्वनींचा तपास केला असून, अद्याप आक्षेपार्ह असे काहीच आढळून आलेले नाही. बोरगे यांच्या मृतदेहाच्या विच्छेदनाचा प्राथमिक अहवाल यापूर्वीच आला आहे. या प्रकरणी फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल येणे अद्याप बाकी असल्याचे रेल्वे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

(sakal,1st may)

पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्‍वास

मतदान शांततेत : मतमोजणीसाठी पुन्हा सतर्कता



मुंबई ः ऐन निवडणुकीत मुंबईत दहशतवाद्यांकडून घातपाती कृत्ये होण्याची शक्‍यता पोलिसांबरोबरच गुप्तचर विभागाला वाटत होती. पाक सीमेवरून काही अतिरेकी भारतात घुसले असून ते निवडणुकीदरम्यान घातपात घडविण्याचा धोका वाटत होता. मुंबई ही नेहमीच अतिरेक्‍यांची टार्गेट राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे मुंबईबरोबरच नवी मुंबईतील मतदान शांततेत पार पडले, याचे श्रेय पोलिसांनी महिनाभर घेतलेल्या परिश्रमांना जाते.

दहशतवाद्यांकडून घातपाताच्या कृत्याबरोबरच, संवेदनशील मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली होती. मतदारांना पैसे आणि "गिफ्ट्‌स'चे आमिष दाखवून त्यांची मते आपल्याकडे वळविण्याचा उमेदवारांचा अनेकदा प्रयत्न असतो. या सर्व घडामोडींवर गेल्या महिनाभरापासून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांमुळेच मुंबईतील सहा मतदारसंघात आणि नवी मुंबईतील किरकोळ प्रकार वगळता या दोन्ही शहरांत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता मतदान शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत आणि नवी मुंबईतीलही मतदान काल झाले. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी घेतलेली दक्षता या निवडणुकीतील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर नेहमीच असलेल्या मुंबईत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे घातपाती कृत्य घडू नये याकरिता संपूर्ण पोलिस दल सज्ज होते. 26 नोव्हेंबरला झालेला अतिरेकी हल्ला आणि गुप्तचर विभागाकडून निवडणूक काळात वर्तविण्यात आलेली देशभरातील प्रमुख नेत्यांच्या हत्येच्या कटाची शक्‍यता यामुळे संभाव्य परिस्थितीला तोंड देण्याची पूर्णतयारी पोलिसांनी केली होती. 23 हजार पोलिस, तीन हजार गृहरक्षक दल यांच्यासह केंद्रीय अर्ध सैनिक बल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस बळ, राज्य राखीव पोलिस बळ यांच्या तीसहून अधिक कंपन्यांच्या तैनातीमुळे मुंबईला या काळात लष्करी छावणीचे स्वरूप आले होते.

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदारसंघ पूर्णतः केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या सशस्त्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची दहशत खपवून घेतली जात नव्हती. मतदान केंद्रांवर शस्त्रधारी पोलिसांचा वचक असल्याने सामान्य नागरिकही अतिशय निर्भयपणे मतदान करताना दिसत होते.

निवडणुकीच्या तीन आठवड्यांपूर्वीपासून पोलिसांच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांची गस्त होती. मुंबईला आणि पर्यायाने मुंबईकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिरावर असलेले हजारो पोलिस रात्रपाळी संपल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सकाळीही कामावर होते. दहशतवादाचा समर्थ मुकाबला करतील, अशा विशेष प्रशिक्षित कमांडोंचे पथक प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापन करण्यात आले होते. शहरात ठेवण्यात आलेल्या चोख सुरक्षाव्यवस्थेमुळे किरकोळ प्रकार वगळता कोणतीही हिंसक घटना घडली नाही. याचे सर्व श्रेय पोलिसांना द्यावे लागेल. निवडणुकीनंतर आता पंधरवडाभर पोलिसांना स्वस्थ बसता येणार आहे. 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकरीता त्यांना पुन्हा नव्याने सज्ज व्हावे लागणार असले तरी, सध्या जनतेचा कौल आपल्या पोटात सामावलेल्या मतदान यंत्रणांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारीही याच पोलिसांवर आहे.

......
"आचारसंहितेचे उल्लंघन, पैशांचे वाटप, एकमेकांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या किरकोळ घटनांव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखत शांततापूर्ण मतदानाबाबत आपण मुंबईकरांसोबतच पोलिस दलातील आपल्या सर्व वरिष्ठ व कनिष्ठ सहकाऱ्यांचे आभारी आहोत. दहशतवादाचा असलेला धोका लक्षात घेता पोलिसांनी बजावलेल्या चोख कामगिरीमुळे कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडली नाही. याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांचे करू तेवढे कौतुक कमीच आहे.'
- के. एल. प्रसाद ( सहपोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था)

पोलिसांनी टाकला सुटकेचा निश्‍वास

मतदान शांततेत : मतमोजणीसाठी पुन्हा सतर्कता



मुंबई ः ऐन निवडणुकीत मुंबईत दहशतवाद्यांकडून घातपाती कृत्ये होण्याची शक्‍यता पोलिसांबरोबरच गुप्तचर विभागाला वाटत होती. पाक सीमेवरून काही अतिरेकी भारतात घुसले असून ते निवडणुकीदरम्यान घातपात घडविण्याचा धोका वाटत होता. मुंबई ही नेहमीच अतिरेक्‍यांची टार्गेट राहिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे मुंबईबरोबरच नवी मुंबईतील मतदान शांततेत पार पडले, याचे श्रेय पोलिसांनी महिनाभर घेतलेल्या परिश्रमांना जाते.

दहशतवाद्यांकडून घातपाताच्या कृत्याबरोबरच, संवेदनशील मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली होती. मतदारांना पैसे आणि "गिफ्ट्‌स'चे आमिष दाखवून त्यांची मते आपल्याकडे वळविण्याचा उमेदवारांचा अनेकदा प्रयत्न असतो. या सर्व घडामोडींवर गेल्या महिनाभरापासून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांमुळेच मुंबईतील सहा मतदारसंघात आणि नवी मुंबईतील किरकोळ प्रकार वगळता या दोन्ही शहरांत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता मतदान शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता सुटकेचा निश्‍वास टाकला आहे.

तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांत आणि नवी मुंबईतीलही मतदान काल झाले. मतदानाची ही प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी घेतलेली दक्षता या निवडणुकीतील प्रमुख वैशिष्ट्य ठरले. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर नेहमीच असलेल्या मुंबईत निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचे घातपाती कृत्य घडू नये याकरिता संपूर्ण पोलिस दल सज्ज होते. 26 नोव्हेंबरला झालेला अतिरेकी हल्ला आणि गुप्तचर विभागाकडून निवडणूक काळात वर्तविण्यात आलेली देशभरातील प्रमुख नेत्यांच्या हत्येच्या कटाची शक्‍यता यामुळे संभाव्य परिस्थितीला तोंड देण्याची पूर्णतयारी पोलिसांनी केली होती. 23 हजार पोलिस, तीन हजार गृहरक्षक दल यांच्यासह केंद्रीय अर्ध सैनिक बल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस बळ, राज्य राखीव पोलिस बळ यांच्या तीसहून अधिक कंपन्यांच्या तैनातीमुळे मुंबईला या काळात लष्करी छावणीचे स्वरूप आले होते.

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदारसंघ पूर्णतः केंद्राकडून पाठविण्यात आलेल्या सशस्त्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे संवेदनशील मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची दहशत खपवून घेतली जात नव्हती. मतदान केंद्रांवर शस्त्रधारी पोलिसांचा वचक असल्याने सामान्य नागरिकही अतिशय निर्भयपणे मतदान करताना दिसत होते.

निवडणुकीच्या तीन आठवड्यांपूर्वीपासून पोलिसांच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलिसांची गस्त होती. मुंबईला आणि पर्यायाने मुंबईकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिरावर असलेले हजारो पोलिस रात्रपाळी संपल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सकाळीही कामावर होते. दहशतवादाचा समर्थ मुकाबला करतील, अशा विशेष प्रशिक्षित कमांडोंचे पथक प्रत्येक पोलिस ठाण्यात स्थापन करण्यात आले होते. शहरात ठेवण्यात आलेल्या चोख सुरक्षाव्यवस्थेमुळे किरकोळ प्रकार वगळता कोणतीही हिंसक घटना घडली नाही. याचे सर्व श्रेय पोलिसांना द्यावे लागेल. निवडणुकीनंतर आता पंधरवडाभर पोलिसांना स्वस्थ बसता येणार आहे. 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकरीता त्यांना पुन्हा नव्याने सज्ज व्हावे लागणार असले तरी, सध्या जनतेचा कौल आपल्या पोटात सामावलेल्या मतदान यंत्रणांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारीही याच पोलिसांवर आहे.

......
"आचारसंहितेचे उल्लंघन, पैशांचे वाटप, एकमेकांवर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या किरकोळ घटनांव्यतिरिक्त कायदा व सुव्यवस्था राखत शांततापूर्ण मतदानाबाबत आपण मुंबईकरांसोबतच पोलिस दलातील आपल्या सर्व वरिष्ठ व कनिष्ठ सहकाऱ्यांचे आभारी आहोत. दहशतवादाचा असलेला धोका लक्षात घेता पोलिसांनी बजावलेल्या चोख कामगिरीमुळे कोणत्याही प्रकारची अघटित घटना घडली नाही. याबद्दल पोलिस कर्मचाऱ्यांचे करू तेवढे कौतुक कमीच आहे.'
- के. एल. प्रसाद ( सहपोलिस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था)

Tuesday, May 5, 2009

बोरगे मृत्युप्रकरणी रिलायन्सच्या तीन अधिकाऱ्यांचे जबाब

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टर प्रकरणातील प्रमुख साक्षीदार एअरवर्क्‍स कंपनीचा कर्मचारी भारत बोरगे याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी त्याला भेटलेल्या रिलायन्सच्या तिघा अधिकाऱ्यांचे जबाब आज रेल्वे पोलिसांनी नोंदविले. या अधिकाऱ्यांत माजी पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप यांच्यासह निवृत्त सहायक पोलिस आयुक्त आणि निवृत्त विंग कमांडर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरची देखभाल करणारा एअरवर्क्‍स इंजिनिअरिंग इंडिया कंपनीचा तंत्रज्ञ भारत बोरगे याला 23 एप्रिल रोजी हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम आढळले होते. या प्रकरणानंतर अंबानींच्या हत्येच्या कथित कटाची शक्‍यता वर्तवत हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. या घटनेनंतर सध्या रिलायन्स कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले माजी पोलिस महासंचालक के. के. कश्‍यप, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त शैलेश काळे आणि हवाई उड्डाण सुरक्षा विभागाचे अधिकारी निवृत्त विंग कमांडर सावला यांनी हे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भारत बोरगे याच्याकडे कालिना येथे जाऊन चौकशी केली होती. रिलायन्सच्या या अधिकाऱ्यांचा उल्लेख बोरगे याने त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. आज या तिन्ही अधिकाऱ्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचेही रेल्वे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


(sakal,30th april)

मोटरमन-गार्ड यांच्या जबाबानुसार भारत बोरगे यांची आत्महत्याच!

गूढ कायम : कुटुंबीयांची सीबीआय चौकशीची मागणी

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम सापडल्याच्या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीचा कर्मचारी भारत बोरगे यांच्या विलेपार्ले रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मोटरमन आणि गार्डसह पाच जणांचे जबाब आज नोंदवून घेतले आहेत. या पाचही जणांच्या जबाबानुसार हा प्रकार आत्महत्येचाच असल्याची पुष्टी मिळत असल्याची माहिती रेल्वे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली. या प्रकरणी लवकरच रिलायन्स आणि एअरवर्क्‍स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, बोरगे यांच्या पार्थिवावर सातारा येथील कुंभारवाडी या त्यांच्या गावी आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबीय सध्या गावीच आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी "सकाळ'शी बोलताना केली.
विलेपार्ले रेल्वेस्थानकात रूळ ओलांडताना चर्चगेटकडे जाणाऱ्या उपनगरी गाडीने धडक दिल्याने काल सकाळी आठच्या सुमारास बोरगे यांचा मृत्यू झाला. अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणात महत्त्वाचे साक्षीदार असलेल्या बोरगे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरची देखभाल करणाऱ्या एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या बारेगे यांनीच हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड आणि मुरूम सापडल्याची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती. या घटनेनंतर गेल्या काही दिवसांपासून बोरगे तणावग्रस्त होते. काल सकाळी भाईंदरमधील आपल्या घरातून कामाला जाण्यासाठी निघालेले बोरगे पहिल्यांदाच विलेपार्ले रेल्वेस्थानकात उतरले. सकाळी आठच्या सुमारास चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. या लोकलचे मोटरमन पिल्लई, गार्ड दिलीपकुमार, दोन अन्य कामगार आणि स्थानकात वृत्तपत्र विकणारा आशीष जाधव अशा पाच जणांना आज रेल्वे पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार रेल्वेमार्गावर आलेले बोरगे चर्चगेटला जाणाऱ्या रेल्वेसमोरच रुळावर बसले. त्यामुळे हा प्रकार आत्महत्येचाच असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आल्याचे शर्मा यांनी सांगितले. नेहमी सांताक्रूझ रेल्वेस्थानकात उतरून तेथून रिक्षाने आपल्या कंपनीत जाणारे बोरगे विलेपार्ले स्थानकात का उतरले, याची चौकशी करण्यात येत आहे. अपघाताच्या 16 मिनिटे आधी त्यांचे भांडुपला राहणाऱ्या आपल्या मोठ्या भावाशी, आनंद बोरगे यांच्याशी बोलणे झाले होते. मृत्यूपूर्वी बोरगे यांचे अन्य कोणाशी बोलणे झाले होते का, याचीही चौकशी पोलिस करीत आहेत. अंबानी यांच्या हेलिकॉप्टर प्रकरणात बोरगे यांच्याकडे गेलेल्या रिलायन्सच्या "त्या' कर्मचाऱ्यांचाही शोध सुरू आहे. मृत्यूनंतर ब
ोरगे यांच्याकडे सापडलेल्या पत्रातील हस्ताक्षर त्यांचेच असल्याची माहिती आनंद बोरगे यांनी पोलिसांना दिली आहे.

सीबीआय चौकशी करा
तीन वर्षांपासून एअरवर्क्‍स कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कामाला असलेले बोरगे लष्करातून अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. मृदू स्वभाव असलेले बोरगे आत्महत्या करूच शकत नाहीत. या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी आमच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे, अशी माहिती बोरगे यांचे मावसभाऊ संभाजी बोटरे यांनी "सकाळ'ला दिली. बोरगे यांची पत्नी 14 एप्रिलला मुले अक्षय (16), अभिजित (11) आणि मुलगी अन्नू (18) यांच्यासोबत सुट्टीनिमित्त गावी आली होती, असेही त्यांनी सांगितले.

हेलिकॉप्टर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने : मारिया
भारत बोरगे यांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी जबाब नोंदवून घेतला होता. सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास एअरवर्क्‍स कंपनीचा अभियंता वाराप्रसाद यांच्यासोबत बोरगे पुन्हा आले होते. त्यांच्यासोबत जबाब नोंदविण्यात आलेल्या अन्य साक्षीदारांच्या जबाबाच्या मदतीने अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणाच्या तपासावर अधिक प्रकाश टाकला जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या प्रकरणातील आपला तपास योग्य दिशेने सुरू असून, लवकरच आरोपींना पकडण्यात यश येईल, असेही मारिया म्हणाले


(sakal,29th april)

बेपत्ता अधिकाऱ्याबाबत नौदलाचा निष्काळजीपणा

नातेवाईक संतप्त ः 12 एप्रिलपासून बेपत्ता

आयएनएस गोदावरी या भारतीय नौदलाच्या जहाजावर कार्यरत असलेला नौदल अधिकारी जहाजातून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या या अधिकाऱ्याचा नौदलाच्या अथक प्रयत्नांनंतरही अद्याप शोध लागलेला नाही. याप्रकरणी नौदलाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली असून यलोगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, नौदलाच्या बेजबाबदारपणामुळे अद्याप या अधिकाऱ्याचा शोध लागलेला नसल्याचा आरोप या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी "सकाळ'शी बोलताना केला आहे.

प्रेमप्रकाश शुक्‍ला असे या बेपत्ता नौदल अधिकाऱ्याचे नाव आहे. नौदलात पेट्टी ऑफिसर पदावर कार्यरत असलेले शुक्‍ला 12 मार्चला मुंबईहून कोचीनला आयएनएस गोदावरीतून गेले होते. तेथून 11 एप्रिलला सहकाऱ्यांसोबत ते मुंबईत परतले; मात्र 12 एप्रिलच्या पहाटे 4 वाजेपर्यंत दोघा सहकाऱ्यांसोबत असलेले शुक्‍ला अचानक बेपत्ता झाल्याचे शुक्‍ला यांचे नातेवाईक विनोद पांडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. नौदलाने जहाजातून बेपत्ता झालेल्या शुक्‍लाची गंभीर दखल घेतली नाही. या अधिकाऱ्याचा आजतागायत तपास न लागणे लज्जास्पद असल्याचेही पांडे या वेळी म्हणाले.

दरम्यान, नौदलाने आज प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात 12 एप्रिलला सकाळी 8 वाजल्यापासून प्रेमप्रकाश शुक्‍ला बेपत्ता असल्याचे म्हटले आहे. ते बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच नौदलाने आपले शोधकार्य सुरू केले. शुक्‍ला यांच्या शोधार्थ नौदलाची तीन जहाजे, एक हेलिकॉप्टर 16 एप्रिलपर्यंत कार्यरत होते. गोवा आणि कारवारच्या समुद्र तसेच किनाऱ्यांवरही शुक्‍ला यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ते सापडले नाहीत. याबाबत शुक्‍ला यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आल्याचे संरक्षण विभागाने आज काढलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

(sakal,22nd april)

हिरानंदानीला बॉम्बस्फोटाचा ई-मेल पाठविणारा ताब्यात

पवईच्या हिरानंदानी संकुलात राहणारा तरुण इमारतीत बॉम्बस्फोट घडविणार असल्याच्या खोट्या माहितीचा ई-मेल हिरानंदानी समूहाला पाठविणाऱ्या अनिवासी भारतीयाला दहशतवादविरोधी पथकाने केरळ येथे ताब्यात घेतले असून त्याला आज मुंबईत आणण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अनिवासी भारतीयासोबत असलेले समलिंगी संबंध पुढे सुरू ठेवण्यास या इमारतीत राहणाऱ्या तरुणाने नकार दिल्याने त्याला धडा शिकविण्याकरिता त्याने बॉम्बफोटाच्या धमकीचा ई-मेल पाठविला होता.
आनंद (43) असे या अनिवासी भारतीयाचे नाव आहे. सौदी अरेबियात वास्तव्याला असलेल्या आनंदचे हिरानंदानी संकुलात राहणाऱ्या जेजे नावाच्या तरुणासोबत समलिंगी संबंध होते. यानंतर काही दिवसांत जेजेचे याच इमारतीत राहणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षासोबत समलिंगी संबंध सुरू झाले. जेजेने आपल्या संबंधांना धुडकावल्यामुळे आनंदने त्याला धडा शिकवायचे ठरविले. यानंतर त्याने हिरानंदानी समूहाच्या ई-मेल ऍड्रेसवर जेजे पवईच्या हिरानंदानी संकुलात बॉम्बस्फोट घडविणार असल्याच्या माहितीचा ई-मेल पाठविला. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकाने जेजे करवी आनंदला दूरध्वनी करून मुंबईत बोलावले. संबंध पूर्ववत होणार असल्याने आनंद मुंबईला यायला निघाला. मात्र, थेट केरळला उतरला. दहशतवादविरोधी पथकाच्या तुकडीने त्याला केरळमध्ये सापळा रचून ताब्यात घेतले. आनंदला आज मुंबईत आणण्यात आले असून चौकशीनंतर त्याला अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(sakal, 27th april)

अंबानी हेलिकॉप्टर - एअरवर्क्‍स कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत मुरूम आणि दगड टाकून त्यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चौकशी झालेल्या एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीच्या कर्मचाऱ्याने आज सकाळी विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ उपनगरी गाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या कर्मचाऱ्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपविला असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याची माहिती रेल्वेचे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी दिली.
भारत दगडू बोरगे (43, रा. नालासोपारा) असे या आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत 23 एप्रिल रोजी मुरूम आणि लहान दगड आढळले होते. या हेलिकॉप्टरची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या बोरगे यांनी इंधनटाकीत हे दगड आणि मुरूम पाहिले होते. अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी उद्योगसमूहाने हा प्रकार अतिशय गंभीरपणे घेतला होता. या घटनेमागे अंबानी यांच्या हत्येचा कट असल्याची शक्‍यता वर्तवत हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांकडून बोरगे यांच्यासह सहा जणांची चौकशी झाली होती. या घटनेनंतर बोरगे गेले काही दिवस तणावाखाली होते. आज सकाळी विलेपार्ले रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी स्वतःला उपनगरी गाडीखाली झोकून आत्महत्या केली. मूळचे सातारा जिल्ह्यातील बोरगेवाडी येथून मुंबईत स्थायिक झालेल्या बोरगेंना स्थानकावर असलेल्या अन्य प्रवाशांनी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना न जुमानता त्यांनी उपनगरी गाडीखाली स्वतःला झोकून दिले, असे रेल्वे पोलिस आयुक्त ए. के. शर्मा यांनी सांगितले. पोलिसांनी बोरगेंचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविला असून त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यात येत आहे. या घटनेचा अनिल अंबानी हेलिकॉप्टर प्रकरणाशी असलेला संबंध पडताळून पाहिला जात असल्याचेही शर्मा म्हणाले.

(sakal,28th april)

तीन चिमुकल्यांसह विवाहितेने जाळून घेतले

पतीशी भांडण ः दोघांचा मृत्यू; दोन जखमी

पतीशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागाने एका विवाहितेने आपल्या तीन निष्पाप मुलांसह स्वतःला जाळून घेतल्याची हृदयद्रावक घटना मुलुंड येथे मध्यरात्री घडली. या घटनेत विवाहिता आणि तिच्या दोन वर्षांच्या मुलीचा शंभर टक्के भाजल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला; तर या आगीत होरपळल्याने तिची अन्य दोन मुले आणि वाचविण्यासाठी धावलेला तिचा पती जखमी झाला आहे. भाजलेल्या दोन मुलांवर ऐरोलीच्या बर्न्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती परिमंडळ- 7 चे पोलिस उपायुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिली. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड पश्‍चिमेला विठ्ठलनगर येथील स्थानू इमारतीत ही मन हेलावणारी घटना घडली. या ठिकाणी राहणाऱ्या ज्योती कोरडे (26) यांचे पती दिलीप (30) सोबत काल रात्री जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून भांडण झाले. सात वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या दाम्पत्याला निशा (पाच वर्षे), सिद्धी (तीन वर्षे) आणि सुर्वेश (दोन महिने) अशी तीन मुले होती. कडाक्‍याच्या या भांडणानंतर दिलीप बाहेरच्या खोलीत झोपला; मात्र मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ज्योती तिच्यासोबत झोपलेल्या तिन्ही लहान मुलांना घेऊन किचनमध्ये गेली. किचनच्या दरवाजाला कडी लावून आपल्यावर आणि तिन्ही मुलांवर रॉकेल ओतून तिने पेटवून घेतले. आगीत होरपळणाऱ्या लहानग्यांनी आकांत केला. त्यांच्या किंकाळ्यांनी दिलीप जागा झाला. दरवाजाला आतून कडी लावली असल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने किचनचा दरवाजा तोडला. दिलीपने ज्योती आणि मुलांना आगीच्या ज्वाळांतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना मुलुंडच्या जनरल रुग्णालयात दाखल केले; मात्र शंभर टक्के भाजल्यामुळे ज्योती आणि तीन वर्षांची मुलगी सिद्धी मरण पावले. या आगीत होरपळून मुलगी निशा पंचवीस टक्के; तर दोन महिन्यांचा मुलगा सुर्वेश चाळीस टक्के भाजले आहेत. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही ऐरोलीच्या बर्न्स रुग्णालयात हलविल्याची माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार व्हटकर यांनी दिली. या घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याचेही व्हटकर यांनी सांगितले.

(sakal,27th april)

अनिल अंबानी यांचा जबाब नोंदविणार

अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत दगड व मुरूम सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेचे पोलिस अनिल अंबानी यांचाही जबाब नोंदविणार आहेत. हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत मुरूम व दगड आढळल्याने अंबानी यांना घातपात घडविण्याच्या कटाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती.
सहार विमानतळावर उभ्या असलेल्या अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत अनोळखी व्यक्तींनी दगड व मुरूम टाकल्याचा प्रकार 23 एप्रिलला उघडकीस आला. यातून अंबानी यांचा घात करण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने त्यांचे पायलट आर. एन. जोशी यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांच्याकडे एका पत्राद्वारे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एअरवर्क्‍स इंडिया इंजिनियरिंग कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. यापुढे उद्योगपती अंबानी यांचाही जबाब पोलिस नोंदविणार असल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी "पीटीआय'शी बोलताना सांगितले.


(sakal,26th april)

एअरवर्क्‍स'विरोधात महासंघ औद्योगिक न्यायालयात जाणार

अंबानी हेलिकॉप्टर ः कामगारविरोधी कृतीबाबत निषेध

अनिल धीरूभाई अंबानी समूहाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरच्या इंधनटाकीत मुरूम आणि दगड टाकण्याच्या उघडकीस आलेल्या गंभीर प्रकारानंतर या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत एअरवर्क्‍स इंडिया इंजिनिअरिंग कंपनीतील 52 कामगारांना कामावर येण्यास कंपनी व्यवस्थापनाने मज्जाव केल्याप्रकरणी महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाने औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत एअरवर्क्‍स कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
अनिल अंबानी यांच्या मुंबई विमानतळावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये अनोळखी व्यक्तीने दगड आणि मुरूम टाकल्याचे प्रकरण 23 एप्रिलला उघडकीस आले. या घटनेमागे अंबानी यांच्या हत्येचा कट असण्याची शक्‍यता वर्तवीत हे प्रकरण गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले. या प्रकरणाची एअरवर्क्‍स कंपनीने गांभीर्याने दखल घेत त्यांच्या 180 पैकी 52 कामगारांना चौकशी पूर्ण होईपर्यंत कामावर येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या कामगार संघटनेत असंतोष आहे. कामगारांसोबत सुरू असलेल्या जुन्या वादातूनच 52 कामगारांवर हा सूड उगवल्याचा आरोप महाराष्ट्र जनरल कामगार महासंघाने केला आहे. यासंबंधी त्यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. कंपनीच्या विरोधात कामगारांच्या प्रश्‍नांबाबत 2002 पासून औद्योगिक आणि मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल करून महासंघाने कायदेशीर लढा सुरू केला. त्यामुळे अनेकदा कंपनी व्यवस्थापनाने कामगारांबाबत उदासीन आणि निर्दयी धोरण स्वीकारले. 2003 पासून कंपनीने कामगारांना बोनसही दिलेला नाही. याशिवाय यापूर्वी कंपनीत फटाके वाजविण्याचे प्रकरण घडवून आणत त्याचा दोषही कंपनी व्यवस्थापनाने कामगारांवर ठेवला. अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाप्रकरणी महासंघाच्याच दोन कामगारांची चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्यात यावी; परंतु या घटनेचा फायदा घेत कामगारांना व्यवस्थापनाने नाहक त्रास देऊ नये, असे या पत्रकात म्हटले आहे. कंपनीने कामावर येण्यास मज्जाव केलेल्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी कामगार महासंघ औद्योगिक न्यायालयात जात असल्याचेही संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.


(sakal,26th april)