सीसीआयचे सीईओ ः अश्लील इमेलचे प्रकरण
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) चे सीईओ कमलजीत राजपाल यांनी आज सायंकाळी त्यांच्या कफ परेड येथील घरात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेची कफ परेड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावर असलेल्या व्हिनस अपार्टमेंटमध्ये राहणारे कमलजीत राजपाल (53) हे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घरात कुटुंबीयांच्या उपस्थितीत आपल्या बेडरूममध्ये त्यांनी स्वतःच्या डोक्यात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कमलजीत यांना त्यांच्या मुलाने तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनराज वंजारी यांनी दिली.
एका महिलेला अश्लील मजकूर असलेला ईमेल पाठविल्याप्रकरणी कमलजीत यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तणाव सहन न झाल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचे बोलले जाते; मात्र या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वंजारी यांनी सांगितले.
(sakal,8th may)
No comments:
Post a Comment