मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब हा आपला मुलगा असून आपण त्याला भेटायला आलो आहोत, असा दावा एका माथेफिरू महिलेने केला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या या महिलेला तेथे असलेल्या पोलिसांनी हुसकावून लावले; मात्र या महिलेने केलेल्या अनोख्या दाव्यामुळे पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
26 नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेला अतिरेकी मोहम्मद अजमल कसाब सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात त्याचे आई-वडील राहतात; मात्र गेल्या आठवड्यात पोलिस मुख्यालयात आलेल्या एका चाळिशीतील महिलेने आपणच कसाबची आई असल्याचा दावा केला. पंजाबी भाषेत बोलणाऱ्या या महिलेने कसाब लहान असताना त्याचे अपहरण झाले होते, असे सांगितले. खात्री पटविण्यासाठी आपली डीएनए तपासणीही करावी, असे या महिलेने सांगितले. पोलिसांनी या महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने तिला मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरूनच हुसकावून लावले. मुख्यालयाचे पोलिस उपायुक्त विजयसिंह जाधव यांनी कसाबला भेटण्याची इच्छा व्यक्त करणारी महिला मुख्यालयात आली होती, असे पीटीआयशी बोलताना सांगितले
(sakal,10 april)
No comments:
Post a Comment