Tuesday, May 5, 2009

टिस' बलात्कार प्रकरणातील सहाव्या आरोपीला अटक

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेतील अमेरिकी विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील विनम्र सोनी या सहाव्या आरोपीला आज दुपारी ट्रॉम्बे पोलिसांनी सत्र न्यायालयातून अटक केली. न्यायालयात अटकपूर्व जामीन मागण्यासाठी आलेल्या विनम्रचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर पोलिसांनी लगेचच ही कारवाई केली.
टाटा इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात अभ्यासासाठी आलेल्या तेवीस वर्षीय अमेरिकन विद्यार्थिनीवर 11 ऑक्‍टोबरला तिच्या ओळखीच्याच सहा विद्यार्थ्य्यांनी बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच पाच जणांना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील सहावा आरोपी विनम्र सोनी याने आपण निर्दोष असल्याचा दावा करीत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या या अर्जावर आज सुनावणी होणार होती. या सुनावणीकरिता विनम्र न्यायालयात आला होता. न्यायालयाने त्याच्या अर्जावर निकाल देताना त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचे सांगत त्याचा अर्ज फेटाळला. अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेर पडत असलेल्या विनम्रला ट्रॉम्बे पोलिसांनी तेथेच अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
(sakal,21st april)

No comments: