Sunday, May 25, 2008

मुंबई,ता.25 ः "मी माझा' कार चंद्रशेखर गोखलेची चांगली चारोळी आहे." तळ्याकाठचं गवत तळ्याशी सलगीने वागायचं,कारण त्याला जगायला तळ्यातलं पाणी लागायचं.' आजच्या स्पर्धेच्या युगात आपले स्थान कायम ठेवण्यासाठी अथवा इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी त्या कार्यालयातील वरीष्ठ अथवा इंडस्ट्रीतील कि - पर्सन शी सलगी करण्याती मनोवृत्ती आजच्या पिढीत बळावत चालली आहे.याच सलगीचा अतिरेक म्हणून दोन आठवड्यांपूर्वी "क्‍या आप पाचवी पास से तेज है' या अभिनेता शाहरूख खान याच्या रिऍलीटी शोचे काम पहाणाऱ्या सिनर्जी ऍडलॅब्ज च्या क्रिएटीव्ह हेडचा दक्षिणात्य अभिनेत्रीने तिच्या प्रियकरासोबत केलेली निर्घुण हत्या म्हणावा लागेल.
चार कन्नड चित्रपटांत मुख्य भूमिका साकारलेल्या म्हैसुरच्या मारिया मोनिका सुसायराज या अभिनेत्रीला मायानगरी मुंबईने खुणावले नसते तर नवलच.तीन वर्षांपूर्वी मुंबईतच अभिनयाचे धडे शिकलेल्या मारियाला बॉलीवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याची महत्वाकांक्षा होती.त्यामुळेच सुरवातीला मालिकांत लहान भूमिका करून नंतर पुढे चित्रपटांत काम करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या मारियाने एकता कपुरच्या बालाजी टेलिफिल्ममध्ये ऑडीशन दिले.या बॅनरमध्ये काम करायला मिळाल्यानंतर होणारे नाव, मिळणारी प्रसिद्धी , ग्लॅमर याची पुरेपुर माहिती असल्याने कंपनीत क्रिएटीव्ह हेड असलेल्या नीरज ग्रोव्हर याच्या भोवती तिने पिंगा घालायला सुरवात केली.त्याची परीणीती तिला म्हणावी तशीच झाली.नीरज तिच्या प्रेमात पुरता गोवला गेला.काही दिवंसात दोघे एकमेकांच्या अतिशय जवळ आले.नीरजने बालाजी टेलिफिल्म्स सोडून सिनर्जी ऍडलॅब्ज या कंपनीत नोकरी मिळविल्यानंतरही त्यांचा एकमेकांशी पुर्वीसारखाच संपर्क कायम होता.आगामी "न्यु महाभारत' या मालिकेत मारियाला काम मिळावे यासाठी नीरजनेच प्रयत्न केले होते अशीही माहिती समोर येऊ लागली आहे.मारियाशी असलेली सलगीच शेवटी नीरजचा काळ ठरली.कोची येथे नौदलात असलेल्या मारियाचा प्रियकर मॅथ्युला नीरजबाबत माहिती होती.त्यामुळेच 7 मेला मारियाच्या घरात रात्र काढणाऱ्या नीरजचा मॅथ्युने अमानुषपणे खून केला.
टिव्ही मालिका अथवा चित्रपटसृष्टीत चांगले डेब्युट व्हावे यासाठी धडपडणाऱ्या तरूणी अनेकदा इंडस्ट्रीतील कि पर्सनसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करतात.आपल्या आकांक्षा पुर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती आजच्या पिढीत मोठ्या प्रमाणावर बळावत चालली आहे.त्यातूनच कास्टिंग काऊच सारखे प्रकार घडतात.सलगी ठेवण्याचे हे प्रकार फक्त मालिका आणि चित्रपटांपुरतेच मर्यादित नाहीत.तर प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान कायम टिकविण्याकरीता अथवा इतर सहकाऱ्यांपेक्षा गुणवत्ता कमी असली तरी फक्त सलगीच्या जोरावरच यशाचे इमले बांधणारा नवा वर्ग निर्माण होऊ लागला आहे.

No comments: