Sunday, June 7, 2009

बॉम्बस्फोटाची धमकी - बालगुन्हेगाराला कर्नाटकात अटक

"मुंबईत पाच ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी तुमच्याकडे अवघे दोन तास आहेत.' प्रसिद्ध वृत्तवाहिनीला अशा आशयाच्या धमकीचा ई-मेल पाठविणाऱ्या चौदा वर्षांच्या बालगुन्हेगाराला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कर्नाटक येथून ताब्यात घेतले आहे. प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शहा याच्या "ए वेन्स्डे' या चित्रपटातून प्रेरणा घेऊन हे कृत्य केल्याची कबुली या बालगुन्हेगाराने दिली आहे.
बेगळूरुच्या विजयानगर येथे राहणाऱ्या या बालगुन्हेगाराने शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला हा ई-मेल पाठविला. वृत्तवाहिनीने यासंबंधीची माहिती तातडीने सायबर गुन्हे शाखेला कळविली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली. या वेळी हा ई-मेल कर्नाटक येथून पाठविल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांचे एक पथक तातडीने बेंगळूरुच्या विजयानगर येथे गेले. त्यांनी एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. या मुलाने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. हा प्रकार आपण "ए वेन्स्डे' या चित्रपटाची प्रेरणा घेऊन केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. या मुलाने ज्या संगणकावरून हा मेल पाठविला त्या संगणकाची हार्ड डिस्क ताब्यात घेतली आहे.


(sakaal,31st may)

No comments: