Tuesday, May 5, 2009

नूराला मुंबईत घ्यायचा होता अखेरचा श्‍वास

पोलिसांची माहिती ः हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ नूरा याचा मृत्यू प्रदीर्घ आजाराने झाल्याची माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईत शेवटचा श्‍वास घेण्याची इच्छा असलेल्या नूराला त्याच्या मृत्यूच्या तीन दिवस आधी भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
अनेक महिने मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त झालेल्या नूराचा 31 मार्चला कराची येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला. या घटनेनंतर गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीनुसार कराचीतच कार्यरत असलेल्या सरदार रहमान टोळीने नूराचा 250 कोटींच्या खंडणीसाठी खून केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून कोणतीहीच ठोस माहिती येत नव्हती. आज गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नूराचा कराचीत आजारपणामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. दुबईत उपचार घेत असलेल्या नूराला मृत्युपूर्वी भारतात हलविण्याची तयारी सुरू झाली होती. मृत्यूच्या अवघ्या तीन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना त्याला भारतात अंतिम श्‍वास घेण्याची इच्छा असल्याचे समजले होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

(sakal,21 april)

No comments: