Monday, August 18, 2008

ज्ञानेश
सकाळ वृत्तसेवा
ंमुंबई,ता.18 ः अहमदाबाद बॉम्बस्फोटांचा ई- मेल पाठविल्याचा ठपका असलेला केनेथ हेवूड आज पहाटेच्या विमानाने दिल्ली येथून अमेरिकेला पळून गेल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.यानंतर मात्र हेवूडला फॉरेन्सिक सायन्स लॅबने क्‍लिनचिट दिल्याने तो पोलिसांना आवश्‍यक नसल्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे सह आयुक्त हेमंत करकरे यांनी दिली.
अहमदाबाद येथे 26 जुलै रोजी झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या काही मिनिटांपुर्वी या स्फोटांची धमकी देणारा ई-मेल सानपाडा येथील गुनानी सोसायटीत राहणारा अमेरिकन नागरीक केनेथ हेवूड याच्या कॉम्प्युटरवरून गेल्याचे स्पष्ट झाले होते.या स्फोटाकरीता वापरलेल्या गाड्या देखील नवी मुंबईतूनच चोरीला गेल्या होत्या तयामुळे दहशतवाद विरोधी पथकासह देशभरातील सुरक्षा एजन्सीचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते.धमकीचा ई-मेल हेवूडच्या कॉम्प्युटरवरून पाठविल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी करायला सुरवात केली होती. त्याच्यासह या इमारतीतील अन्य दहा कॉम्प्युटर तपासणीकरीता फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठविले होते. चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत हेवूडला देश सोडण्यास दहशतवाद विरोधी पथकाने मनाई केली होती. मात्र आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या पत्नीसह अमेरिकेला निघून गेला. गेल्या तीन दिवसांपासून तो त्याच्या गुनानी इमारतीत आला नव्हता अशी माहिती या इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी दिली.
दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर हेवूडने पैसे मागितल्याचा आरोप केला होता.त्यानंतर त्याची पुन्हा चौकशी करण्यात येणार होती.चौकशीसाठी सोमवारी येऊ असे त्याने सांगितले होते.मात्र त्यापूर्वीच तो निघून गेल्याने पोलिस दलात खळबळ माजली आहे.हेवूडसह तो रहात असलेल्या गुनीना इमारतीतील बारा जणांची पॉलिग्राफी व ब्रेन मॅपिंग तपासणी करण्यात येत आहे.गुजरात पोलिसांनीही हेवूडची चौकशी केली होती.
कलिनाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबने दिलेल्या अहवालावरून त्याच्या कॉप्युटरमध्ये आक्षेपार्ह असे काहीच आढळलेले नाही.याचबरोबर आज सायंकाळी त्याच्या ब्रेन मॅपिंग आणि लायडिटेक्‍टर चाचणीचा अहवालही निरंक आल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी दिली.त्याला क्‍लिन चिट असल्याने त्याचा पासपोर्टही पोलिसांनी काढून घेतला नव्हता

No comments: