Sunday, June 7, 2009

पवनराजे हत्येप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती

कॉंग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या दोघा आरोपींना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने ताब्यात घेतल्यानंतर त्यांना 1 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश पनवेल येथील न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले असून आणखी चार जणांना अटक होण्याची शक्‍यता सीबीआयचे सहसंचालक ऋषिराज सिंग यांनी आज येथे वर्तविली. पवनराजे यांच्या पत्नीने हत्येमागे असलेल्या काही संशयितांची नावे घेतली आहेत. या प्रकरणात प्रसंगी त्यांचीही चौकशी केली जाईल, असेही सिंग म्हणाले.

पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करणारा दिनेश तिवारी आणि या हत्येची सुपारी घेणारा पारसमल जैन या दोघांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी या दोघांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. या दोन्ही आरोपींची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या हत्येमागे असलेल्यांची नावे या दोघांकडून लवकरच कळण्याची शक्‍यता सिंग यांनी वर्तविली. या आरोपींना कस्टडीत घेतल्यानंतर त्यांच्या चौकशीला सीबीआयने सुरुवात केली आहे. पवनराजे यांच्या हत्येच्या सुपारीमागील हेतूही लवकरच समजू शकेल, असेही सिंग यांनी या वेळी सांगितले.

(sakaal,27th may)

No comments: