जीवनाला कंटाळलेल्या एका अठरा वर्षांच्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी मुलुंड येथे घडली. दरम्यान, ठाणे येथे इमारतीवरून पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे व या तरुणीच्या कुटुंबाचे नातेसंबंध असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पी. बी. लांडगे यांनी दिली.
मुलुंड पश्चिमेला जे. एन. रोड येथे असलेल्या विजयनगर रहिवासी सेवा संघाच्या वसाहतीत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. रेश्मा कांतिलाल धोत्रे असे या तरुणीचे नाव आहे. घरकाम करणारी रेश्मा आज दुपारी तिच्या लहान बहिणीसोबत घरात होती. लहान बहिणीला कामानिमित्त घराबाहेर पाठवून तिने दरवाजा बंद केला. थोड्या वेळानंतर परतलेल्या लहान बहिणीने अनेकदा दार वाजवूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकाराची माहिती शेजाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घराच्या खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर आत रेश्माने गळफास घेतल्याचे आढळले. या प्रकरणाची मुलुंड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
(sakal,7th january)
No comments:
Post a Comment