सायबर क्राईम ः आयटी तंत्रज्ञाला पुण्यातून अटक
इंटरनेटवर ओळख झालेल्या मुंबईतील डॉक्टर तरुणीला लग्नाच्या आमिषाने पुण्यात बोलाविल्यानंतर तिला मद्यातून गुंगीचे औषध देऊन नग्नावस्थेत तिची छायाचित्रे काढणाऱ्या बड्या आयटी कंपनीच्या सहायक उपाध्यक्षाला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. समीर परीजा (40) असे या तंत्रज्ञाचे नाव आहे.
नोकरीसाठी पुण्यात वास्तव्याला असलेल्या समीर परीजा याला वार्षिक साडेसतरा लाख रुपये पगार होता. आर्थिक मंदीमुळे दीड महिन्यापूर्वी त्याला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. इंटरनेटवर चॅटिंग करताना मुंबईतील एका एमबीबीएस डॉक्टरशी त्याची ओळख झाली. या तरुणीशी राज नावाने चॅटिंग करणाऱ्या समीरने तिला लग्नाची मागणी घालत तिचे अर्धनग्न छायाचित्र इमेलवर पाठविण्यास सांगितले. फक्त चॅटिंगवरून झालेल्या ओळखीमुळे सुरवातीला तिने स्वतःऐवजी एका मॉडेलचे अर्धनग्न छायाचित्र त्याला पाठविले. आपल्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुण्यात भेटायला त्याने बोलावले. एप्रिल 2008 मध्ये ही तरुणी राजची सर्व माहिती घेण्यासाठी समीरला भेटायला पुण्यात गेली. पुण्यात एका प्रसिद्ध तारांकित हॉटेलमध्ये दोघेही एकमेकांना भेटले. त्या वेळी दोघांनी यथेच्छ मद्यप्राशन केले. या वेळी त्याने डॉक्टर तरुणीच्या मद्यात गुंगीचे औषध घालून तिला बेशुद्ध केले. यानंतर त्याने तिची नग्नावस्थेतील छायाचित्रे काढली. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून समीर या तरुणीला या छायाचित्रांद्वारे ब्लॅकमेल करीत होता. अखेर या तरुणीने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी समीर याला बंगळुरू येथून अटक केली. समीरचे दहा वर्षांपूर्वीच लग्न झाले असले, तरी त्याने यापूर्वी अशा प्रकारे अनेक तरुणींना फसविल्याचे गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सांगितले
(sakal,3 march)
No comments:
Post a Comment